sensex rises 86 points nifty ends above 16600 mark zws 70 | ‘सेन्सेक्स’मध्ये सलग वाढ


सप्ताहाअखेर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स ८५.९१ अंशांच्या वाढीसह ५५,५५०.३० अंशांवर स्थिरावला.

मुंबई : जागतिक पातळीवरील संमिश्र वातावरण आणि भू-राजकीय आघाडीवरील अनिश्चितता अजूनही कायम असली तरी शुक्रवारी सलग चौथ्या सत्रात देशांतर्गत भांडवली बाजारात प्रमुख निर्देशांक माफक वाढीसह सकारात्मक कल दर्शवीत बंद झाले.

सप्ताहाअखेर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स ८५.९१ अंशांच्या वाढीसह ५५,५५०.३० अंशांवर स्थिरावला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये ३५.५५ अंशांची वाढ झाली आणि दिवसअखेर १६,६३०.४५ पातळीवर बंद झाला.

सरलेल्या आठवडय़ात देशांतर्गत भांडवली बाजारात तेजीवाल्यांचा पगडा राहिला. मात्र येत्या आठवडय़ात महागाई दराची आकडेवारी आणि अमेरिकी फेडरल रिझव्‍‌र्हकडून अपेक्षित व्याजदर जाहीर होणार असल्याने गुंतवणूकदारांनी सावध पवित्रा घेतलेला दिसून येईल. महागाईने गेल्या ४० वर्षांचा उच्चांक गाठल्याने अमेरिकेतील शेअर बाजारात फेडच्या व्याजदर वाढीपूर्वीच घसरण झाली आहे. रशिया-युक्रेन युद्धामुळे जागतिक पातळीवर नव्याने निर्माण झालेल्या पुरवठा साखळीतील अडचणी आणि खनिज तेलाच्या वाढत्या किमतीमुळे भारतातदेखील महागाई दर मार्च महिन्यात अधिक राहण्याची शक्यता आहे, असे मत जिओजित फायनान्शियल सव्‍‌र्हिसेसचे संशोधन प्रमुख विनोद नायर यांनी व्यक्त केले.

सेन्सेक्समध्ये औषधी निर्माण कंपन्यांचे समभाग सर्वाधिक तेजीत होते. सन फार्माचा समभाग ३.८२ टक्के, डॉ. रेड्डीज २.०७ टक्क्यांनी वधारून बंद झाला. त्यापाठोपाठ आयटीसी, पॉवर ग्रिड, टायटन, एशियन पेंट्स आणि बजाज फिनसव्‍‌र्हचा समभाग सकारात्मक पातळीवर बंद झाले. दुसरीकडे नेस्ले, मारुती सुझुकी, एनटीपीसी, अ‍ॅक्सिस बँक, टीसीएस आणि टाटा स्टीलच्या समभागात प्रत्येकी १.५६ टक्क्यांपर्यंत घसरण नोंदविण्यात आली. सरलेल्या सप्ताहात सेन्सेक्सने १,२१६.४९ म्हणजेच २.३३ टक्क्यांनी झेप घेतली, तर निफ्टीने ३८५.१० (२.३७ टक्के) अंशांची कमाई केली आहे. 

हेही वाचा :  आता पुरुषही रोखू शकतात गर्भधारणा, ICMR ला मोठं यश; महिलांसाठी क्रांतिकारी बदल

रुपयात घसरण

अमेरिकन डॉलरच्या तुलनेत शुक्रवारच्या सत्रात रुपयाच्या मूल्यात १८ पैशांची घसरण झाली. तेल आयातदार आणि डॉलरच्या मागणीत वाढ झाल्याने, भारतीय चलनाने सकाळच्या सत्रात साधलेली वाढ गमावली आणि दिवसअखेर ७६.६१ प्रति डॉलर पातळीवर तो स्थिरावला.



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Silent Heart Attack मुळे तरुणाचा मृत्यू! बाईक चालवताना अचानक भररस्त्यात पडला अन्..

Man Died By Silent Heart Attack Know Symptoms: मध्य प्रदेशमधील इंदूरमध्ये मंगळवारी एक धक्कादायक घटना …

Loksabha Election 2024 : बारामतीत मतदानाला थंड प्रतिसाद; तिसऱ्या टप्प्यातील एकूण आकडेवारी नेमकं काय खुणावू पाहतेय?

Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठीचं मतदान मंगळवारी पार पडलं. यावेळी देशातील 11 …