Breaking News
  • Shivsena : ठाकरेंच्या शिवसेनेचं नवीन नाव काय?, खुद्द उद्धव ठाकरेंनी केला खुलासा!
  • Shivsena संकटात असताना मनसेने शेअर केला ‘तो’ व्हिडीओ, Raj Thackeray म्हणतात…
  • Aadhar Card मध्ये किती वेळा बदलता येईल नाव, पत्ता आणि DOB? जाणून घ्या सविस्तर…
  • Online Shopping: Amazon- Flipkart ला जोरदार टक्कर, ‘या’ सरकारी वेबसाइटवर सर्वात स्वस्त मिळतायत वस्तू
  • “उद्धव ठाकरेंचा तो गुण, कोणत्याही ठाकरेंकडे नाही….” निवडणूक चिन्ह गोठवल्यानंतर मनसेकडून टिकास्त्र

अमृता देशमुखनं किरण मानेला ठरवलं ‘Zero’, काय आहे कारण?

मुंबई, 9 ऑक्टोबर : ‘बिग बॉस मराठी सीझन 4’ सुरु झाला आहे. 2 ऑक्टोबरपासून सोशल मीडियावर याचीच चर्चा पहायला मिळतेय. बिग बॉस सुरु झाल्यापासून घरातील सदस्यांमध्ये खूप वाद-विवाद होत आहे. सोबतच मस्तीही पहायला मिळतेय. आता प्रेक्षकांना जास्त उत्सुकता असते ती बिग बॉसमधील चावडीची. या चावडींमध्ये महेश मांजरेकर सदस्यांची कशी शाळा लावतात हे पाहण्यासाठी सारेच उत्सुक असतात. पहिल्याच चावडीमध्ये महेश मांदजरेकरांनी स्पर्धकांना एक टास्क दिल्याचं पहायला मिळालं.

पहिल्या चावडीमध्ये महेश सरांनी स्पर्धकांना कोण हिरो आणि कोण झिरो असल्याचं सांगायला सांगितलं होतं. या चावडीत महेश मांजरेकरांनी अनेकांची शाळा घेतली. अशातच अमृता देशमुखचा एक व्हिडीओ समोर आलाय. यामध्ये अमृतानं किरण मानेला झिरो ठरवलं. तिचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर चर्चेचा विषय ठरत आहे.

महेश सरांनी या चावडीत निखिल राजेशिर्केची शाळा घेतल्याचंही दिसलं.  या टास्कमध्ये निखिल राजेशिर्केनं घरातील सगळ्याच स्पर्धकांना हिरो असल्याचं म्हटलं. यावरुन महेश सर चिडले आणि त्यांनी निखिलला सुनावलं. महेश मांजरेकरांनी निखिलला म्हटलं, तुला यातील सगळेच स्पर्धक कसे हिरो वाटू शकतात. हे मुर्खपणाचं लक्षण आहे. सगळेच चांगले असतील तर चांगल्या शब्दाला अर्थ राहत नाही.

दरम्यान, पहिल्या चावडीत स्पर्धकांचे घरे चेहरे समोर येणार. आठवडाभर झालेल्या, केलेल्या गोष्टीविषयी महेश मांजरेकर स्पर्धकांची शाळा घेणार आहे. त्यामुळे मांजरेकरांची चावडी पहायला सगळेच नेहमीच उत्सुक असतात. मात्र स्पर्धकांच्या मनात भीती असते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.



Source link

About Admin

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.
@majhinews1
Previous Shivsena संकटात असताना मनसेने शेअर केला ‘तो’ व्हिडीओ, Raj Thackeray म्हणतात…

Check Also

किरण मानेंचा बिग बॉसचा प्रवास संपणार?; नव्या प्रोमोने चाहत्यांची वाढली धकधक

मुंबई, 09 ऑक्टोबर : प्रेक्षक ज्या क्षणाची वाट पाहत होते तो बहुप्रतिक्षित बिग बॉस मराठीचे …

चाहत्यांना बिग बींच्या वाढदिवशी मिळणार खास भेट

मुंबई, 9 ऑक्टोबर : बॉलिवूड मेगास्टार अमिताभ बच्चन इंडस्ट्रीतील दिग्गज अभिनेत्यांपैकी एक आहे. त्यांची एक …