Apurva Agnihotri Shilpa Baby : लग्नाच्या 18 वर्षानंतर अपूर्व आणि शिल्पाच्या घरी चिमुकलीचं आगमन

Apurva Agnihotri Shilpa Baby : बॉलिवूड अभिनेता अपूर्व अग्निहोत्री (Apurva Agnihotri) आणि अभिनेत्री शिल्पा सकलानी (Shilpa Saklani) हे बॉलिवूडमधील सर्वाधिक लोकप्रिय जोडपं आहे. आता लग्नाच्या 18 वर्षानंतर ते आई-बाबा झाले आहेत. सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत त्यांनी चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. 

अपूर्व आणि शिल्पाच्या घरी एका गोड परीचे आगमन झाले आहे. अपूर्व अग्निहोत्रीने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर एक खास पोस्ट शेअर करत यासंदर्भात माहिती दिली आहे. अपूर्णने शेअर केलेल्या फोटोत बाळाने पांढऱ्या आणि गुलाबी रंगाचा ड्रेस घातलेला दिसत आहे. या फोटोत बाळ खूपच गोड दिसत आहे. 


News Reels

व्हिडीओ शेअर करत जाहीर केलं बाळाचं नाव

व्हिडीओ शेअर करत अपूर्वने लिहिलं आहे,”माझ्या आयुष्यातील हा वाढदिवस खूप खास ठरला आहे. कारण यावाढदिवशी देवाने मला आतापर्यंतची सर्वात खास, अविश्वसनीय आणि आश्चर्यकारक भेट दिली आहे. लाडकी लेक ईशानी कानू अग्निहोत्रीची पहिली झलक तुमच्यासोबत शेअर करताना खूप आनंद होत आहे. तुमचे प्रेम आणि आशीर्वाद असेच राहू द्या”. 

हेही वाचा :  एमसी स्टॅन ठरला बिग बॉस-16 चा विजेता

अपूर्व अग्निहोत्रीने ‘परदेस’, ‘प्यार कोई खेल नही’ सारख्या सिनेमांत काम केलं आहे. तसेच ‘जस्सी जैसी कोई नही’,’अजीब दास्ता’ या छोट्या पडद्यावरील मालिकांमध्येदेखील त्याने काम केलं आहे. तर दुसरीकडे शिल्पा सकलानी ‘क्योंकी सास भी कभी बहू थी’, ‘क्या हादसा क्या हकीकत’,’कुसुम’,’जस्सी जैसी कोई नहीं’,’नच बलिए 1, ‘बिग बॉस 7’ सारख्या कार्यक्रमांत दिसून आली आहे. अपूर्व आणि शिल्पा 24 जून 2004 साली लग्नबंधनात अडकले होते. 

संबंधित बातम्या

Karan Johar: ‘माझ्या बायोपिकमध्ये ‘या’ अभिनेत्यानं साकारावी प्रमुख भूमिका’; करण जोहरनं व्यक्त केली इच्छा



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

सुष्मितानं मानले डॉक्टरांचे आभार; पोस्ट शेअर करत म्हणाली, ’95 टक्के ब्लॉकेज होते…’

Sushmita Sen: बॉलिवूडमधील (Bollywood) प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) गेल्या काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक …

थोडक्यात बचावला ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीन

A. R. Ameen: प्रसिद्ध संगीतकार  ए. आर. रहमान (A. R. Rahman) यांच्या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती …