हक्काच्या घराच्या प्रतिक्षेत असलेल्या गिरणी कामगारांसह त्यांच्या वारसांना मोठा दिलासा; म्हाडाने घेतला मोठा निर्णय

Mhada Mill Worker Lottery : हक्काच्या घराच्या प्रतिक्षेत असलेल्या गिरणी कामगारांसह त्यांच्या वारसांना मोठा दिलासा  देमारा निर्णय म्हाडाने घेतला आहे.  मुंबईतील 58  बंद गिरण्यांमधील म्हाडाकडे नोंदणीकृत झालेल्या तसेच यापूर्वी झालेल्या सोडतीमध्ये यशस्वी न झालेल्या एकूण 1,50,484 गिरणी कामगार आणि त्यांच्या वारसांची पात्रता निश्चितीकरिता ‘म्हाडा’तर्फे ऑफलाइन व ऑनलाइन पद्धतीने कागदपत्रे स्वीकारण्यासाठी गेल्या सहा महिन्यांपासून सुरू असलेल्या कालबद्ध विशेष अभियानाला 15 मार्च 2024 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

म्हाडाचा विभागीय घटक मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे गिरणी कामगार आणि त्यांच्या वारसांसाठी 14 सप्टेंबर 2023 पासून राबविण्यात येत असलेल्या या विशेष अभियानाअंतर्गत अद्यापी गिरणी कामगार व त्यांच्या वारसांकडून ऑफलाइन व ऑनलाइन पद्धतीने एकूण 1, 8, 492 अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यापैकी 89, 648 अर्जदार पात्र ठरले असून उर्वरित अर्जांची छाननी करून पात्र तसेच अपात्र निश्चितीची कार्यवाही सुरू आहे. राज्य शासन गिरणी कामगारांच्या हक्काच्या घराविषयी अत्यंत संवेदनशील असून त्यांना हक्काचे घर मिळवून देऊन त्यांच्या राहणीमानाचा दर्जा उंचवण्याकरिता कटिबद्ध आहे. म्हणूनच या अभियानाचा लाभ अधिकाधिक गिरणी कामगार व त्यांच्या वारसांना घेता यावा याकरिता सदरील मुदतवाढ देण्यात येत असल्याची माहिती मंडळाचे मुंबई मंडळाचे मुख्य अधिकारी  मिलिंद बोरीकर यांनी आज दिली. 

हेही वाचा :  एसटी नफ्यात येत नाही, तोवर नोकरभरती बंद; महामंडळाचा निर्णय जाहीर; प्रतीक्षा यादीवरील उमेदवारांनाही संधी नाही

यापूर्वी ऑफलाइन अथवा ऑनलाईन पद्धतीने कागदपत्रे सादर केलेल्या गिरणी कामगार वारसांना नव्याने कागदपत्रे सादर करण्याची आवश्यकता नसल्याचे मंडळातर्फे कळविण्यात आले आहे.    गिरणी कामगार व त्यांच्या वारसांनी गिरणीमध्ये काम केले असल्याचा पुरावा दर्शविणारी कागदपत्रे ऑफलाइन पद्धतीने सादर करता यावीत याकरिता म्हाडाच्या मुंबईतील वांद्रे पूर्व येथील एमआयजी क्रिकेट क्लब जवळील समाज मंदिर हॉल येथे तात्पुरते स्वरूपाचे मदत केंद्र स्थापन करण्यात आले आहे. तसेच ऑनलाइन पद्धतीने कागदपत्रे सादर करण्यासाठी Mill workers eligibility हे मोबाइल ॲप तयार करण्यात आले असून सदर ॲप Google Play Store वर उपलब्ध आहे. तसेच https://millworkereligibility.mhada.gov.in या संकेतस्थळावरही ऑनलाइन कागदपत्रे सादर करण्याची सुविधा उपलब्ध आहे.

यापूर्वी झालेल्या सोडतीमध्ये यशस्वी न झालेल्या 1, 50, 484 गिरणी कामगार आणि त्यांच्या वारसांपैकी ज्या गिरणी कामगार वारसांनी पात्रतेसंबंधीची कागदपत्रे सादर केलेली नाहीत, अशा गिरणी कामगार व त्यांच्या वारसांनी पात्रतेसाठी आवश्यक कागदपत्रे ऑनलाईन अथवा ऑफलाइन पद्धतीने सादर करावी. सदर प्रक्रियेदरम्यान काही अडचण उद्भवल्यास मार्गदर्शनाकरिता 9711194191 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन मंडळातर्फे करण्यात येत आहे.

हेही वाचा :  कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर आढळले ५ अर्भक, नागपुरात खळबळ, तपास सुरु

मंडळातर्फे सर्व संबंधित गिरणी कामगार व वारसांना आवाहन करण्यात येत आहे की, पात्रता निश्चितीकरिता मंडळाने विहित केलेल्या 13 पैकी कोणत्याही कागदपत्रांची स्वसाक्षांकीत छायांकित प्रत सादर करावी. यामध्ये गिरणी कामगारांचे ओळख पत्र , तिकीट नंबरची प्रत, सर्व्हिस प्रमाणपत्र, लाल पास, प्रॉव्हिडंट फंड क्रमांक, इ एस आय सी  क्रमांक, मिल प्रमाणपत्र प्रत, हजेरी पत्र , लीव्ह रजिस्टर प्रत, उपदान प्रदान आदेश, भविष्य निर्वाह निधी सेटलमेंट आदेशाची प्रत, पगार पावती यापैकी उपलब्ध कागदपत्र सादर करावीत. तसेच आधार कार्ड सादर करणे बंधनकारक आहे. सदरील अभियान कालबद्ध असल्याने अधिकाधिक गिरणी कामगार व वारसांनी या विशेष अभियानात सहभागी होऊन शासनास सहकार्य करावे, असे आवाहन मंडळातर्फे करण्यात आले आहे. 



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

नियमबाह्य टेंडर, खरेदीसाठी दबाव आणणारा ‘तो’ मंत्री कोण? निलंबित आरोग्य अधिका-याचा ‘लेटर बॉम्ब’मुळे खळबळ

maharashtra news : भगवान पवार नावाच्या आरोग्य अधिका-यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. याच निलंबित अधिका-यानं …

इथं जाणारा कधीच परत येत नाही, भारतातील रहस्यमयी बेट; इथले लोकं जगाला का घाबरतात? 145 वर्ष जुनं रहस्य

North Sentinel Island Andaman Islands Tribe : अंदमान निकोबारमधील नॉर्थ सेंटीनल बेट हे संपूर्ण जगासाठी …