पठाणच्या यशानंतर शाहरुखचा खास अंदाज

Shah Rukh Khan On Pathaan: पठाण (Pathaan) हा ब्लॉकबस्टर चित्रपट ठरला आहे. देशातच नाही तर परदेशातही या चित्रपटानं कोट्यवधींची कमाई केली आहे. या चित्रपटाला यश मिळत असतानाच या चित्रपटाच्या स्टार कास्टनं आणि दिग्दर्शकानं एका पत्रकार परिषदेचे आयोजन केलं. या पत्रकार परिषदेमध्ये शाहरुख खान (Shah Rukh Khan) , दीपिका पादुकोण  (Deepika Padukone) आणि जॉन अब्राहम (John Abraham) यांच्यासोबतच चित्रपटाचा दिग्दर्शक सिद्धार्थ आनंदनं देखील हजेरी लावली. यावेळी शाहरुख हा अतिशय आनंदी दिसला. शाहरुखनं या पत्रकार परिषदेमध्ये पठाण चित्रपटाला मिळालेल्या यशाबद्दल प्रेक्षकांचे आभार मानले. तसेच त्यानं दीपिकासाठी गाणं गायलं. 

जॉनला केलं किस

शाहरुखनं या पत्रकार परिषदेमध्ये पठाणमधील जॉनच्या भूमिकेची माहिती दिली. या दरम्यान शाहरुखनं जॉनला किस केलं. त्यानंतर पत्रकार परिषदेमध्ये उपस्थित असलेले लोक ‘दीपिका दीपिका’ असं म्हणत होते. यावर शाहरुख म्हणतो, ‘मी दीपिकाला असं अनेकवेळा केलं आहे. जॉनला पहिल्यांदा करतोय.’ त्यानंतर जॉन म्हणतो, ‘एवढं प्रेम…’


दीपिकासाठी गायलं गाणं

पठाणबरोबरच ‘ओम शांति ओम’ आणि ‘चेन्नई एक्सप्रेस’ या चित्रपटांमध्ये शाहरुखनं दीपिकासोबत काम केलं. आहे. पठाण चित्रपटाला मिळालेल्या यशानंतर घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत शाहरुखनं त्याच्या ‘ओम शांति ओम’  या चित्रपटातील ‘आंखों में तेरी’ हे गाणं दीपिकासाठी गायलं. 

सलमानचे मानले आभार 

पठाण चित्रपटात सलमान खाननं कॅमिओ केला आहे. या चित्रपटात काम केल्याबद्दल शाहरुखनं सलमानचे आभार मानले. 

रवीना टंडन (Raveena Tandon), हृतिक रोशन (Hrithik Roshan),  विकी कौशल (Vicky Kaushal), अर्जुन कपूर (Arjun Kapoor) या सेलिब्रिटींनी सोशल मीडियाच्या माध्यमातून पठाण या चित्रपटाच्या टीमचं कौतुक केलं. 

हेही वाचा :  'पठाण'ला विरोध; चाहत्यांमध्ये शाहरुखची क्रेझ कायम!

महत्वाच्या इतर बातम्या:

Pathaan Worldwide Box Office Collection Day 6: शाहरुख बॉक्स ऑफिसचा ‘बाजीगर’; ‘पठाण’नं सहा दिवसांत केली एवढी कमाई



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

सुष्मितानं मानले डॉक्टरांचे आभार; पोस्ट शेअर करत म्हणाली, ’95 टक्के ब्लॉकेज होते…’

Sushmita Sen: बॉलिवूडमधील (Bollywood) प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) गेल्या काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक …

थोडक्यात बचावला ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीन

A. R. Ameen: प्रसिद्ध संगीतकार  ए. आर. रहमान (A. R. Rahman) यांच्या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती …