बारामतीत निवडणुकीचे पडघम; लोकसभेत पवारांची ‘लेक’ जाणार की ‘सून’?

Baramati Politics : बारामती लोकसभेची निवडणूक यंदा प्रचंड प्रतिष्ठेची ठरणार आहे. कारण विद्यमान खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्याविरुद्ध सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) अशीच संभाव्य लढत होण्याची दाट शक्यता आहे. बारामती लोकसभा मतदारसंघासाठी (Baramati loksabha Election) थेट अजित पवारच मैदानात उतरल्याने सुप्रिया सुळेंसाठी ही लढाई सोपी नाही. सुप्रिया सुळेंची लोकसभेची वाट खडतर बनलीय. हे स्वत: शरद पवारही जाणून आहेत. म्हणूनच आता लेकीसाठीच थेट शरद पवार बारामतीच्या (Baramati News) मैदानात उतरले आहे.

सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार (Supriya Sule Vs Sunetra Pawar) ही संभाव्य लढत पाहता शरद पवारांनी स्वत: बारामती लोकसभा मतदारसंघात लक्ष घालायचं ठरवलंय. बारामती लोकसभा मतदारसंघातल्या सहा विधानसभा मतदारसंघातल्या पदाधिका-यांची स्वत: बैठक घेतली… साडेपाच तास सलग एकाच जागेवर बसून मतदारसंघाचा जातीने आढावा घेतला.

बारामती, पुरंदर, भोर, इंदापूर, दौंड आणि खडकवासला मतदारसंघाच्या पदाधिकाऱ्यांसोबत शरद पवारांनी बैठक घेतली. बारामतीसाठी भाजपने ए फॉर अमेठी आणि बी फॉर बारामती अशी स्लोगन वापरली, तरीही राष्ट्रवादी काँग्रेसला कसलीच चिंता नव्हती, कारण अजित पवारांची ताकद… 2019 मध्ये सुप्रिया सुळे दीड लाखांपेक्षा जास्त मतांनी विजयी झाल्या होत्या.. तेव्हा प्रचाराची सर्व धुरा स्वत: अजित पवारांकडे होती.

हेही वाचा :  'मी मुख्यमंत्री झालो असतो मात्र शरद पवारांनी....' अजित पवारांचा गंभीरआरोप

बारामती लोकसभेतला खडकवासला, दौंड मतदारसंघ भाजपच्या ताब्यात आहे. पुरंदर आणि भोरमध्ये काँग्रेसचे आमदार आहेत. बारामती आणि इंदापूरमध्ये राष्ट्रवादीचा आमदार आहे. बारामतीत स्वत: अजित पवार आमदार आहेत. तेव्हा बारामतीच्या सहापैकी चार विधानसभा मतदारसंघ महायुतीच्या ताब्यात आहेत. तेव्हा आता समीकरणं बदलली आहेत. 

महायुतीत गेलेले अजित पवारच सुप्रिया सुळेंविरोधात (Ajit Pawar vs Supriya Sule) उतरल्याने लढाई आणखी कठीण बनलीय. अजित पवार बारामतीमध्ये पायाला भिंगरी लावून सभा घेतायत. तर अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार बारामती लोकसभा मतदारसंघ पिंजून काढतायत.. अशा वेळी लेकीला जिंकवायचं तर आपल्यालाच मैदानात उतरावं लागणार हे शरद पवारांना (Sharad Pawar) ठावूक आहे.



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

याला म्हणतात बदला! मुलीला नावं ठेवणाऱ्या शेजारच्यांचा दारात जाऊन आईने वाजवला ढोल… Video व्हायरल

Viral News : शालेय जीवनात अनेक मुलांना यश-अपयशाचा सामना करावा लागतो. काही विद्यार्थी चांगले गुण …

हंडाभर पाण्यासाठी दाहीदिशा वणवण; जनतेला वाऱ्यावर सोडून मंत्री परदेशात

Maharashtra Drought :  हंडाभर पाण्यासाठी दाहीदिशा फिरण्याची वेळ राज्यातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये नागरिकांवर आली आहे. मराठवाड्यात …