‘या’ भागात प्लेवर्ड कंडोमच्या मागणीत अचानाक वाढ, धक्कादायक कारण समोर

Condom addiction in youth : भारतातल्या एका राज्यात मेडिकल दुकानातून प्लेवर्ड कंडोमची  (Flavoured Condom) मागणी अचानक वाढली. कंडोम खरेदी करण्यात युवा वर्गाचा मोठ्या प्रमाणावर समावेश होता. याची दखल आरोग्य विभागने घेतली आणि प्लेवर्ड कंडोमच्या खरेदीमागे नेमकं कारण काय याचा शोध सुरु केला. आरोग्या विभागाच्या तपासात धक्कादायक कारण समोर आलं. पश्चिम बंगालमध्ये अनेक तरुण कंडोम नशेच्या (Condom Addiction) विळख्यात अडकले आहेत. ज्यामुळे कंडोमच्या विक्रीत अचानक वाढ झाली. इतकंच काय तर मेडिकल दुकानांमध्येही प्लेवर्ड कंडोमचा स्टॉक संपला.

युवा नशेच्या विळख्यात
युवा वर्ग मोठ्या प्रमाणावर नशेच्या विळख्यात अडकला आहे. कधी वाईट संगतीमुळे तर कधी प्रेस्टिज जपण्यासाठी नशा केली जाते. आणि हळूहळू याची सवयच लागते. नशा करण्यासाठी अनेक प्रकराच्या वस्तू वापरल्या जातात. यात पेंट,खोकल्याचं औषध, पेट्रोल, टायरचं पंक्चर काढणारी ट्यूब किंवा नेल पॉलिशचाही नशेसाठी वापर केला जातो. पण आता तरुणांकडून नशेसाठी चक्क कंडोमचा वापर केला जात असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलं आहे. 

अशी केली जाते कंडोमची नशा
पश्चिम बंगालच्या दुर्गापर भागात तरुणांमध्ये कंडोमची नशा करण्याचं फॅड पसरलं आहे. मेडिकल दुकानात फ्लेवर्ड कंडोम विकत आणातात त्यानंर ते गरम पाण्यात जवळपास एक तास भिजत ठेवतात (Condom Washed Water addiction) . एका तासानंतर कंडोमची केमिकल्स उतरतात आणि तेच पाणी नशा म्हणून प्यायलं जातं. या पाण्याची नशा जवळपास 10 ते 12 तास राहाते.

हेही वाचा :  Russia Ukraine War : प्रसिद्धीच्या मागे जाऊ नका, आपली मुलं वाचवा ; सुप्रिया सुळेंचं मोदी सरकारला आवाहन

दुर्गापूरमध्ये शिकण्यासाठी अनेक विद्यार्थी दुसऱ्या राज्यातून इथे येतात. इथे हे विद्यार्थी हॉस्टेलमध्ये राहातात. यात अनेक विद्यार्थ्यांना सिगरेट-दारू सारखं व्यसन जडतं. पण सिगरेट-दारू महागडं असल्याने नशेसाठी तरुण वेगवळा पर्याय निवडतात. यापैकी कंडोमची नशा ही सर्वात स्वस्त आणि सहज मिळणारी आहे. शिवाय कंडोम पाकिटात सहज ठेवता येतात आणि यासाठी डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनचीही गरज भासत नाही. त्यामुळे मोठा युवा वर्ग फ्लेवर्ड कंडोमच्या नशेकडे वळतात.

फ्लेवर्ड कंडोमचा वापर नशेसाठी केला जात असल्याचा खुलासा इथल्या एका विद्यार्थ्याने केला, त्यानंतर हे प्रकरण समोर आलं. पश्चिम बंगालच्या दुर्गापूर, विधान नगर, बेनाचिटी, मुचिपारा, सी झो, ए झोन या भागात प्लेवर्ड कंडोमची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढली होती. मेडिकल दुकानात विक्री वाढल्यानंतर एका मेडिकल दुकानादाराने कंडोम खरेदी करणाऱ्या विद्यार्थ्याला याचं कारण विचारलं. त्यावेळी या विद्यार्थ्याने प्लेवर्ड कंडोमचा वापर नशेसाठी केला जात असल्याचं सांगितलं. याची माहिती मेडिकल दुकानादारने आरोग्य विभागाला दिली. आरोग्य विभागाच्या तपासात कॉलेज कॅम्पसच्या आसपासच्या परिसात प्लेवर्ड कंडोमची खरेदी वाढल्याचं निष्पन्न झालं. इथल्या मेडिकल दुकानांमध्ये आधी एक ते दोन प्लेवर्ड कंडोम विकले जायचे. पण अचानक याची विक्री इतकी वाढली की मेडिकल दुकानांमध्ये याचा स्टॉकच उपलब्ध नाही. 

हेही वाचा :  Turkey Earthquake : NDRFने ढिगाऱ्याखालून 6 वर्षांच्या मुलीला जीवंत वाचवलं, अमित शहांनी शेअर केला Video

कंडोमची नशा धोकादायक
प्लेवर्ड कंडोमची नशा आरोग्यासाठी धोकादायक ठरु शकते. कंडोम तयार करण्यासाठी ठराविक केमिकल्सचा वापर केला जातो. ही केमिकल शरिरात गेल्यास कॅंसरचा धोका वाढू शकतो. याचे अनेक साईड इफेक्टही असल्याचं डॉक्टरांचं म्हणणं आहे.



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

सरकारच्या तिजोरीतून खेळाडूंना 11 कोटी रुपये देण्याची गरज काय? विजय वडेट्टीवार यांचा सवाल

Vijay Wadettiwar: राज्य सरकारनं क्रिकेटरना दिलेल्या निधीवरून वादंग पेटलंय. यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप …

मोठी बातमी! भाजपाचे शिंदे ठाकरे गटात; अंबादास दानवे म्हणाले, ‘महिनाभरात भाजपाचे किती लोक…’

लोकसभा निवडणूक निकालानंतर आता महायुती आणि महाविकास आघाडीकडून विधानसभा निवडणुकीची तयारी सुरु झाली आहे. यादरम्यान …