टोमणे मारणे, मित्राच्या पत्नीबरोबर पतीचं अफेअर असल्याचे आरोप करणे ही क्रूरताच : हायकोर्ट

Delhi High Court Husband Wife Relation: दिल्ली हायकोर्टाने पती-पत्नीच्या नात्यासंदर्भात एक महत्त्वाचं निरिक्षण नोंदवलं आहे. पतीचे विवाहबाह्य संबंधांचे निराधार आरोप करणं तसेच सार्वजनिक ठिकाणी त्याच्यावर व्याभिचाराचा आरोप करुन त्याला आरोपी असल्यासारखं चित्रित करणं क्रूरता असल्याचं हायकोर्टाने म्हटलं आहे. हा आधारावर घटस्फोट देण्याचा परवानगी दिली जाऊ शकते असं कोर्टाचं म्हणणं आहे.

कोर्टाने काय म्हटलं?

न्यायमूर्ती सुरेश कुमार कैत यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने कौटुंबिक न्यायालयाच्या निर्णयाविरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवरील सुनावणीदरम्यान हे निरिक्षण नोंदवलं. कौटुंबिक न्यायालयाचा निकाल हायकोर्टाने कायम ठेवला आहे. पत्नी विवाहबाह्य संबंध असल्याचा आरोप करुन क्रूरपणे वागत असल्याच्या प्रकरणात कोर्टाने घटस्फोटासाठीचा अर्ज मान्य केला होता. या निकालाविरोधात दाखल केलेली याचिका कोर्टाने फेटाळून लावत पत्नीने पतीविरोधात असे बिनबुडाचे आरोप करणं हा क्रूरपणाच असल्याचं म्हटलं आहे. हायकोर्टाने, “पती-पत्नीमधील नात्यात गरज पडेल तेव्हा एकमेकांचा सन्मान करणं किंवा एकमेकांसाठी सुरक्षेची हमी देण्याची अपेक्षा असते,” असं म्हटलं आहे. जोडीदाराच्या चारित्र्यावर किंवा निष्ठेवरुन सतत त्याला टोमणे मारणं हा मानसिक त्रास देण्याचाच प्रकार आहे, असंही कोर्टाने नमूद केलं आहे. 

हेही वाचा :  Wife Swapping : ''तू माझ्या मित्रासोबत आणि मी त्याच्या पत्नीसोबत…'', पतीच ठरवायचा पत्नीने कोणाशी ठेवायचे संबंध

ऑफिसवाल्यांसमोर करायची आरोप

लग्नबंधनात अडकलेल्या 2 व्यक्तींच्या नातं हे एकमेकांना दिला जाणारा सन्मान आणि विश्वासावर आधारित असतं. एका क्षमतेपेक्षा अधिक प्रमाणात तडजोड करावी लागत असेल तर हा नात्याचा शेवट आहे असं समजता येईल, असंही कोर्टाने म्हटलं आहे. कोर्टाच्या आदेशामध्ये असं म्हटलं आहे की, या प्रकरणामध्ये पत्नी पतीला सार्वजनिकरित्या त्रास देत होती आणि अपमानित करत होती तसेच टोमणे मारुन शाब्दिक हल्ले करत होती. पत्नी पतीच्या ऑफिसच्या मिटींग्सदरम्यान आणि कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये सर्वांसमोर पतीवर विवाहबाह्य संबंध असल्याचा आरोप करण्यापर्यंत गेली होती. आपला पती हा व्याभिचारी आहे असं चित्र त्याच्या ऑफिसमधील सहकाऱ्यांसमोर उभं करण्यात कोणतीही कसर महिलेने सोडलेली नाही, असंही कोर्टाने म्हटलं आहे. 

नपुंसकतेची चाचणी करायला भाग पडलं

“आपल्या मित्राची पत्नी असलेल्या दुसर्‍या विवाहित महिलेशी कथित विवाहबाह्य संबंधांबद्दल शंका व्यक्त करणं हा क्रूरतेचा भाग आहे. अशाप्रकारे बेपर्वा, बदनामीकारक, अपमानास्पद आणि बिनबुडाचे आरोप एका जोडीदाराने केल्यास ज्याचा सार्वजनिकरित्या परिणाम होतो. दुस-या जोडीदाराची प्रतिमा मलिन करणे, हे अत्यंत क्रूरताच आहे. क्रूरतेशिवाय याला दुसरं तिसरं काहीच म्हणता येणार नाही,” असं कोर्टाने म्हटलं आहे. न्यायालयाने नमूद केले की, पत्नीने तिचा नवरा नपुंसक असल्याचा दावा केला आणि त्याला नपुंसकतेची चाचणी करण्यास भाग पाडले. यामध्ये तो फिट असल्याचे आढळले. अशा आरोप हा मानसिक क्रुरतेचा भाग आहे, असं कोर्टाने म्हटलं.

हेही वाचा :  अजब लग्नाची गजब गोष्ट! लग्नानंतर पत्नीने सांगितलं, मी कांताबाई... 'लग्नात चपात्या बनवायला आली होती'

मुलाला हत्यारासारखं वापरलं

पत्नीनेही आपल्या मुलाला पतीपासून दुरावले, जे क्रूर मानसिकतेचे लक्षण आहे, असेही कोर्टाच्या निकालात नमूद करण्यात आले आहे. “एखाद्या पालकाने मुलाला अशाप्रकारे जाणूनबुजून जोडीदारापासून वेगळे करणे हे पालकांसाठी मानसिक क्रूरतेसारखे आहे. या प्रकरणामध्ये मुलाला वडिलांविरुद्ध शस्त्र म्हणूनही वापरले गेले,” असे न्यायालयाने नमूद केले.



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

‘पत्नीसोबत अनैसर्गिक शरीर संबंध गुन्हा नाही’, कोणत्या प्रकरणात हायकोर्टाने दिला निर्णय?

Unnatural Intercourse: पती पत्नीमध्ये अनेक कारणांवरुन वाद होत असतात. हे वाद टोकाला गेले की कोर्टाची …

पाणीटंचाईमुळे गावातील तरुणांचं लग्न थांबलं, वर्ध्याच्या 8 गावांची 60 वर्षांपासून पाण्यासाठी लढाई

Wardha Drought 8 village : उन्हाळा लागला की पाणी समस्या सगळीकडे बिकट होताना बघायला मिळते. …