‘भाजपकडे स्वत:चं काय? तुरुंगात हवेत ते निवडणुकीच्या रिंगणात’ संजय राऊतांनी डागली तोफ

Sanjay Raut on BJP : एकिकडे सत्ताधारी भाजपकडून आगामी लोकसभा निवडणुकीच्या धर्तीवर जोरदार मोर्चेबांधणी सुरु असतानाच दुसरीकडून विरोधी पक्षाला सातत्यानं पडणारी खिंडारं भाजपच्या विजयाची वाट आणखी सोपी करताना दिसत आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेसारख्या पक्षांतून काही बड्या नेतेमंडळींनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतल्याचं पाहून फक्त मतदारच नव्हे, तर राजकीय मातब्बरांनाही धक्का बसत आहे. शिवसेनेच्या ठाकरे गटातील नेते, खासदार संजय राऊत यांनी भाजपच्या याच रणनितीवर ताशेरे ओढत नाशिक दौऱ्यादरम्यान पक्षावर तोफ डागली. 

भाजपकडून लोकसभा उमेदवारांची यादी जाहीर झाल्यानंतर त्यामध्ये 195 पैकी 70 जण आर्थिक घोटाळ्यांमुंळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेले आहेत, असंही ते रविवारी म्हणाले. भाजपच्या उर्वरित उमेदवारांच्या यादीतही राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेनेचेच लोक असून, भाजपकडे स्वत:चं काय आहे? असा सवाल त्यांनी केला. ‘ज्यांना तुरुंगात टाकायला हवं, त्यांना उमेदवारी देत भाजप निवडणुकीच्या रिंगणात उतरवत आहे’, असं म्हणताना अजित पवारांना शिखर बँक घोटाळा प्रकरणी दिलेली क्लीन चीट आणि अशोक चव्हाण यांना तुरुंगात टाकण्याची भाषा करता करता त्यांना थेट राज्यसभेवर पाठवण्याच्या भाजपच्या रणनितीवर त्यांनी कटाक्ष टाकला. ‘हीच का मोदी गॅरंटी…’ असा थेट प्रश्न राऊतांनी नाशिकमध्ये केला. 

हेही वाचा :  96.8Kg वजनामुळे दिसू लागली होती हाय बीपी-फॅटी लिव्हरची लक्षणे, ग्रीन टी पिऊन 5 महिन्यात कमी केलं 18Kg वजन

कृपाशंकर सिंह, अजित पवार आणि अशोक चव्हाण यांना तुरुंगात टाकण्याची भाषा देवेंद्र फडणवीस करत होते. पण, ज्या सिंह यांच्यावर गैरमार्गानं मिळवलेली संपत्ती, उत्पन्नाहून जास्त कमाई असे गंभीर आरोप होते त्यांनाच भाजपनं वाराणासीतील जौनपूरमधून उमेदवारी जाहीर केली आहे हा संदर्भ मांडत सडकून टीका केली. 



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

पृथ्वीचा शेवटचा देश कोणता? जिथे अवघे 40 मिनिटेंच होतो सूर्यास्त

पृथ्वी गोल आहे, अशा गोलाकार पृथ्वीचा शेवटचा देश कोणता? त्या देशाचं वेगळेपणं काय हे जाणून …

इथून पुढे Upi Transaction…; HDFC बँकेचा मोठा निर्णय, तुमच्यावरही होणार परिणाम

HDFC Bank Alert: एचडीएफसी बँकेच्या ग्राहकांसाठी मोठी बातमी समोर येत आहे. अलीकडेच बँकेने ग्राहकांसाठी नवीन …