भारताला मोठा धक्का! दुखापतग्रस्त मोहम्मद शामी बांगलादेशविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतून बाहेर

India Tour Of Bangladesh: भारत आणि बांगलादेश (India vs Bangladesh) यांच्यात रविवारपासून (4 डिसेंबरपासून) तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळली जाणार आहे. या मालिकेपूर्वी भारताला मोठा धक्का बसलाय. भारताचा अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शामी (Mohammed Shami) दुखापतीमुळं एकदिवसीय मालिकेतून बाहेर झालाय. मोहम्मद शामी एकदिवसीय आणि कसोटी या दोन्ही मालिकेत भारतीय संघाचा भाग होता. जसप्रती बुमराहच्या अनुपस्थित गोलंदाजीची जबाबदारी त्याच्या खांद्यावर सोपवण्यात आली होती. त्याचं एकदिवसीय मालिकेतून बाहेर पडणं भारताच्या चिंतेत भर घालू शकतं. 

बीसीसीआयनं आपल्या निवदेनात असं म्हटलंय की, “मोहम्मद शामीला बांगलादेशविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेपूर्वीच्या सराव सत्रादरम्यान शमीच्या खांद्याला दुखापत झाली. तो सध्या एनसीए, बेंगळुरू येथे बीसीसीआय वैद्यकीय पथकाच्या देखरेखीखाली आहे आणि तीन सामन्यांच्या मालिकेत भाग घेऊ शकणार नाही.”

बीसीसीआयचं ट्वीट-

 

बांगलादेश एकदिवसीय संघ:
तमिम (कर्णधार), लिओन, इनामूल, शाकिब, मुशफिकुर, अफिफा, यासिर अली, मेहिदी, मुस्तफिझूर, तस्किन, हसन महमूद, इबादत, नसुम, महमुदुल्ला, शांतो आणि नुरुल हसन.

हेही वाचा :  BCCIचा धाडसी निर्णय; 2023 मध्ये महिला आयपीएल स्पर्धेचं आयोजन

भारताचा एकदिवसीय संघ: 
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), शिखर धवन, विराट कोहली, रजत पाटीदार, श्रेयस अय्यर, राहुल त्रिपाठी, ऋषभ पंत (विकेटकिपर), इशान किशन (विकेटकिपर), शाहबाज अहमद, अक्षर पटेल , वॉशिंग्टन सुंदर , शार्दुल ठाकूर , मोहम्मद. सिराज, दीपक चहर, कुलदीप सेन, उमरान मलिक.

भारत आणि बांग्लादेश एकदिवसीय सामन्याचं वेळापत्रक: 







सामना तारीख ठिकाण
पहिला एकदिवसीय सामना 4 डिसेंबर  शेर ए बांग्ला, ढाका
दुसरा एकदिवसीय सामना 7 डिसेंबर शेर ए बांग्ला, ढाका
तिसरा एकदिवसीय सामना 10 डिसेंबर  शेर ए बांग्ला, ढाका

हे देखील वाचा-



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

विराटचा फोन हरवल्यावर नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया, झोमॅटोवाले म्हणतात ‘अनुष्काचा फोन वापर’

Virat Kohli Lost Phone tweet : भारतीय संघाचा (Team India) माजी भारतीय कर्णधार विराट कोहली …

IND vs AUS : केएस भरत की ईशान किशन? कोणाला मिळणार प्लेईंग 11 मध्ये जागा?

IND vs AUS, Test : भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यातील कसोटी मालिकेतील पहिला सामना …