VIDEO : मोहम्मद सिराजच्या नव्या हेअरस्टाइलची चहलनं उडवली खिल्ली; श्रेयस अय्यरलाही हसू आवरेना!


भारताने टी-२० मालिकेत श्रीलंकेला क्लीन स्वीप दिला. सामना संपल्यानंतर भारताचा फिरकीपटू यजुर्वेंद्र चहलने चहल सामनावीर श्रेयस अय्यर आणि मोहम्मद सिराज यांची मुलाखत घेतली. यामध्ये मोहम्मद सिराजने पाहुण्याची भूमिका साकारली. यादरम्यान चहल आणि अय्यर यांनी सिराजच्या हेअरस्टाइलची खिल्ली उडवली.

चहल अय्यरशी बोलत असताना सिराजही कॅमेऱ्यासमोर आला. मग चहलने त्याच्याशी थट्टा-मस्करी केली. सिराजने नवा हेअरकट केला आहे. त्याने आपले केस पिवळ्या रंगात रंगवले आहेत. सिराजचे आगमन होताच चहल म्हणाला, ”सिराजचे स्वागत आहे. त्याचे केस पहा, असे दिसते की खूप काळापासून गवताला (केसांना) कोणी पाणी दिलेले नाही. गलत पूर्णपणे सुकले आहे.”

हेही वाचा – PSL 2022 : ह्याला म्हणतात आत्मविश्वास..! संघाला चॅम्पियन बनवलं आणि सासऱ्याला चुकीचं ठरवलं; वाचा सविस्तर

चहलचे हे बोलणे ऐकून दोघेही हसायला लागले. चहलने सिराजला विचारले, प्रत्येक सामन्यापूर्वी तू हेअरकट सलूनमध्ये जातो हे खरे आहे का? यावर सिराज म्हणाला, ”असे काही नाही. अशा प्रकारे मी माझे केस कापतो. याला काही लॉजिक नसते.”

हेही वाचा :  कसोटी संघाचेही नेतृत्व रोहितकडे?; श्रीलंकेविरुद्धच्या ट्वेन्टी-२० मालिकेतून विराट विश्रांती घेण्याची शक्यता

तिसऱ्या टी-२० सामन्यात भारताने श्रीलंकेचा ६ गडी राखून पराभव केला. प्रथम खेळताना श्रीलंकेने ५ गड्यांच्या मोबदल्यात १४६ धावा केल्या. प्रत्युत्तरात भारताने श्रेयस अय्यरच्या नाबाद अर्धशतकाच्या जोरावर ४ गडी गमावून लक्ष्य गाठले. अय्यरने मालिकेतील सलग तिसरे अर्धशतक झळकावले. तो नाबाद राहिला.

The post VIDEO : मोहम्मद सिराजच्या नव्या हेअरस्टाइलची चहलनं उडवली खिल्ली; श्रेयस अय्यरलाही हसू आवरेना! appeared first on Loksatta.



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

NDA vs ‘INDIA’: तिसऱ्या टप्प्यात 93 जागांवर मतदान, मतदारांचा कौल कोणाला?

Loksabha Election 2024: तिस-या टप्प्यात म्हणजे 7 मे रोजी देशात 93 जागांवर मतदान होणार आहे… …

मुंबईत मराठी-गुजराती वाद पेटला! आदित्य ठाकरे आक्रमक; मराठी उमेदवाराला प्रचार न करु दिल्याचा आरोप

Loksabha Election 2024 : नोकरीसाठी मराठी माणूस नको ही एका एचआरची पोस्ट व्हायरल झालेली असतानाच …