अक्षय कुमारची अ‍ॅक्टर निम्रत कौरने शेअर केले तिच्या घनदाट केसांचे रहस्य

निम्रत कौर तिच्या दमदार अभिनयाने सर्वांचे लक्ष वेधून घेते. पण तिच्या नॅचरल लुकने सर्वच जण हैराण होतात. एयरलिफ्ट या चित्रपटामध्ये अक्षय कुमारसोबत काम करणाऱ्या निम्रत कौरने तिच्या घनदाट केसांचे रहस्य सांगितले आहे. निम्रत नियमितपणे सलूनमध्ये जाऊन केसांची काळजी तर घेते आणि चांगली उत्पादने वापरते, पण तिच्या स्वयंपाकघरात काही गोष्टी वापरून घनदाट केस मिळवते. (फोटो क्रेडिट्स: Instagram @nimratofficial, istock)

​शेअर केले सिक्रेट

​शेअर केले सिक्रेट

ग्रेझियाला दिलेल्या मुलाखतीत निम्रतने केसांची काळजी घेण्याची पद्धत सांगितली आहे. हे ऐकून लोकांना थोडं आश्चर्य वाटेल की करोडोंचा बँक बॅलन्स असलेली ही अभिनेत्री आज देखील केसांची काळजी घेण्याची ही भारतीय पद्धत फॉलो करते. सर्वात महत्त्वाची गोष्ट स्वयंपाक घरातील काही गोष्टी वापरून तुम्ही हा उपाय करू शकता.

(वाचा :- वयाच्या ५८ व्या वर्षीही आमिर खान इतका तरुण कसा दिसतो? या दोन गोष्टींमध्ये दडलंय गुपित) ​

रामबाण उपाय

रामबाण उपाय

अभिनेत्रीने तिचा हेअर केअर शेअर केले ती घनदाट केसांसाठी मेथीचे दाणे वापरते. निम्रतने सांगितले होते की, ती हे मेथी रात्री भिजवून ठेवते. यानंतर, ती मेथीचे दाणे बारीक करून पेस्ट तयार करते आणि नंतर केसांना लावते. जर अभिनेत्रीवर विश्वास ठेवायचा असेल तर, यामुळे केस केवळ मजबूत होत नाहीत तर त्यांची गुणवत्ता देखील सुधारते.

हेही वाचा :  हरिश्चंद्र गडावर पर्यटकाचा मृत्यू; रस्ता भरकटल्याने जंगलात अडकले

(वाचा :- सौंदर्यासाठी नाही तर या कारणासाठी म्यानमार आणि थायलंडमधील महिला वर्षानुवर्षे गळ्यात घालतात धातुच्या काड्या) ​

मेथीचे दाण्यांचा कसा वापर कराल?

मेथीचे दाण्यांचा कसा वापर कराल?

तुम्हालाही मेथीचे दाणे लावायचे असतील तर ही संपूर्ण प्रक्रिया अगदी सोपी आहे.

सर्व प्रथम एका भांड्यात मेथीचे दाणे भिजत ठेवा. केसांच्या लांबीनुसार त्याचे प्रमाण ठरवा.
रात्रभर भिजवल्यानंतर सकाळी पाणी वेगळे करा.
मेथीचे दाणे ब्लेंडरमध्ये टाकून त्याची पेस्ट बनवा.
स्कॅल्पपासून केसांच्या टिपांपर्यंत गुळगुळीत पेस्ट लावा.
साधारण अर्धा तास तसंच राहू द्या आणि नंतर साध्या पाण्याने केस धुवा.
नंतर हलक्या शॅम्पूने केस धुवा.

आजीच्या बटव्यातील गुपित

आजीच्या बटव्यातील गुपित

निम्रतने केसांच्या काळजीशी संबंधित तिच्या आजीची रेसिपी देखील शेअर केली आहे. तिने सांगितले की ती कांद्याचा रस टाळूवर लावते , जे तिच्या केसांवर खूप प्रभावी ठरले.

कांद्याचा रस कसा काढायचा?

कांद्याचा रस कसा काढायचा?
  • सर्व प्रथम मध्यम आकाराचा कांदा घेऊन त्याची साल काढावी.
  • कांदा किसून घ्या. यासाठी तुम्ही खवणीची मदत घेऊ शकता.
  • आता दोन तळहातांमध्ये किसलेला कांदा घ्या आणि त्याचा रस काढा.
  • तुमची इच्छा असल्यास, तुम्ही रस वेगळे करण्यासाठी तागाचे छोटे कापड देखील वापरू शकता.
  • यासाठी कापडाच्या मध्यभागी फक्त किसलेला कांदा ठेवा त्यानंतर ते दाबा, म्हणजे गाळल्यानंतर कांद्याचा रस खाली येईल. (टिप :- हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. हे कोणत्याही प्रकारे कोणत्याही औषधाचा किंवा उपचारांचा पर्याय असू शकत नाही. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.)
हेही वाचा :  World Pneumonia Day 2022 : या आजारामुळे फुफ्फुसात जमा होतो पू आणि पाणी, चिमुकल्यांच्या जीवावर बेतू शकतं

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Loksabha : बारामतीच्या सभेत बोलताना रोहित पवारांना अश्रू अनावर, अजितदादांनी केली नक्कल, म्हणाले ‘आमच्या पठ्ठ्यानं…’

Rohit Pawar burst into tears : येत्या सात मे रोजी होणाऱ्या तिसऱ्या टप्प्यातील लोकसभेच्या (Loksabha Election) …

‘मुंबईत गिरगावमध्ये नोकरीची संधी पण मराठी उमेदवार नको’; महिला HR ची संतापजनक पोस्ट

HR LinkedIn Post Related to Marathi People : सध्या सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होत …