रशियाची कोंडी करण्याचा प्रयत्न, अमेरिकेने पुतीन यांच्या प्रवक्त्यावर केली ‘ही’ मोठी कारवाई


अमेरिकेने रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांचे प्रवक्ते दिमित्री पेस्कोव्ह यांच्या परिवारावर निर्बंध लादले आहेत.

रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धसंघर्ष अजूनही सुरुच आहे. तर दुसरीकडे नेटोमधील देशांसह इतर अनेक देशांनी युक्रेनला पाठिंबा दर्शविला असून रशियाची वेगवगेळ्या प्रकारे कोंडी केली जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून अमेरिकेने रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांचे प्रवक्ते दिमित्री पेस्कोव्ह यांच्या परिवारावर निर्बंध लादले आहेत.

पुतीन यांचे प्रवक्ते दिमित्री पेस्कोव्ह यांची पत्नी आणि मुले अलिशान जीवन जगत असून ते पेस्कोव्ह यांच्या मिळकतीच्या विसंगत आहे. त्यांनी ही संपत्ती पुतीन यांच्याशी असलेल्या संबंधाच्या जोरावर वाममार्गाने मिळवली असावी, असं अमेरिकेच्या ट्रेझरी विभागाने म्हटलं आहे. याच कारणामुळे अमेरिकेने पुतीन यांचे प्रवक्ते पेस्कोव्ह यांच्यावर निर्बंध लादले आहेत. याआधी पेस्कोव्ह यांची मुलगी एलिझावेता पेस्कोव्ह यांनी रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्याला जाहीरपणे विरोध केलेलाआहे.

रशियाची आर्थिक तसेच अन्य पातळीवर कोंडी व्हावी यासाठी जगातील अनेक देशांनी रशियावर निर्बंध लागू केले आहेत. रशियाकडून गॅस, तेल आयात करण्यास अमेरिकेने नुकतीच बंदी घातली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी तसे जाहीर केले होते. तर व्हिडीओ स्ट्रिमिंग मंच यूट्यूबने रशियाकडून निधी दिला जाणाऱ्या सर्व माध्यमांना ब्लॉक करण्याचा निर्णय नुकताच घेतला आहे. रशियन माध्यम स्पुतनिकने या बंदीला माध्यमांच्या स्वातंत्र्यावरील हल्ला आहे, असे म्हणत निषेध व्यक्त केला आहे.

हेही वाचा :  Russia Ukraine war : रशियाने न्यूक्लियर पाणबुड्या समुद्रात सोडल्या, आण्विक युद्धाचा धोका वाढला!

दरम्यान, युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी रशियावर गंभीर आरोप केले आहेत. रशियाने मेल्टिपूल शहराच्या महापौरांचं अपहरण केल्याचा दावा युक्रेनने केलाय. युक्रेन संसदेने याबाबत ट्विट करत अधिक माहिती दिली असून झेलेन्स्की यांनी त्याला पुष्टी दिली आहे.



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

अंधश्रद्धेचा कळस! अपघातात व्यक्तीचा मृत्यू, 20 वर्षांनी नातेवाईकांची रुग्णालयच्या गेटवर पूजा, कारण काय तर..

Superstition : देश 21 व्या शतकात वावरत आहे, पण अजूनही अंधश्रद्धा मूळापासून नष्ट करण्यात आपण …

‘माझ्याकडे चीप..ईव्हीएम हॅक करतो’ दीड कोटींचा सौदा; धक्कादायक कहाणी

EVM Machine Hack call: देशभरात लोकसभा निवडणुकीसाठी मतदान सुरु आहे.  ईव्हीएम मशिनच्या माध्यमातून हे मतदान …