₹ 1,00,000 मध्ये घरी न्या Sunroof वाली ही भन्नाट कार! महिन्याचा EMI केवळ ‘इतके’ रुपये

Hyundai Exter EMI Calculator: ह्युंदाई कंपनीची एक्सटर ही एक भन्नाट कॅम्पॅक्ट एसयूव्ही कार आहे. या कारच्या बेसिक मॉडेलमध्येही एकाहून एक सरस सेफ्टी फिचर्स आहेत. या कारच्या हायर व्हेरिएंटमध्ये अधिक फिचर्स असून ही कार खरोखरच एक पैसा वसूल कार आहे. तुम्हालाही ह्युंदाई एक्सटर (Hyundai Exter) विकत घ्यायची असेल तर तुम्ही केवळ एका लाखाच्या डाऊन पेमेंटवर ही कार घरी आणू शकता. यासाठी तुम्हाला किती कर्ज काढावं लागेल आणि प्रत्येक महिन्याला किती ईएमआय भरावा लागेल हे आपण पाहूयात…

व्हाइस कमांड सनरुफ

ह्युंदाई एक्सटर कशी विकत घेता येईल त्यासाठीची आर्थिक तडजोड कशी असेल यापूर्वी या कारचे फिचर्स आणि वैशिष्ट्यांवर आपण नजर टाकूयात. ह्युंदाई एक्सटर ही या कार सेगमेंटमधील पहिली अशी कार आहे ज्यामध्ये वॉइस इनबिल्ड इलेक्ट्रिक सनरुफ देण्यात आलं आहे. या कारमध्ये ड्युएल डॅशकॅम, 6 एअरबॅग, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, वायरलेस चार्जर, टीपीएमएस, थ्री पॉइण्ट सीटबेल्डसारखे फिचर्स अगदी बेस व्हेरिएंटमध्येही देण्यात आले आहेत. या कारमध्ये 60 हून अधिक कनेक्टेड फिचर्स आहेत हे ही कारचं वैशिष्ट्य आहे.

हेही वाचा :  iPhone 16 सीरीजमध्ये लाँच होणार 5 स्मार्टफोन, किंमत आणि फिचर्स जाणून घ्या

मायलेज किती?

ह्युंदाई एक्सटर मध्ये 1.2 लीटरचं नॅचरली एस्पीरेटेड पेंट्रोल इंजिन देण्यात आलं आहे. हे इंजिन 81 बीएचपीची पॉवर आणि 114 एनएम टॉर्क निर्माण करण्याची क्षमता असलेलं आहे. कंपनीने सीएनजीमध्येही या कारचा पर्याय उपलब्ध करुन दिली आहे. सीएनजी इंजिन 68 बीएचपी पॉवर आणि 95 एनएम टॉर्क निर्माण करतं. पेट्रोल व्हेरिएंटच्या ह्युंदाई एक्सटरचं मायलेज 19.4 किलोमीटर प्रती लिटर इतकं आहे. तर सीएनजी व्हेरिएंटचं इंजिन 27.1 किलोमीटर प्रती किलोचं मायलेज देतं.

व्हेरिएंट कोणते?

ह्युंदाई एक्सटरचे एकूण 7 व्हेरिएंट विक्रीसाठी उपलब्ध आहेत. यामध्ये EX, EX(O), S, S(O), SX, SX(O) आणि SX(O) कनेक्ट या 7 व्हेरिएंटचा समावेश आहे. ह्युंदाई कंपनीने आपल्या एक्सटर या एसयूव्हीवर 3 वर्षांसाठी अमर्यादित किलोमीटरवर वॉरंटी दिली आहे. या कारबरोबर 7 वर्षांच्या अतिरिक्त वॉरंटीचाही पर्याय कंपनीने दिला आहे. ही कार 6 मोनोटोन आणि 3 ड्युएल टोन रंगसंगतीमध्ये उपलब्ध आहे. ह्युंदाई एक्सटरची एक्स शोरुम किंमत 6.13 लाख रुपयांपासून 10.28 लाखांपर्यंत आहे.

महिन्याला किती ईएमआय भरावा लागेल?

ह्युंदाई एक्सटरचं बेस व्हेरिएंट ईएक्सची ऑन रोड किंमत 6 लाख 87 हजार 466 रुपये इतकी आहे. 1 लाख डाऊन पेमेंट केल्यानंतर उरलेली रक्कम कर्ज म्हणून घेता येईल. डाऊन पेमेंटनंतर 5 लाख 87 हजार 466 रुपयांचं कर्ज घ्यावं लागेल. तुम्ही 5 वर्षांच्या कालावधीसाठी 9.8 टक्के दराने वाहन कर्ज घेतलं तर महिन्याला 13 हजार 80 रुपये इतका ईएमआय भरावा लागेल. 

हेही वाचा :  RBI Monetary Policy: RBI कडून कर्जदारांना दिलासा मिळणार? जाणून घ्या कधी होईल EMI स्वस्त...

व्याज किती भरणार?

5 वर्षांच्या कालावधीमध्ये 5 लाख 87 हजार 466 रुपयांवर 1 लाख 66 हजार 334 रुपये व्याज द्यावं लागेल. ह्युंदाई एक्सटरच्या इतर व्हेरिएंटसाठी हे गणित कसं आहे याची माहिती तुम्हाला जवळच्या ह्युंदाईच्या शोरुममध्ये मिळेल.



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Interesting Facts : विमानाच्या इंजिनावर असणाऱ्या त्या लहानशा पंखांचा नेमका काय वापर?

Interesting Facts : विमान प्रवास हा पहिलावहिला असो किंवा मग अगदी सराईताप्रमाणं नेहमीच्या नेहमी केला …

देशभर चर्चेत असलेल्या पोर्श कारची किंमत किती? स्पीड, मायलेज सर्वच जाणून घ्या…

Pune Accident News:  पुण्यातील कल्याणीनगर हिट अँड रन प्रकरणामुळं राज्यात एकच खळबळ उडाली आहे. पोर्श …