रोगापेक्षा इलाज भयंकर ! सर्पदंशानंतर अघोरी उपाय; नागपूरच्या भोंदूबाबाचे अंगावर काटा आणणारे कृत्य

Nagpur Crime News :  सर्पदंशानंतर अघोरी उपाय करणा-या एका भोंदूबाबाचा नागपूरच्या रामटेकमध्ये पर्दाफाश झाला आहे. रामटेक तालुक्यातील कट्टा गावात साप चावल्यानंतर दवाखान्यात न नेता भोंदू बाबाकडे उपचारासाठी नेतात. अंगात साप येतो असं सांगून हा देवचंद कोकोडे नावाचा भोंदूबाबा दवाखान्यात घेऊन जाण्याची गरज नसल्याचं सांगतो. याच अघोरी उपायामुळे दोन महिला आणि एका पुरुषाचा मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त केला जातो. 

या सगळ्याचं बिंग फोडण्यासाठी नागपूरच्या वाईल्डलाईफ वेल्फेर सोसायटीच्या नितीश भांदक्कर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी साप चावल्याचा बनाव करून या भोंदूबाबाच्या भोंदूगिरीचा धक्कादायक प्रकार समोर आणलाय. विशेष म्हणजे हा सर्व प्रकार त्यांनी कॅमे-यात शूट केला. याप्रकरणी जिल्ह्याधिका-यांकडे कारवाईची मागणी केलीय. अखिल भारतीय अनिसनंही याबाबत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. 

असा झाला भोंदू बाबाचा पर्दाफाश

 हा प्रकार दुर्गम भागात नाही तर उपराजधानी पासून सुमारे 60 किलोमीटर अंतरावरील रामटेक तालुक्यातील कट्टा गावात सुरू आहे. पण नागपूरच्या वाईल्ड लाईफ वेल्फेअर सोसायटीच्या पदाधिकऱ्यांनी हा धक्कादायक प्रकार चित्रित करून भोंदूगिरी उघडकीस आणली आहे. या अघोरी उपायाने तीन जणांचा उपचाराने मृत्यू झाल्याची चर्चा आहे. 

हेही वाचा :  Exclusive: एतशाचा गुढीपाडवा लुक आहे कमाल, पारंपरिक वेषातील नाजूक नार

अघोरी उपाय

अंगात साप आला आणि यात सापाने आता विष पिणार असल्याच  सांगत पायाला चिरा मारून तिथून रक्त काढून पातेल्यात टाकून सापाचा विष बाहेर पडल आता घाबरण्याची गरज नाही असे सांगत अघोरी उपाय केला जातो.

साप अंगात येऊन विष पितो 

पावसाळा सुरू आहे सर्पदंशच्या अनेक घटना घडतात. रामटेक तालुक्यातील या भागात साप चावलेल्या व्यक्तीला कट्टा गावातील काही लोकांकडे नेले जाते. जे मंत्र म्हणत सापाचे विष उतरवतात असा दावा करतात. हिस…हिस्स… असा आवाज काढता डसलेला साप अंगात येतो. त्यानंतर अंगात साप आलेला भोंदूबाबा हा सापा सारखा सरपटायला लागतो. तसा आवाजही काढतो. साप अंगात येतो आणि शरिराच्या कुठेही चावला तरी हे पायातून विष शोषून घेतो असे सांगत बाबाचे चेले हे मंत्र आणि बाऱ्या म्हणत तेथील चेले चपाटे सांगत असल्याची माहिती वाईल्ड लाईफ वेल्फेअर सोसायटीची नितेश भांदक्कर यांनी दिली. 

सापाप्रमाणे वेगवेगळे विष उतरवणारे वेगवेगळे भोंदू बाबा

सापाचा जाती आहे त्या प्रमाणे ते विष उतरवणारे वेगवेगळे भोंदू बाबा आहेत. हे सगळे उपचार करत असल्याचं वाइल्ड लाईफ वेल्फेअर सोसायटीचे केशव वानखडे यांनी सांगितलं. या धक्कादायक प्रकारची माहीती पडल्यावर नागपुरातील वाईल्ड लाईफ वेल्फेअर सोसायटीच्या नितीश भांदक्कर यांनी एका सहकाऱ्यांच्या हाताला पिन टोचून सर्प दंश झाल्याचं सांगून हा सगळा धक्कादायक प्रकाराचा व्हिडीओ रेकॉर्ड करून पोलिसात तक्रार दिली. सोबत या सगळं व्हिडिओ देऊन जिल्हाधिकारी आणि पोलीस विभागाला देऊन कारवाईची मागणी केली. 

हेही वाचा :  मलायका मिनी शर्ट ड्रेस व डोळ्यांवर गॉगल घालून ऐटीत बसली रिक्षात अन्

यात अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राष्ट्रीय महासचिव हरीश देशमुख यांनी पोलिसांनी तसेच दक्षता अधिकाऱ्यांनी कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच कायद्यानुसार हा प्रकार गुन्हा ठरत असल्याच सांगत शिक्षेची तरतूद आहे. जिल्हाधिकारींनी या प्रकरणांमध्ये बैठक घेत अशा पद्धतीने अघोरीवृत्त होऊ नये यासाठी जादूटोणा विरोधी कायद्याची माहिती प्रचार प्रसार करण्याच्या सूचना दिल्याचेही देशमुख यांनी सांगितले. 



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Raj Thackeray : ‘नारायण राणे मुख्यमंत्री झाले अन्…’, राज ठाकरेंनी भरसभेत घेतली फिरकी; सांगितला ‘तो’ किस्सा!

Raj Thackeray Kankavli Sabha : एकेकाळचे दोन शिवसैनिक आज तब्बल 20 वर्षांनी एकाच मंचावर दिसले. …

Maharastra Politics : कोकणात ‘ह्याका गाड, त्याका गाड’… तो काय गाडणार? ठाकरेंवर राणेंचा ‘प्रहार’

Uddhav Thackeray vs Narayan Rane : कोकणात लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं उद्धव ठाकरे विरुद्ध नारायण राणे …