अभिमानास्पद! सांगलीतील युवा दिग्दर्शक शेखर रणखांबेचा देशात डंका

सांगलीतील युवा दिग्दर्शक शेखर रणखांबेच्या (Young director Shekhar Rankhambes) ‘रेखा’ लघुपटाची निवड गोवा येथे होणाऱ्या 53 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (International Film Festival India) झाली आहे. इफ्फी’मध्ये इंडियन पॅनोरमा विभागात शेखर रणखांबेचा ‘रेखा’ हा लघुपट निवडला गेलाय. या फेस्टिव्हलला देशातून 20 शॉर्टफिल्म निवडल्या आहेत, महाराष्ट्रातून एकमेव ‘रेखा’ ही शॉर्ट फिल्म्स निवडण्यात आली. (Young director Shekhar Rankhambes short film ‘Rekha’ has been selected for the 53rd International Film Festival of India in Goa latest marathi news)

‘रेखा’ हा नॉन फिचर विभागातील महाराष्ट्रातील एकमेव लघुपट आहे. सांगली जिल्ह्यातील शेखर यांनी या आधी अनेक लघुपट बनवले आहेत. उपेक्षित, परिघाबाहेरील लोकांचे चित्रण हे त्यांच्या चित्रपटाचे वैशिष्ट आहे. याआधी त्यांनी केलेल्या लेट कमर, गोष्ट, मुक, चिमणराव या लघुपटांची विविध मोहत्सवात निवड झाली आहे.

शेखर रणखांबे हा सांगलीतल्या पेड गावचा एक तरुण. शेखरनं याआधी देखील अनेक चांगल्या शॉर्ट फिल्म्स बनवल्या आहेत. यात पाम्पलेट, मढं या विशेष गाजलेल्या शॉर्टफिल्म्स आहेत. ‘रेखा’ (REKHA) या शॉर्ट फिल्मला ‘स्वराज्य महोत्सव’ या राष्ट्रीय लघुपट स्पर्धेत सर्वोत्कृष्ट फिल्म, सर्वोत्कृष्ट स्त्री कलाकार आणि सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक असे तीन मानाचे पुरस्कार मिळाले आहेत.

हेही वाचा :  PM Modi's Mother Passes Away: जेव्हा पंतप्रधान मोदी यांनी आईसाठी लिहिली 'मन की बात', सांगितली ही खास गोष्ट

दिग्दर्शक रवी जाधव यांनी (RAVI JADHAV) निर्मिती केलेली ‘रेखा’ ही शॉर्ट फिल्म येणाऱ्या काळात देश आणि परदेशातील अनेक चित्रपट महोत्सवात आपल्या लहान शहरातील तसेच गावखेड्यातील स्रीयांचा एक महत्वाचा परंतु कधीही न चर्चीलेला प्रश्न प्रेकक्षांसमोर मांडेल अशी प्रामाणिक आशा त्यांनी व्यक्त केली. ‘ 

सांगलीतल्या युवा दिग्दर्शक शेखर रणखांबे यांच्या या शॉर्ट फिल्मचं सध्या अनेक जण कौतुक करत आहेत. दिग्दर्शक शेखर रणखांबे यांनी या शॉर्ट फिल्मबाबत सांगितलं की, ‘मी याआधी काही फिल्म बनवल्या आहेत. रेखा हा एक वेगळ्या धाटणीचा विषय आहे. मात्र ही आपल्या अवतीभवतीच्या जगाचा मागोवा घेणारी गोष्ट आहे. उपेक्षितांचं जगणं यातून मांडण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न केला आहे. महाराष्ट्र शासन स्वराज्य महोत्सवात रेखा हा सर्वोकृष्ट लघुपट ठरला तर सर्वोकृष्ट दिग्दर्शक म्हणून शेखर रणखांबे यांना सन्मानित करण्यात आलं. तर रेखाची भूमिका साकारणारी माया पवार ही सर्वोत्कृष्ट अभिनेत्री ठरली. 

शेखर बापू रणखांबे यानी दिग्दर्शित केलेला ‘रेखा’ हा वास्तववादी चित्रपट आहे. यात माया पवार, रवीकिरण जाधवसह तासगावपासून जवळच आसलेल्या छोट्याश्या गावातून आलेले वास्तवातील कलाकरा आहे. या शॉर्टफिल्ममध्ये दिग्दर्शिका तसेच उत्तम अभिनेत्री वैशाली केंदळे यांनी फुगेवाली बाईची विशेष भुमिका साकारली आहे.

