अभिनेत्री सई ताम्हणकर EX पतीबाबत स्पष्टच म्हणाली “त्या दिवशी रात्रभर दारू प्यायलो अन्…”

अभिनेत्री सई ताम्हणकरने मराठीसह बॉलिवूडमध्येही आता स्वतःचं एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. वेगवेगळ्या भूमिकासाकारुन सईने चाहत्यांच्या मनात आपली जागा निर्माण केली आहे.ती स्वतः आपल्या खासगी आयुष्याबाबत उघडपणे बोलताना दिसते. सईचं लव्ह लाईफ नेहमीच चर्चेत असतं. सध्या ती एका व्यक्तीला डेट करत असल्याच्या बऱ्याच चर्चा रंगताना दिसतात. पण पूर्वाश्रमीच्या पतीबाबत सईने यापूर्वी बोलणं बऱ्याचदा टाळलं. पण नुकतंच सिद्धार्थ कननला दिलेल्या मुलाखतीमध्ये तिने आताही पूर्वाश्रमीच्या पतीशी मी बोलत असल्याचं सांगितलं.मराठी अभिनेत्री सई ताम्हणकरने तिच्या EX पतीबाबत नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये खुलासा केला आहे. (फोटो सौजन्य : @saietamhankar)

​नक्की काय म्हणाली सई

या मुलाखतीमध्ये सई म्हणाली, “आताही मी माझ्या EXपतीला भेटते. ते क्षण मी शब्दांमध्ये व्यक्त करू शकत नाही. आजही मी त्याच्याशी बोलते. तसेच ज्या दिवशी दोघांनीही कोर्टामध्ये जाऊन जेव्हा सही केली त्याचदिवशी आम्ही पार्टी केली. आम्ही मित्र-मंडळींना पार्टीसाठी बोलावलं.”

(वाचा :- माझी कहाणी: कशी नशिबाने थट्टा मांडली, ज्या व्यक्तीचा मी प्रचंड तिरस्कार केला, त्याच्याच सोबत लग्न माझं होणार आहे)

हेही वाचा :  कार्तिक आर्यनचा धमाकेदार चित्रपट 'शेहजादा'चा ट्रेलर 12 जानेवारीला रिलीज होणार

​नावाचे टॅटू देखील काढले

२०१३ मध्ये सई ताम्हणकरने अमेय गोसावी लग्न केलं होतं. मात्र सई आणि अमेयचं लग्न केवळ दोनच वर्ष टिकलं. २०१५ मध्ये सईने अमेयला घटस्फोट दिला.तिच्या खांद्यावरील दोन तारखांपैकी एक तारीख लग्नाची आहे.तर दुसरी तारीख ही अमेयने प्रपोज केलेल्या दिवसाची आठवण म्हणून तिने खांद्यावर गोंदवलीय. सईने मला सांगितले की त्या रात्री आम्ही पार्टी केली एन्जॉय केलं. आमच्या नात्यामध्ये समजूतदारपणा होता. मी त्याच्या वाढदिवसाच्या तारखेचा टॅटू देखील काढला. अजूनही ते टॅटू तसेच आहेत. एक वेळ अशी येते की जे तुम्हाला चांगलं वाटतं ते तुम्ही करता. मग त्या गोष्टीची लाज कसली? मग त्या आठवणी पुसून टाकण्यामध्ये काय अर्थ? म्हणूनही आजही ते टॅटू मी घेऊन मिरवते.”

(वाचा :- शोएब मलिकशी लग्न करण्यासाठी सानिया मिर्झाने तोडला होता साखरपुडा, आणि आज या नात्यावर घटस्फोटाचे ढग)

​माणूस म्हणून चांगले व्हा

तुम्ही माणूस म्हणून चांगले होणं गरजेच आहे. तुमच्या आयुष्यात झालेल्या घटनांचा राग किंवा त्यांबद्द्ल थयथयाट करण्यापेक्षा ती गोष्ट स्विकारा त्यामुळे माणूस म्हणून चांगले होणे गरजेचं आहे.

हेही वाचा :  टोमणे मारणे, मित्राच्या पत्नीबरोबर पतीचं अफेअर असल्याचे आरोप करणे ही क्रूरताच : हायकोर्ट

​भूतकाळाचा विचार करु नका

तुम्ही जास्त काळ भूतकाळामध्ये जगू शकत नाही. याचा परिणाम भविष्यावर देखील होतो त्यामुळे भूतकाळाचा जास्त विचार करु नका. वर्तमानात जगा त्यामुळे तुमचे आयुष्य सुखकर होईल.

​वाद संपवायला शिका

तुमच्या आयुष्यात निर्माण झालेले वाद संपवायला शिका हे वाद तुमच्या डोक्यात राहिल्याने तुम्हालाच त्रास होईल. त्यामुळे तुमच्या आयुष्यातील वाद संपवा आणि मग पुढे जा.

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

‘राज ठाकरेंचे देव बदलू शकतात, ते नकली अंधभक्त! त्यांनी वेळ काढून..’; राऊतांचा टोला

Sanjay Raut On Raj Thackeray: महाराष्ट्र नवनिर्मा सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे नकली अंधभक्त आहेत, असा टोला …

सिनेस्टाइल पाठलाग करत उधळला डाव, गाडीतील वस्तू पाहून पोलिसही थक्क, तब्बल 2 कोटींचे…

Sandalwood Smuggling: भारताचे ‘लाल सोनं’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चंदनाची खुलेआम तस्करी होत असल्याचे पुन्हा एकदा …