मणिपूर हिंसाचराचा विरोध करायला गेलेल्या महिलेसोबत अश्लील कृत्य; आरोपीला अटक

Bengaluru Crime : महिला प्रवाशासमोर हस्तमैथुन करून अश्लील मेसेज पाठवल्याप्रकरणी बंगळुरू पोलिसांनी (Bengaluru Police) शनिवारी रॅपिडो (Rapido) चालकाला अटक केली. महिलेने आरोप केला आहे की चालकाने रस्त्यातच हस्तमैथुन केले आणि तिला खाली उतरवल्यानंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. मणिपूर हिंसाचाराच्या (Manipur Violence) विरोधात आयोजित केलेल्या आंदोलनावरुन परतत असताना हा सगळा धक्कादायक प्रकार घडला आहे. टाऊन हॉलमधून घरी परतण्यासाठी पीडितेने रॅपिडोवरुन बाईक टॅक्सी बुक केली होती. ऑटो रिक्षातून जाण्यास अनेकांनी नकार दिल्यानंतर रॅपिडोवरुन राईड बुक करावी लागले असे महिलेनं सांगितले. या सगळ्या प्रकाराची माहिती महिलेनं ट्विटरवर दिली आहे.

मणिपूरमधील दोन महिलांवर झालेल्या अत्याचाराच्या विरोधात बंगळुरू येथे आंदोलनात सहभागी होऊन घरी परतणाऱ्या महिलेला लैंगिक छळाचा सामना करावा लागला. घरी जाण्यासाठी रॅपिडो मोबाईल अॅपद्वारे बाइक बुक केल्याचा दावा महिलेने केला आहे. “चालक एका हाताने गाडी चालवत होता आणि दुसऱ्या हाताने हस्तमैथुन करत होता. प्रवासादरम्यान आपण खूप घाबरली होतो. घरी सोडल्यानंतर त्याने व्हॉट्सअॅपवर कॉल आणि मेसेज करायला सुरुवात केली,” असे महिलेने सांगितले. 

पीडित महिला सामाजिक कार्यकर्त्यी असून मणिपूरमध्ये दोन महिलांना विवस्त्र करून रस्त्यावर परेड केल्याच्या विरोधात बंगळुरूमध्ये झालेल्या आंदोलनात सहभागी झाली होती. आंदोलनात भाग घेतल्यानंतर महिलेने टाउन हॉल ते इलेक्ट्रॉनिक सिटी येथील तिच्या घरापर्यंत रॅपिडो बाइक बुक केली होती. मोबाईल अॅप्लिकेशनमध्ये दुचाकीचा नोंदणी क्रमांक वेगळा होता, असेही पीडितेने म्हटले आहे.

हेही वाचा :  संतापजनक! धावत्या AC ट्रेनमध्ये तरुणीवर बलात्कार, आरोपीने स्वत:ला बाथरुममध्ये केलं कैद

“प्रवासादरम्यान आम्ही एका अशा भागात पोहोचलो जिथे आजूबाजूला कोणतीही वाहने नव्हती. धक्कादायक बाब म्हणजे ड्रायव्हर एका हाताने गाडी चालवू लागला आणि दुसऱ्या हाताने हस्तमैथुन करू लागला. भीतीपोटी, मी संपूर्ण घटनेदरम्यान शांत राहिलो. मला घरी सोडल्यानंतर त्याने मला व्हॉट्सअॅपवर सतत कॉल आणि मेसेज करायला सुरुवात केली. हे सर्व थांबवण्यासाठी मला त्याचा नंबर ब्लॉक करावा लागला,” असे ट्विट पीडित महिलेनं केले आहे.

दरम्यान, पीडितेने व्हॉट्सअॅप मेसेजचा स्क्रिनशॉट ट्विटरवर पोस्ट केला आहे. महिलेने सांगितले की, ड्रायव्हर तिला वेगवेगळ्या नंबरवरून कॉल करत आहे. महिलेच्या आरोपाला उत्तर देताना, बेंगळुरू पोलिसांच्या अधिकृत हँडलने वापरकर्त्याचे संपर्क तपशील मागितले आहेत. महिलेच्या ट्विटर पोस्टनंतर पोलिसांनी तपास सुरू केला. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रॅपिडो चालकाला अटक करण्यात आली आहे.



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

‘असा कसा डॉक्टर बनणार रे तू?’; छोट्या भावाला डॉक्टर बनवण्यासाठी मोठा भाऊ देत होता परीक्षा

Fraud in NEET 2024: देशभरातील मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश घेण्यासाठी नॅशनल एलिजिबीलीटी एन्ट्रन्स टेस्ट घेण्यात येते. …

Gold Price Today: ऐन लग्नसराईच्या दिवसांत सोने महागले, आज पुन्हा दरात वाढ; 10 ग्रॅमचा भाव जाणून घ्या

Gold Silver Price Today in Maharashtra: आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर कोसळले असले तरी देशातील बाजारपेठेत …