सागरी हद्द नियंत्रण ५० मीटपर्यंत; अंतिम आराखडे उपलब्ध झाल्याने पुनर्विकासाचा मार्ग मोकळा | Marine border control meters availability final plans paved way redevelopment ysh 95


सागरी हद्द नियंत्रण कायदा समुद्राच्या भरतीरेषेपासून ५० मीटरपर्यंत लागू करण्याबाबत आवश्यक असलेले अंतिम आराखडे अखेर राज्याच्या पर्यावरण विभागाने उपलब्ध करून दिले आहेत.

मुंबई : सागरी हद्द नियंत्रण कायदा समुद्राच्या भरतीरेषेपासून ५० मीटरपर्यंत लागू करण्याबाबत आवश्यक असलेले अंतिम आराखडे अखेर राज्याच्या पर्यावरण विभागाने उपलब्ध करून दिले आहेत. त्यामुळे आता भरती रेषेपासून ५० मीटरनंतरच्या शेकडो इमारतींचा रखडलेला पुनर्विकास मार्गी लागणार आहे. यामध्ये काही तांत्रिक अडचण असली तरी ती दूर करता येऊ शकते, असे या घडामोडींशी संबंधित सूत्रांनी सांगितले.  

राज्यासाठी १९९१ नंतर सागरी हद्द नियंत्रण कायदा २०११ लागू होता. त्यामुळे समुद्राच्या भरती रेषेपासून ५०० मीटरपर्यंत मुंबई शहरात १.३३ तर उपनगरात एक इतके चटईक्षेत्रफळ मिळत होते. मात्र इतक्या चटईक्षेत्रफळात प्रकल्प व्यवहार्य ठरत नव्हता. ही मर्यादा ५० मीटर करण्यात यावी, अशी जुनी मागणी होती. ती २०० मीटर करण्यात येणार होती. मात्र त्यासही विरोध करण्यात आला. अखेर आता ती मर्यादा ५० मीटर करण्यात आली असून त्यासाठी अंतिम सागरी हद्द व्यवस्थापन आराखडे सादर करण्यास सांगण्यात आले होते. त्यानुसार राज्याच्या पर्यावरण विभागाने आराखडे अंतिम करून ते केंद्रीय सागरी हद्द व्यवस्थापन प्राधिकरणाकडे पाठविण्यात आले आहेत. गेल्या महिन्यात त्यास मंजुरी मिळाल्यानंतरही भरती रेषेपासून ५० मीटरची मर्यादा लागू झालेली नव्हती. त्यासाठी आवश्यक असणारे अंतिम आराखडे संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले नव्हते. हे आराखडे आता महाराष्ट्र सागरी हद्द व्यवस्थापन प्राधिकरणाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्यामुळे आता ५० मीटरपुढील गृहप्रकल्पांच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे.

हेही वाचा :  vishwajit Rane Of Goa BJP Breaks Down Wife Is Leading | Elections 2022: ...अन् गोव्यातल्या भाजपाच्या उमेदवाराला झाले अश्रू अनावर! Too

२.५ पट चटई क्षेत्रफळ

या सर्व गृहप्रकल्पांना सरसकट अडीच पट चटई क्षेत्रफळ मिळणार आहे. या आराखडय़ासाठी जी मोजपट्टी वापरण्यात आली आहे त्यात तांत्रिक अडचण असली तरी ती सहज सुटण्यासारखी आहे, असेही सूत्रांनी सांगितले.



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

स्क्रॅप माफिया ते करोडपती, आता साम्राज्य संकटात… कोण आहे गँगस्टर रवी काना?

स्क्रॅप माफिया रवी कानाला पकडण्यात भारतीय पोलिसांनी यश मिळालंय. पश्चिम उत्तर प्रदेशातील फरारी गुंड रवी नागर …

दुसऱ्या टप्प्याचा प्रचार थांबला, राज्यातील 8 मतदारसंघात ‘या’ नेत्यांची प्रतिष्ठा पणाला

Loksabha 2024 : लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात 26 एप्रिलला होणाऱ्या मतदानात आठ मतदारसंघातल्या उमेदवारांचं भवितव्य …