Anand Mahindra यांनी भारताच्या लोकसंख्येवर केलं असं ट्वीट, पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल

Anand Mahindra Tweet On Population Survey: उद्योगपती आनंद महिंद्रा सोशल मीडियावर कायम सक्रीय असतात. त्यांच्या सोशल मीडिया पोस्टची युजर्स आतुरतेने वाट पाहात असतात. अनेकदा मजेशीर व्हिडीओ शेअर नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेत असतात. मात्र यावेळी त्यांनी लोकसंख्या आणि विकास याबाबत ट्वीट केलं आहे. त्यांनी या माध्यमातून भारताचं भविष्य कसं असेल याकडे लक्ष वेधलं आहे. एका सर्व्हेक्षणानुसार देश ‘योग्य मार्गावर’ चालला आहे, असे देशातील नागरिकांना वाटते. आनंद महिंद्रा यांनी सर्व्हेक्षण शेअर करत भारतीयांचे कौतुक केले आहे. सर्व्हेक्षणाच्या निष्कर्षांबद्दल साशंक असणारे बरेच लोक असतील परंतु मला विश्वास आहे की आपण खरोखर आशावादी राष्ट्र आहोत. आशावाद हे यश आणि सकारात्मक परिणाम दर्शवते.

73 टक्के भारतीयांना असे वाटते की…

कोणत्या देशातील लोकांना आपला देश चुकीचा मार्गावर आहे असे वाटते? अशा आशयाचं शीर्षक असलेलं ट्वीट शेअर केलं आहे. या सर्व्हेक्षणाला उत्तर देताना आनंद महिंद्रा यांनी, देशातीली भविष्याबाबत आशावादी असल्याबद्दल भारतीय नागरिकांचे कौतुक केलं आहे. या सर्व्हेक्षणानुसार, 73 टक्के भारतीयांना महामारी, महागाई आणि राजकीय अस्थिरता असूनही देश योग्य मार्गावर आहे, असं वाटतं. 

हेही वाचा :  मोबाईल चार्जरने केला घात, मध्यरात्री आई-मुलाचा घेतला जीव; मन हादरवणारी घटना

सर्व्हेक्षणात भारत आणि जगाची स्थिती

अमेरिका आणि ब्रिटनसह 22 देशांमध्ये सर्व्हेक्षण करण्यात आले आहे. भारतीय आणि स्वित्झर्लंडच्या लोकसंख्येला त्यांच्या देशाचा दृष्टीकोन विवेकपूर्ण आणि ठोस आहे, असं वाटतं. तर पोलंड, यूके, बेल्जियम, स्पेन, नेदरलँड्स, फ्रान्स, दक्षिण कोरिया, अमेरिका, जर्मनी, जापान, नॉर्वे, स्वीडन, कॅनडा, आयर्लंड आणि इटलीमध्ये 60 टक्क्यांहून अधिक लोकांना वाटते की त्यांचा देश चुकीच्या मार्गावर आहे.

बातमी वाचा- Cooking: JCB-मिक्सरच्या मदतीने भंडारा, इतकं जेवण दिवसाला बनतं!

26 टक्के भारतीयांना वाटतं की…

50 टक्के ब्राझिलियन लोकांना वाटते की, देश चुकीच्या मार्गावर आहे. तर ऑस्ट्रेलियातील 48 टक्के, मेक्सिकोतील 43 टक्के लोकांना असं वाटतं. भारतामध्ये 26 टक्के नागरिकांना वाटते की देश चुकीच्या मार्गावर आहे. हे सर्व्हेक्षण zerohedge.com ने केले आहे. 



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

‘जो मला हरवेल मी त्याच्याशीच लग्न करेन’, गिता-बबिता जन्मल्याही नसतील तेव्हाची पहिली महिला रेसलर

आज 4 मे रोजी गुगलने हमीदा बानोच्या स्मरणार्थ ‘डूडल’ तयार केले आहे. हमीदा बानो या …

‘मोदींची कौटुंबिक पार्श्वभूमी…’; ‘पवारांना कुटुंब संभाळता आलं नाही’वर पवार स्पष्टच बोलले

Sharad Pawar On PM Modi Comment About His Family: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राष्ट्रवादीचे संस्थाप शरद पवारांवर …