बीसीसीआयकडून मोहम्मद शामीच्या रिप्लेसमेन्टची घोषणा; युवा वेगवान गोलंदाजाचा संघात समावेश

IND Tour Of Bangladesh: भारताचा अनुभवी गोलंदाज मोहम्मद शामीला (Mohammed Shami) खांद्याच्या दुखापतीमुळं रविवारपासून सुरू होणाऱ्या बांगलादेशविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतून (IND vs BAN ODI Series) वगळण्यात आलंय. त्याच्या जागी भारताचा युवा वेगवान गोलंदाज उमराम मलिकचा (Umran Malik) संघात समावेश करण्यात आलाय, अशी घोषणा बीसीसीयआयनं (BCCI) केलीय. मिळालेल्या माहितीनुसार, ऑस्ट्रेलियातून परतल्यानंतर सराव सत्रादरम्यान मोहम्मद शामीला दुखापत झाल्याची माहिती समोर येत आहे.

“भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शामीला बांगलादेशविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेपूर्वीच्या सराव सत्रादरम्यान खांद्याला दुखापत झाली. तो सध्या एनसीए, बेंगळुरू येथे बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाच्या देखरेखीखाली आहे आणि तो तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत भाग घेऊ शकणार नाही. अखिल भारतीय वरिष्ठ निवड समितीने शमीच्या जागी उमरान मलिकची निवड केली आहे”, अशी माहिती बीसीसीआय सचिव जय शाह यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे. 

ट्वीट-

 

हेही वाचा :  T20 नंतर आता वनडे सीरिजची उत्सुकता; सामना कधी आणि कुठे पाहाल? वाचा सविस्तर

बांगलादेश दौऱ्यासाठी भारताचा एकदिवसीय संघ: 
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), शिखर धवन, विराट कोहली, रजत पाटीदार, श्रेयस अय्यर, राहुल त्रिपाठी, ऋषभ पंत (विकेटकिपर), इशान किशन (विकेटकिपर), शाहबाज अहमद, अक्षर पटेल , वॉशिंग्टन सुंदर , शार्दुल ठाकूर , मोहम्मद. सिराज, दीपक चहर, कुलदीप सेन, उमरान मलिक.

हे देखील वाचा-



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

विराटचा फोन हरवल्यावर नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया, झोमॅटोवाले म्हणतात ‘अनुष्काचा फोन वापर’

Virat Kohli Lost Phone tweet : भारतीय संघाचा (Team India) माजी भारतीय कर्णधार विराट कोहली …

IND vs AUS : केएस भरत की ईशान किशन? कोणाला मिळणार प्लेईंग 11 मध्ये जागा?

IND vs AUS, Test : भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यातील कसोटी मालिकेतील पहिला सामना …