दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी, उत्तरपत्रिकेतील आकृत्यासंदर्भात शिक्षण मंडळाचा मोठा निर्णय

Maharashtra Board 10th Exam News in Marathi :  महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे इयत्ता बारावीची लेखी परीक्षा सुरू झाली आहे. तर 1 मार्चपासून दहावीची बारावीची लेखी परीक्षा सुरू होणार आहे. याचदरम्यान शिक्षण मंडळाने दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्यामुळे मराठी, इंग्रजी, हिंदी या भाषा विषयांमध्ये परिच्छेदाच्या आधारित आकृत्या पेनाने काढा किंवा पेन्सिलने त्याचे विद्यार्थ्यांना गुण मिळणार आहे. अशी माहिती शिक्षण मंडळाकडून देण्यात आली आहे. 

दहावी – बारावीच्या परीक्षांमध्ये भाषा विषयातील उत्तरपत्रिकेत आकृत्या आता पेनानंही काढता येणार आहे.. 1 मार्चपासून दहावीच्या परीक्षा सुरू होत आहेत. त्याआधी बोर्डानं महत्त्वपूर्ण निर्णय घेतलाय. विद्यार्थ्यांनी आकृत्या पेन किंवा पेन्सिल यापैकी कशानंही काढल्या, तरी त्यांना गुण देण्यात यावेत असा सूचना बोर्डाच्या परीक्षा मंडळाकडून नियामकांना देण्यात येणार आहे. मात्र हा निर्णय केवळ भाषा विषयाच्या प्रश्नांसंदर्भात आहे. विज्ञान, गणित, भूगोल अशा विषयांसाठी विद्यार्थ्यांना पेन्सिलनंच आकृत्या काढाव्या लागणार आहेत. 

पत्र लिहून गोंधळ मिटवण्याची मागणी होती

राज्य शिक्षण मंडळात मॉडरेटर म्हणून कार्यरत असलेल्या नफीस शेख यांनी यासंदर्भात परीक्षा मंडळाला पत्र लिहिले होते. नफीस शेख यांनी पेन किंवा पेन्सिलमध्ये परिच्छेदावर आधारित आकृत्या काढून मराठी, इंग्रजी, हिंदी या भाषा विषयात विद्यार्थ्यांना गुणवत्ता देण्याची मागणी केली होती. या मागणीला परीक्षा मंडळाने सकारात्मक प्रतिसाद देऊन विद्यार्थ्यांमधील शंका दूर केली आहे.

हेही वाचा :  Video : धावत्या ट्रेनमधून महिलेची प्लॅटफॉर्मवर उडी आणि मग...

विद्यार्थांचे गुण कापू नयेत…

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून मिळालेल्या माहितीनुसार, दहावीच्या मराठी, इंग्रजी, हिंदी आदी भाषा विषयांमध्ये परिच्छेदावर आधारित आकृत्या पेन्सिलऐवजी पेनाने काढल्या म्हणून विद्यार्थांचे गुण कापू नयेत, अशा स्पष्ट सूचना महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने परीक्षा विभागाला देण्यात आल्या आहेत. या संदर्भात लवकरच सर्व भाषा विषयांच्या नियामक संमेलनात सर्व नियामकांना माहिती दिली जाईल. त्याच वेळी, नियामक लेखापरीक्षकास सूचित करेल. 

तसेच, मराठी, इंग्रजी आणि हिंदी भाषा या विषयामध्ये परिच्छेदावर आधारित आकलन कृती किंवा आकृत्या पेनाने काढल्या म्हणून अर्धा गुण कापतात. त्यांनी कापला नाही तर कित्येकदा मॉडरेटरच्या स्तरावर अर्धा गुण कापला जातो. यातच आकृती पेनाने काढावी असा नियम प्रश्नपत्रिकेत आहे. मात्र पेन्सिलने आकृती काढली तर अर्धा गुण कापावा असा कुठेही उल्लेख करण्यात आलेला नाही. मग हे गुण का कापले जातात? असा प्रश्न पर्यवेक्षक आणि मॉडरेट विचारत होते. याचपार्श्वभूमीवर शनिवारी राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या परीक्षा मंडळाच्या बैठकीत चर्चा करून ही संदिग्धता दूर करण्यात आली.

हेही वाचा :  चारित्र्याच्या संशयावरुन पतीने क्रुरतेचा कळस गाठला, पत्नीला आता आरशासमोर जायलाही वाटते भीती



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

निवडणुकीच्या प्रचारसभेत जोरदार वाऱ्याने स्टेज कोसळला! 9 जणांचा मृत्यू; दुर्घटना कॅमेरात कैद

Election Campaign Rally Accident Video: मॅक्सिकोमध्ये एका दुर्देवी दुर्घटनेमध्ये 9 जणांचा मृत्यू झाला आहे. राष्ट्राध्यक्षांच्या निवडणुकीच्या …

मंत्र्याकडून नियमबाह्य कामांसाठी दबाव! निलंबित अधिकाऱ्याचे CM शिंदेंना पत्र; म्हणाला, ‘मंत्री महोदयांच्या दबावामुळे..’

महिला कर्मचाऱ्याचा लैंगिक छळ प्रकरणी आणि विभागातंर्गत आर्थिक घोटाळ्याचा ठपका ठेवत पुणे जिल्हा परिषदेचे तत्कालीन …