बेलापूर किल्ला लवकरच पुरातत्त्व विभागाकडे हस्तांतरित; राज्याच्या नगरविकासमंत्र्यांची अधिवेशनात घोषणा | Belapur fort Archaeological Department Announcement convention Urban Development Minister state amy 95


नवी मुंबईतील बेलापूर किल्ल्याच्या संवर्धनाचे काम सिडकोमार्फत सुरू आहे. मात्र किल्ल्याची पुरती दुरवस्था  झाली असून प्रशासनाची अनास्था याला कारणीभूत असल्याची खंत आ. शशिकांत शिंदे यांनी विधान परिषदेत व्यक्त केली.

नवी मुंबई : नवी मुंबईतील बेलापूर किल्ल्याच्या संवर्धनाचे काम सिडकोमार्फत सुरू आहे. मात्र किल्ल्याची पुरती दुरवस्था  झाली असून प्रशासनाची अनास्था याला कारणीभूत असल्याची खंत आ. शशिकांत शिंदे यांनी विधान परिषदेत व्यक्त केली. तारांकित प्रश्नाद्वारे त्यांनी या किल्ल्याच्या दुरवस्थाकडे लक्ष वेधले. त्यावर सदर किल्ला लवकरच पुरातत्त्व विभागाकडे हस्तांतरित केला जाईल, अशी ग्वाही राज्याचे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

नवी मुंबईत  किल्ले गावठाण येथे ऐतिहासिक असा शिवकालीन किल्ला असून त्याला बेलापूर किल्ला म्हणून संबोधले जाते. या किल्ल्याचे संवर्धन  करण्यासाठी २०१८ मध्ये  सिडकोच्या वतीने १८ कोटी खर्च करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यासाठी पुरातत्त्व विभागाची मान्यता घेण्यात आली नाही; परंतु पुरातत्त्व विभागाच्या नियमानुसार काम झालेले नाही याबाबत नागरिकांनी तक्रारी केल्या होत्या. आयआयटीनेदेखील कामावर ठपका ठेवला आहे. त्यामुळे अशा प्रकारे नियम डावलून काम करणाऱ्या संबंधितांवर कोणती कारवाई केली, अशी विचारणा शिंदे यांनी सभागृहात केली. बेलापूर किल्ल्याची देखभाल दुरुस्ती सिडकोने केली. किमया आर्किटेक्ट या ठेकेदाराला काम दिले. पुरातत्त्व आणि वस्तुसंग्रहालय संचालनालयाच्या निकषांनुसार कामाला पूर्वपरवानगी दिली. परंतु, दुरुस्तीचे काम दर्जेदार झालेले नाही, असे पुरातत्त्व विभाग व वस्तुसंग्रहालय विभागाच्या पाहणीत आढळून आले आहे. सिडकोने चौकशी समिती नेमली. या दोन्ही समित्यांचा लवकरच अहवाल प्राप्त होईल तसेच पुरातत्त्व विभागाला देखभालीचे काम हस्तांतरित करण्यात येईल, असे मंत्री शिंदे यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा :  Girni Kamgar : गिरणी कामगारांसाठी म्हाडाच्या 2521 घरांची सोडत, 'या' तारख्या लक्षात ठेवा

बेलापूर किल्ल्याचे काम पुरातत्त्व विभागाचे नियम डावलून केले जात असल्याबाबत आम्ही आवाज उठवला होता.  हे काम पुरातत्त्व खात्याने करावे, अशी मागणी केली होती. तसेच याप्रकरणी आ. शशिकांत शिंदे यांनादेखील पत्र दिले होते. त्यामुळे आमच्या मागणीची दखल घेत आ. शशिकांत शिंदे यांनी वाचा फोडल्याने आता किल्ल्याचे काम पुरातत्त्व खात्यामार्फत होणार आहे.- नितीन चव्हाण, उपाध्यक्ष, राष्ट्रवादी युवक काँग्रेस, नवी मुंबई



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Weather News : मुंबईत उन्हाचा लपंडाव; विदर्भ- मराठवाड्यासाठी मात्र हवामानाचा चिंता वाढवणारा अंदाज

Maharashatra Weather News : राज्यात सध्या हवामानाच्या स्थितीमध्ये मोठ्या प्रमाणात विसंगती पाहायला मिळत आहे. तिथं …

Loksabha : तिसऱ्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा थंडावल्या, देशातील ‘या’ बड्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला

Loksabha Election 2024 : तिसऱ्या टप्प्यात म्हणजे 7 मे रोजी देशात 93 जागांवर मतदान होणार …