फडणवीस यांच्याकडील ‘त्या’ पेनड्राईव्हबाबत मोठा खुलासा, कोणी व्हिडिओ बनवला?

पुणे :  Devendra Fadnavis’s pen drive : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी विधानसभेत केलेल्या व्हिडिओ बॉम्ब प्रकरणात नवी धक्कादायक माहिती समोर आली आहे. मूळचा जळगावचा असलेल्या तेजस मोरे याने विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांच्या कार्यालयात व्हिडिओ रेकॉर्डिंग केल्याची माहिती उघड झाली आहे. तेजस मोरे याने अ‍ॅड. चव्हाण यांना घड्याळ गिफ्ट दिले होते. त्या घड्याळात कॅमेरा बसवून व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्यात आल्याचा दावा प्रवीण चव्हाण यांनी केला आहे.

तेजस मोरे गेल्या दहा-बारा वर्षांपासून पुण्यात राहतो. जळगावात एका खंडणी प्रकरणात त्याला अटकही झाली होती. दरम्यान, व्हिडिओ बॉम्ब प्रकरण उघडकीस आल्यापासून तेजस मोरे याचे कुटुंबीय गायब झाले आहेत. त्याचा मोबाईलही स्वीच ऑफ येत असल्याचे समज आहे.

दरम्यान, विधानसभेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी राज्य सरकारवर गंभीर आरोप करत राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून दिली. राज्य सरकारच्या षडयंत्राचे पुरावे असल्याचं सांगत देवेंद्र फडणवीस यांनी  पेनड्राईव्ह (Pen Drive) विधानसभा अध्यक्षांना सुपूर्त केला. 

सरकारने विरोधकांना संपवण्याचा कट रचला असून यात सरकारी वकिलांची मदत घेतली गेली होती. स्वत: सरकारी वकिलांनी याची माहिती दिली असून याचे व्हिडिओ पेन ड्राईव्हमध्ये असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. देवेंद्र फडणवीस, गिरीश महाजन, जयकुमार रावल, सुभाष देशमुख, सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील आणि चंद्रशेखर बावनकुळे यांना संपण्याचा कसा कट रचला गेला आहे. याचे पुरावेच देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.

हेही वाचा :  पुण्याचा बिहार होतोय? पुण्यात पुन्हा कोयता गँगचा धुमाकूळ

तर दुसरीकडे हा व्हिडिओ जुना असल्याची चर्चा सुरु आहे. मात्र, माझ्याकडे सगळे पुरावे आहेत, असा पुनरउच्चार फडवणीस यांनी केला आहे. मात्र, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनीही जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. माझे उत्तर तयार आहे. पण, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उत्तर देण्यास वेळ मागितला. तशी विनंती केली. त्यामुळे सोमवारी सभगृहात उत्तर देईन, असे राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील (Home Minister Dilip Walse Patil) यांनी स्पष्ट केले आहे. माझ्या उत्तरानंतर दूध का दूध, पानी का पानी होईल. करारा जवाब मिलेगा, असे ठणकावून त्यांनी सांगितले.  



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

NDA vs ‘INDIA’: तिसऱ्या टप्प्यात 93 जागांवर मतदान, मतदारांचा कौल कोणाला?

Loksabha Election 2024: तिस-या टप्प्यात म्हणजे 7 मे रोजी देशात 93 जागांवर मतदान होणार आहे… …

मुंबईत मराठी-गुजराती वाद पेटला! आदित्य ठाकरे आक्रमक; मराठी उमेदवाराला प्रचार न करु दिल्याचा आरोप

Loksabha Election 2024 : नोकरीसाठी मराठी माणूस नको ही एका एचआरची पोस्ट व्हायरल झालेली असतानाच …