“जब तक महाराष्ट्र में शिवसेना का सुपडा साफ नहीं करता…”, चित्रा वाघ यांचा संजय राऊतांना खोचक टोला!


चित्रा वाघ म्हणतात, “सर्वज्ञानींच्या झंझावाती प्रचारदौऱ्यांचा परिणाम…शिवसेनेच्या गोवा, युपीमधल्या सगळ्या उमेदवारांचं डिपॉझिट जप्त होताना दिसत आहे”

पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल आज लागणार असून प्राथमिक फेऱ्यांमधून आलेल्या आकडेवारीनुसार काँग्रेसची मोठी पीछेहाट होताना दिसत आहे. दुसरीकडे भाजपानं उत्तर प्रदेशमध्ये मोठी आघाडी घेतली आहे. शिवसेनेने उत्तर प्रदेश, गोवा, मणिपूर या राज्यांमध्ये उमेदवार उभे केले होते. मात्र, शिवसेनेला अपेक्षित मजल मारता आल्याचं या फेऱ्यांमध्ये दिसत नसताना राज्यात राजकारण रंगण्याची चिन्ह दिसू लागली आहेत. त्याचीच सुरुवात म्हणून भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी या निकालांवरून थेट संजय राऊत आणि शिवसेनेवर खोचक शब्दांत निशाणा साधला आहे.

संजय राऊत आणि चित्रा वाघ यांच्यामध्ये याआधी देखील कलगीतुरा रंगताना पाहायला मिळाला आहे. आज उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, गोवा आणि मणिपूर या पाच राज्यांच्या निवडणुकांचे निकाल लागणार असून प्राथमिक मतमोजणी फेऱ्यांमधून भाजपाची आगेकूच झाल्याचं दिसून येत आहे. उत्तर प्रदेशमध्ये देखील भाजपानं मोठ्या विजयाच्या दिशेने आगेकूच केली असून शिवसेनेला खातं उघडण्यात अद्याप यश आलेलं नाही. या पार्श्वभूमीवर भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी संजय राऊतांना टॅग करून ट्विटरवर निशाणा साधला आहे.

हेही वाचा :  Video : 'वर्ल्ड कप फायनलवेळी एअर इंडियाच्या विमानात...', खालिस्तानी दहशतवादी पन्नूची खुली धमकी!

UP Assembly Election Results 2022 Live: दिल्लीत भाजपा कार्यालयाबाहेर सेलिब्रेशनची तयारी; मोदी होणार सहभागी

“सर्वज्ञानींच्या झंझावाती प्रचारदौऱ्यांचा परिणाम…शिवसेनेच्या गोवा, युपीमधल्या सगळ्या उमेदवारांचं डिपॉझिट जप्त होताना दिसत आहे. झुकेगा नहीं..जबतक महाराष्ट्र में इसी तरह शिवसेना का सुपडा साफ नहीं करता – इति सर्वज्ञानी”, असं चित्रा वाघ यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे. या ट्वीटमध्ये चित्रा वाघ यांनी संजय राऊतांना देखील टॅग केलं आहे.

“…तर काँग्रेसमध्ये स्फोट होतील”, योगेंद्र यादव यांनी वर्तवलं भाकित; म्हणाले, “२०२४मध्ये…”!

शिवसेनेने उत्तर प्रदेश, गोवा आणि मणिपूरमध्ये उमेदवार उभे केले होते. उत्तर प्रदेशमध्ये २२ ठिकाणी शिवसेनेनं उमेदवार उभे केले होते. मात्र, पहिल्या मतमोजणी फेऱ्यांमध्ये शिवसेना उमेदवारांच्या वाट्याला अद्याप यश आलेलं नाही.



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Maharastra Politics : ‘…तर पवारांची औलाद सांगणार नाही’, साताऱ्यात अजित पवारांची गर्जना, दुसरा खासदार फिक्स?

Maharastra Politics : सातारा लोकसभा मतदारसंघातून भाजपचे उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार …

बारामतीच्या जिरायती भागाचा शिक्का पुसण्यासाठी अजितदादांचा मास्टर प्लान

NCP Ajit Pawar On Baramati: बारामतीच्या जिरायती भागाचा शिक्का कायमस्वरूपी पुसण्यासाठी अजितदादांचा ॲक्शन प्लॅन तयार …