‘तीन मिनिटात संपूर्ण ब्राम्हणांना…’ धमकी देणाऱ्या जरांगे समर्थकावर गुन्हा दाखल

Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठीचं उपोषण आंदोलन तात्पुरतं स्थगित करण्याची घोषणा मनोज जरांगेंनी (Manoj Jarange Patil) केलीय. 3 मार्चपर्यंत आंदोलन स्थगित करण्यात आल्याचं जरांगेंनी जाहीर केलंय. अंतरवालीसह राज्यातील आंदोलनाविरोधातली दडपशाही थांबवण्यासाठी तसंच सगेसोयरे कायद्यासाठी आजपासून पंतप्रधान, राष्ट्रपती यांना ईमेल करा असं आवाहन जरांगेंनी मराठा समाजाला केलंय.  मनोज जरांगेंनी सरकारला नवा इशारा दिलाय, मला अटक केली तर महाराष्ट्रात जागोजागी मराठे उपोषणाला (Hunger Strike) बसतील असा इशारा जरांगे-पाटलांनी दिला सरकारचा सगेसोयरे विषयावर चर्चाच करायची नाही, तोडगाच काढायचा नाही असा आरोपही जरांगेंनी केलाय.. 

जरांगे समर्थकावर गुन्हा
दरम्यान, जरांगेसमर्थकावर पुण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तीन मिनिटात अख्या ब्राह्मणांना संपवू अशी धमकी या तरुणाने दिली होती. काही दिवसांपासून तीन मिनिटात संपूर्ण ब्राह्मण समाज संपवून टाकू अशी धमकी देणारा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत होता. याच प्रकरणी परशुराम सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष विश्वजीत देशपांडे यांनी तक्रार केली होती. या तक्रारीच्या आधारे या तरुणावर  भा.द.वी. 153 अ व 506 या कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सिंहगड रोड पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल झाला आहे. 

हेही वाचा :  ‘ही गुलाबी हवा' प्राजक्ताकडे पाहून कलेजा खलास झाला, सौंदर्यवतीच्या अदांनी चाहते घायाळ

मनोज जरांगे यांचं स्पष्टीकरण
मी त्याला एकट्याला बोललो आहे ब्राम्हण समाजाला नाही, असं स्पष्टीकरण जरांगे पाटील यांनी दिलं आहे.  त्यांनी धोका दिलाय म्हणून त्यांना बोललो, मात्र तुम्ही नेत्या कडून बोलताय, गोर गरिबांची तुम्ही फसवणूक करताय असा आरोप जरांगे पाटील यांनी केलाय. मराठा समाजात गरसमज नको, काय चौकशी व्हायचा होऊ द्या, 3 मार्च पर्यंत आपण आपले कार्यक्रम स्थगित केले आहे त्याऐवजी गावागावात धरणे आंदोलन करा, असं जारंगे पाटील यांनी सांगितलं आहे.  सरकारची दडपशाही सुरुय, गृह मंत्र्यांनी अंतरवलीत मंडप काढायचे आदेश दिले, तो मंडप मराठ्यांची अस्मिता आहे, सरकारला गृह मंत्र्याला सांगणे आहे असले चाळे बंद करा, ते काही दहशतवादी केंद्र नाही, दडपशाही बंद करा असा इशाराही जरांगें दिला आहे. तसंच आजपासून मराठे राष्ट्रपती पंतप्रधान, राज्यपाल याना ई-मेल करणार, दडपशाही थाबवा, आणि सगे सोयरे कायदा करा असा ई-मेल करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. 

मी बेईमानी करणार नाही मी तडफडून मरेल, शांततेत रस्ता रोको केले त्यांच्यावर गुन्हे दाखल केले, 10 टक्के आरक्षण विद्यार्थ्याना घेऊ द्या मात्र आमची मागणी ओबीसी मधून आरक्षण आहे असं पुन्हा एका जरांगे यांनी स्पष्टे केलं आहे.  8 दिवस बघू शांतपणे हे काय करताय ते, शांत राहावे मराठ्यांनी, कोण काय करताय बघू.  जालना एसपीला विनंती, गृहमंत्री जाणूनबुजून करताय तुम्ही त्यांचं ऐकून कारवाई करू नका, अंतरवली मंडप काढू नका, आणि मराठ्यांना त्रास देऊ नका.

हेही वाचा :  'अशा आंदोलनांचा इतिहास लक्षात घेता काही...'; मराठी अभिनेत्याचा जरांगे-पाटलांना पाठिंबा

एकूण जो अंदाज दिसतोय, षडयंत्र रचणे , ट्रॅप करणे, 10 टक्के आरक्षण घ्या म्हणून माझ्यावर दडपण आणलं जात आहेत, यामुळे ते मला 100 टक्के अटक करणार. मी शेतकऱ्यांचा मुलगा आहे मला ते धरणार. आम्ही 10 टक्के आरक्षण आम्ही नाकारले नाही पण ते टिकणार आहे का, त्या विरोधात याचिका दाखल झालीय, ते आरक्षण घात करणारं आहे. सरकारला मी काय सांगावे आरक्षण कसे टिकणार नाही, सरकारकडे अभ्यासक नाही का
आमची मागणी ओबीसी आरक्षण, आणि सगे सोयरे कायदा बस, गृहमंत्री तुम्ही आम्हाला सारथी दिली म्हणता, महामंडळ दिल म्हणता त्या अटी किती जाचक बघा, फायदा झाला का बघा, सारथी चे मुलं उपोषणाला बसले आहेत, असं जरांगे-पाटील यांनी म्हटलं आहे.  

तुमच्या हिताचे सांगतो शहाणपण येत असेल तर मराठ्यांची लाट अंगावर घेऊ नका, मी बरं झालो की दौऱ्यावर निघणार, सध्या चालता येत नाहीए.  त्यांनी माझ्या विरोधात आमदार मंत्री उभे केले, कर,  होऊ दे पाणी का पाणी
मला मराठा समाज मारू देणार नाही, तुम्ही मला अटक केली तर राज्यात सगळीकडे मराठे दिसतील, सरकारने आताही यावे, चर्चा करावी तोडगा काढला असं आवाहनही जरांगे पाटील यांनी केलं आहे. 

हेही वाचा :  'खरंतर बोलू नये पण परिस्थिती अशी आहे म्हणून...'; उपोषण करणाऱ्या जरांगे पाटलांच्या प्रकृतीसंदर्भात डॉक्टरची पोस्ट

माझ्या विरोधात गुन्हा दाखल करताय करु द्या, न्यायालय मला न्याय देईल मात्र त्यांनी ही आम्हाला फसवले आहे जेवढे मंत्री आले त्या सगळ्यांनी फसवले सगळ्या विरोधात आम्ही तक्रारी करणार, तुम्ही पाऊल उचला आम्ही पण सुरू करतो मग असा इशाराही जरांगे यांनी दिला आहे. 



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

ATM मधून फाटलेल्या नोटा निघाल्यात? घाबरू नका, ‘या’ पद्धतीने मिळवा कोऱ्या करकरीत नोटा

Damaged Note Exchange RBI Rule: एटीएममध्ये पैसे काढायला गेल्यानंतर अनेकदा त्यातून फाटलेले नोटा येतात. एटीएममधून …

राणेंनी मंत्रीमंडळात काय दिवे लावले? राऊतांचा सवाल; राज ठाकरेंना म्हणाले, ‘वकिली करणाऱ्यांनी..’

Sanjay Raut Slams Narayan Rane Raj Thackeray: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी नारायण राणेंसाठी …