आज ८ मार्च म्हणजेच जागतिक महिला दिन. महिलांचे कर्तृत्व आणि सामर्थ्याचा सन्मान करण्याचा हा दिवस. या दिवशी वेगवेगळ्या महिला विशेष कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. तसेच, आजच्या दिवशी प्रत्येकजण आपल्या आयुष्यातील महत्त्वाच्या महिलांना शुभेच्छा आणि भेटवस्तू देतात. त्यांना धन्यवाद म्हणण्याचा हा एक लहानसा प्रयत्न असतो. असाच एक प्रयत्न केला आहे अभिनेत्री अंकिता लोखंडेचा पती विकी जैन याने. विकीने आज अंकिताला महिला दिनानिमित्त एक खास भेट वस्तू दिली आहे.
अभिनेत्री अंकिता लोखंडे काही महिन्यांपूर्वीच बॉयफ्रेंड विकी जैनसोबत विवाह बंधनात अडकली. मुंबईतील ग्रँड हयात या हॉटेलमध्ये या दोघांचा शाही विवाहसोहळा पार पडला. या लग्नसोहळ्यासाठी त्यांनी कोट्यावधींचा खर्च केला होता. अंकिता सोशल मीडियावर बरीच सक्रिय असून ती सतत तिचे आणि विकीसोबतचे फोटो आणि व्हिडीओ तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर करत असते.
“ते राजा अन् आम्ही…”, दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रीने कपिल शर्माच्या शो वर केले गंभीर आरोप
नुकताच तिने एक व्हिडीओ आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्ट केला आहे. विकी जैनसुद्धा या व्हिडीओमध्ये आहे. यामध्ये आपण पाहू शकतो की या महिला दिनी विकीने अंकिताला एक खास भेट दिली आहे. विकीने स्वतः याबाबत व्हिडीओमध्ये खुलासा केला आहे. तो म्हणाला आहे की प्रत्येक नवऱ्याने आज आपल्या बायकोला ही भेटवस्तू द्यायलाच हवी.
‘गंगूबाई काठियावाडी’नंतर आलिया भट्ट करणार हॉलिवूडमध्ये पदार्पण, चित्रपटाचे नावंही ठरलं!
विकी अंकिताला भेट म्हणून आजचा पूर्ण दिवस शांत राहणार आहे आणि ती जे सांगेल ते मुकाट्याने ऐकणार आहे. हेच तिच्यासाठी गिफ्ट असल्याचं त्याने या व्हिडीओमध्ये सांगितलंय. इतकंच नाही, तर प्रत्येक नवऱ्याने वर्षातून एकदा तरी हे गिफ्ट आपल्या बायकोला द्यायलाच हवं असेही तो म्हणाला आहे. यावर अंकिताला खूपच हसू आलं. विकीने अंकितासोबतच सर्व महिलांना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
The post International Women’s Day 2022 : अंकिता लोखंडेसाठी पती विकी जैनचे खास गिफ्ट, म्हणाला, ‘प्रत्येक नवऱ्याने…’ appeared first on Loksatta.