राज ठाकरेंच्या ताफ्यामुळे दिव्यात वाहतूक कोंडी; मनसे कार्यालयाच्या उद्घाटनात रेटारेटी | Railway station MNS chief Raj Thackeray Mobile cameras traffic akp 94


रेल्वे स्थानकातून बाहेर पडणाºया प्रवाशांना गर्दीतून वाट काढत शीळ रस्त्याने जाताना दमछाक होत होती.

डोंबिवली : दिवा पूर्व रेल्वे स्थानकाजवळील मुख्य बाजारपेठेतील एका गृहसंकुलात शनिवारी संध्याकाळी मनसेच्या दिवा जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमासाठी संध्याकाळी पाच वाजल्यापासून कार्यालयाच्या बाहेर ढोलपथकांनी मुख्य रस्ता अडवून ठेवला होता. त्यामुळे संध्याकाळी पाच ते आठ असे तीन तास रस्त्यावरील कोंडीने प्रवासी हैराण झाले होते.

रेल्वे स्थानकातून बाहेर पडणाºया प्रवाशांना गर्दीतून वाट काढत शीळ रस्त्याने जाताना दमछाक होत होती. राज ठाकरे येणार म्हणून त्यांची छायाचित्रे टिपण्यासाठी शेकडो मनसे कार्यकर्ते या गर्दीत मोबाइल कॅमेरे लावून बसले होते. या गर्दीमुळे अनेक रिक्षाचालकांनी नाराजी व्यक्त केली. काही रिक्षाचालकांनी प्रवासी वाहतूक करणे शक्य नसल्याने घरचा रस्ता धरला. दिवा पूर्व रेल्वे स्थानकातून शीळ दिशेने जाण्यासाठी चंद्रांगण संकुलावरून पुढे जावे लागते. या संकुलात मनसेचे कार्यालय सुरू करण्यात आले आहे. सोसायटीच्या आतील भागातील अरुंद जागेत कार्यालयाचे उद्घाटन आणि राज ठाकरे  यांचा सत्कार ठेवण्यात आला होता. व्यासपीठावर राज एकीकडे हारतुरे स्वीकारत असताना खासगी कमांडो आणि पोलीस गर्दीला रेटत होते.

हेही वाचा :  VIDEO : मोहम्मद सिराजच्या नव्या हेअरस्टाइलची चहलनं उडवली खिल्ली; श्रेयस अय्यरलाही हसू आवरेना!

अखेर भाषण न करताच  राज यांनी वाहनात बसून परतीचा प्रवास सुरू केला. या गर्दीतून त्यांचे वाहन काढताना त्यांच्या खासगी सुरक्षारक्षकांनी प्रचंड धक्काबुक्की केली. मनसेचे स्थानिक नेते, पदाधिकारी हा सगळा रेटारेटीचा प्रकार पाहत होते.

राज ठाकरे निघून गेल्यावरही रस्त्यावरील कार्यकत्र्यांची गर्दी, त्यांची वाहने रस्ता अडवून उभी होती. त्यामुळे दिवा रेल्वे स्थानकातून शीळकडे जाणाºया रिक्षाचालक, प्रवासी, खासगी बस चालकांना खूप त्रास सहन करावा लागला.

ज्येष्ठांना त्रास

चंद्रांगण संकुलातील एका सोसायटीच्या अरुंद जागेत मनसे कार्यालयाचा उद्घाटन कार्यक्रम आयोजित केला होता. रहिवासी, शेकडो मनसे कार्यकर्ते एकावेळी आवारात एकत्र आल्याने प्रचंड गर्दी झाली. ज्येष्ठ नागरिक गर्दीत सापडून खाली पडले. महिलांना प्रचंड त्रास झाला. चित्रीकरण करणाºयांचा मंच रेटारेटीत कोसळला. काहींचे मोबाईलही गहाळ  झाले. 



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Maharastra Politics : ‘सर्वात मोठा घोटाळा, नियम ‘कात्रज’च्या धाब्यावर…’, रोहित पवारांचा मोठा गौप्यस्फोट

Rohit Pawar On Ambulance Scam : राज्याच्या आरोग्य विभागात साडेसहा हजार कोटींचा अँब्युलन्स घोटाळा झाल्याचा …

औरंगजेबाने तोडलेली मंदिर पुन्हा बांधण्यापासून महिलांची सेना बनवण्यापर्यंत..’, महाराणी अहिल्याबाईंची प्रेरणादायी कहाणी

Ahilyabai Holkar jayanti 2024: 31 मे रोजी  महाराणी अहिल्याबाई होळकर यांची जयंती साजरी केली जाते. …