हेही वाचा :  उपोषण थांबवा, आम्ही तुमच्यासोबत आहोत; संभाजी भिडेंची जरांगेंना विनंती

स्वच्छ राहण्यासाठी रस्त्यावर राहणाऱ्या महिलेने केलेल्या संघर्षाचे चित्रण ‘रेखा’ या लघुपटात आसल्याचं  दिग्दर्शक  शेखर बापू रणखांबे यांनी सांगितलं. रस्त्यावर राहणाऱ्या महिलांच्या जीवनातील अडचणी मांडतानाच हा लघुपट त्यांच्या मासिक पाळी, आरोग्याच्या वाईट स्थितीकडेही लक्ष वेधतो. या विषयावर संशोधन करताना त्यांची प्रत्यक्ष स्थिती जाणून मला धक्का बसल्याचं रणखांबे यांनी म्हटलं. त्यांना अनेक महिने अंघोळ करायला मिळतच नाही. यातील नाईका रस्त्याच्या कडेला राहते.

त्वचेच्या संसर्गाने ती ग्रस्त असते, डॉक्टर तिला अंघोळ करुन औषध लावायला सांगतात. पण तिचा नवरा तीला आडवतो आणि तिच्याशी चुकीचं वर्तन करतो. रेखा अंघोळ करण्याचा प्रयत्न करते मात्र तिच्या समाजातील महिला तिला आंघोळ न करण्याचे व्यावसाईक फायदे सांगतात. तेव्हा तिला धक्काच बसतो. तिची द्विधा मनस्थिती होते आणि ती आपल्या पतीला सोडण्याचा निर्णय घेते.

स्वच्छतेचा दुष्टीकोन 
हा माहितीपट स्वच्छतेच्या संकल्पणेच्या विविध स्तरांवर लक्ष केंद्रित करतो. तसेच समाजाने रस्त्यावर राहणाऱ्यांबाबत दृष्टीकोन बदलण्याची गरज असल्याचं दर्शवतो. आपल्या समाजातील महिलांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याचं मत रणखांबे यांनी व्यक्त केलंय.

बरेच कलाकर प्रथमच कॅमेरासमोर
या माहितीपटातील कलाकारांमध्ये महाराष्ट्रातील तमाशा कलाकारांचा समावेश आहे. ते यापुर्वी कधीही कॅमेऱ्याला सामोरे गेले नव्हते त्यामुळे त्यांना कॅमेरा फेस करण्यासाठी दोन महिने प्रशिक्षण देण्यात आलं.

हेही वाचा :  पायलट बाप-लेकीची कमाल! प्रवाशांना घडवली सुंदर हवाई सफर, VIDEO व्हायरल

शेखर रणखांबे दुसरा नागराज मंजुळे
धोंडा, पॅम्पलेट सारख्या वेगळ्या धाटनीच्या फिल्म शेखरने या आधी केल्यात. समाजातील संवेदनशील आणि जिवंत विषय हाताळण्यात त्याचा हातखंडा आहे.पॅम्पलेटची दोन वर्षापुर्वी आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टीव्हलमध्ये निवड झाल्यानंतर  रेखा ही त्याची दुसरी फिल्म आहे.वेगवेगळ्या धाटणीचे चित्रपट करणारे नामांकित दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या प्रमाणे शेखर रणखंबे हा दुसरा नागराज मंजुळे असल्याचं बोललं जात आहे.



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

‘मला सल्ला देत जाऊ नका, खाली बसा’, अध्यक्ष ओम बिर्ला यांनी लोकसभेतच दीपेंद्र हुड्डा यांना झापलं, पाहा VIDEO

लोकसभा निवडणुकीनंतर पहिलं अधिवेशन सुरु आहे. दरम्यान अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी राष्ट्रपतींच्या अभिभाषणानंतर एक वेळ अशी …

वहिणीशी समलैंगिक संबंध, आई आणि भावाला संपवलं… ‘त्या’ एका गोष्टीने दुहेरी हत्याकांडाचा झाला उलगडा

23 जून 2024 मध्ये हरियाणातलं आझाद नगर दुहेरी हत्याकांडाने हादरलं. इथल्या एका घरात आई आणि …