आनंद महिंद्रा यांना वाटते ‘या’ गोष्टीची भीती; AI च्या फोटोवर म्हणतात…

Anand mahindra On AI generated image: गेल्या काही महिन्यांपासून ओपन एआयमुळे (OpenAI) आर्टिफिशिअल इंटेलिजन्सचा म्हणजे AI चा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. एआय टूल्सचा वापर करून अनेक नवनवीन फोटो तयार केले जातात. विराट कोहली असो वा बिल गेट्स… वेगवेगळ्या ठिकाणी ही लोकं वेगवेगळ्या अवतारात कशी दिसत असतील? याचे एआय जनरेटेड फोटो (AI generated Photos) तुफान शेअर केले जातात. अशातच आता महेंद्रा कंपनीचे सर्वेसर्वा आनंद महिंद्रा (Anand mahindra) यांनी भीती व्यक्त केली आहे.

आनंद महिंद्रा होळी सेलिब्रेशन (Anand mahindra AI Photos) करताना कसे दिसतील? याचे  एआय फोटोमध्ये शेअर करण्यात आले होते. त्यावर त्यांनी एक पोस्ट लिहिली आहे. त्यावेळी त्यांनी धोक्याचा इशारा देखील दिला आहे. नेमकं काय म्हणतात आनंद महिंद्रा पाहूया…

काय म्हणाले आनंद महिंद्रा ?

एआय कलाकाराने होळीच्या उत्सवावर माझी एक आनंदी भूमिका साकारली आहे. मला वाटतं की मी त्याला माझ्या बकेट लिस्टमधील सर्व ठिकाणांवरील माझ्या सहलींच्या आठवणी तयार करण्यास सांगावं. मी तिथं गेलो नसलो तरी कमीतकमी माझे वर्लच्युअर फोटो तरी असतील, असं आनंद महिंद्रा यांनी म्हटलं आहे. मला फक्त याची आठवण करून द्यायची आहे की, एआय इतक्या सहजतेनं बनावट प्रतिमा आणि गैर-मजेदार हेतूंसाठी बनावट बातम्या कसं तयार करू शकतं, याची प्रचिती यातून मिळते. हे एक भयानक भविष्य असेल, असं म्हणत त्यांनी धोक्याचा इशारा दिला आहे.

हेही वाचा :  'तुमच्या कंपनीचे शेअर घ्यायचेत, 1 लाख द्या'; तरुणाच्या मागणीवर आनंद महिंद्रा म्हणाले, 'तुझ्या...'

आणखी वाचा – Billionaire AI Photos: आनंद महिंद्रा ते बिल गेट्स, वृंदावनच्या रस्त्यावर दिसले तर… पाहा AI चे भन्नाट फोटो

पाहा ट्विट – 

Open AI म्हणजे काय?

OpenAI हे एक कंपनी आहे जी प्रगतिशील भाषा मॉडेल्स विकसित करते. OpenAI हे तंत्रज्ञान, मशीन लर्निंग, आर्टिफिशियल इंटेलिजेंस (AI) व भाषा प्रसंगी अद्यावत तंत्रज्ञानाच्या विकासासाठी मार्गदर्शन देण्याच्या उद्देशाने स्थापन केलेली आहे. OpenAI चे विजेता प्रकल्प तसेच GPT (Generative Pre-trained Transformer) ह्या नेहमीच ओळखल्या जाणार्‍या भाषा उत्पादन व विनामूल्य साधनांचा विकास करण्यासाठी वापरले जाते. मानवी नविन विचारांना सामान्य बोलींमध्ये परिणामित करण्यासाठी OpenAI यांनी GPT-3.5 च्या स्थानापर्यंत नेहमी अद्यावत तंत्रज्ञान विकसित केले आहे. या प्रगतीशील तंत्रज्ञानावर आधारित आहे जेणेकरून OpenAI अनेक क्षेत्रांमध्ये तंत्रज्ञान व भाषा संबंधित संघांच्या सहाय्याने वापरले जाते.

हेही वाचा :  आयडियाची कल्पना! तरूणाने बनवली 6 सीटर बाईक, पाहा VIDEO



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

जरांगे पाटील आणि भुजबळ वाद विकोपाला! भाषेचा दर्जा घसरला; समाजावर काय होणार परिणाम?

Jarange and Bhujbal Dispute: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आणि मंत्री छगन भुजबळ यांच्यातला वाद …

मध्यमवर्गीयांना मोठा दिलासा! ‘या’ वस्तू आणि सेवा GST कक्षेतून बाहेर; निर्मला सितारमण यांची मोठी घोषणा

GST Council Meeting: अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच 53 वी जीएसटी परिषद पार पडली. …