अजित पवारांच्या PhD वक्तव्यावरुन वाद, वंचित आक्रमक तर मनसेचा इशारा

देवेंद्र कोल्हटकर, झी मीडिया, मुंबई : नागपूर इथं सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात काँग्रेस आमदार सतेज पाटील (Satej Patil) यांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नासंदर्भात उपस्थित केलेल्या प्रश्नावर बोलताना अजित पवार (Ajit Pawar) यांनी पीएचडी (PhD) करून काय दिवे लावणार ? असं वक्तव्य केल्यानंतर अजित पवार यांच्या विरोधात संताप व्यक्त केला जातोय. अजित पवारांना पीएचडीच्या वक्तव्यामुळे टीकेचे धनी व्हावे लागत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि वंचित बहुजन आघाडीने कठोर शब्दांमध्ये अजित पवार यांच्यावर टीका केलेली आहे.

मनसेचा इशारा
उप-उपमुख्यमंत्री महोदय श्री. अजित दादा, पीएचडी करून काय दिवे लावणार आहेत असं आपण म्हणालात… दादा, महाराष्ट्र हे राज्य इतर राज्यांपेक्षा वेगळं ठरतं ते शिक्षणाच्या संधींमुळे आणि त्याबद्दलची आस प्रचंड आहे म्हणूनच. महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, कर्मवीर भाऊराव पाटील, ह्यांच्यासारख्या अनेकांमुळे महाराष्ट्रात शिक्षणाची कवाडं बहुजनांना खुली झाली. अगदी लोकमान्य टिळकांपासून ते गोपाळकृष्ण गोखलेंपर्यंत प्रत्येकांनी शैक्षणिक संस्था काढण्यावर भर दिला कारण शिक्षणच समाजाच पुनरुत्थान करू शकतं ह्याची जाणीव होती. 

राहिला प्रश्न पीएचडीचा तर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे स्वतः डॉक्टरेट होते आणि त्यांना सचोटीने, संघर्षाने मिळविलेला हा बहुमान हा महाराष्ट्रातील लाखो तरुणांना प्रेरित करतो की एखाद्या विषयात दीर्घ अभ्यास करून पारंगत होऊन, पीएचडी मिळवावी… आणि सारथी, महाज्योती, बार्टी ह्या संस्थांच्या शिष्यवृत्तीचा विषय होता म्हणजे बहुजनांची मुलं उच्चशिक्षित होणार ना… मग महाराष्ट्राचा उप-उपमुख्यमंत्री इतकं बेजबाबदार विधान आणि तेही सभागृहात करूच कसा शकतो ? “मी स्पष्टवक्ता, मी कठोर, मी टग्या…” असं स्वतःला म्हणवून घेतलं म्हणजे महाराष्ट्राने तुमची वाट्टेल ती विधान सहन करायची का? 

हेही वाचा :  अभिनेता अक्षय कुमार, शाहरुख खान आणि अजय देवगण अडचणीत; सरकारने पाठवली नोटीस

तुम्ही स्वतःला टगे म्हणवून घेता. कारण तुमची टगेगिरी खपवून घेणारी व्यवस्था तुमच्या पायाशी आली. पण तुमच्यासारखं नशीब प्रत्येकाचं कसं असणार ? म्हणून शिकून, पीएचडी करून, चांगली नोकरी करून, सचोटीने आयुष्य जगण्याची इच्छा बाळगत महाराष्ट्रातला तरुण-तरुणी राबत असतात… ते ज्ञानाचा दिवा लावत आहेत, त्यामुळे त्यांना तरी तुमच्या टगेगिरीचा प्रसाद देऊ नका, असं मनसेने म्हटलं आहे. 

वंचित बहुजन आघाडीची भूमिका

70 हजार कोटी रुपयांचा घोटाळा करणाऱ्या अजित पवारांना पीएच.डीचा फुल फॉर्म तरी माहीत आहे का? असा सवाल वंचित बहुजन आघाडीने उपस्थित केला आहे. पीएच.डी करणे म्हणजे धरणात मुतण्याची भाषा करण्या इतकं सोपं नाहीये. दहावी पास अजित पवारांनी विद्यार्थ्यांचा अपमान केलाय. त्यांचा जाहीर निषेध करतो असं वंचित बहुजन आघाडीच्यावतीने सांगण्यात आलंय.



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

भारतात लवकरच आपोआप दुरुस्त होणारे रस्ते? NHAI ने सुरु केलं काम; खड्ड्यांची समस्या कायमची संपणार

Self Healing National Highways In India: केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या नेतृत्वाखालील रस्ते वाहतूक मंत्रालयाअंतर्गत येणाऱ्या …

Weather News : मुंबईत उन्हाचा लपंडाव; विदर्भ- मराठवाड्यासाठी मात्र हवामानाचा चिंता वाढवणारा अंदाज

Maharashatra Weather News : राज्यात सध्या हवामानाच्या स्थितीमध्ये मोठ्या प्रमाणात विसंगती पाहायला मिळत आहे. तिथं …