पॉर्न पाहिल्यानंतर भावाने शेजारीच झोपलेल्या बहिणीवर केला बलात्कार, नंतर गाठली क्रूरतेची परिसीमा

Crime News: उत्तर प्रदेशात भावानेच आपल्या बहिणीवर बलात्कार करत नात्याला काळीमा फासल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पॉर्न व्हिडीओ पाहिल्यानंतर भावाने आपल्या 17 वर्षीय बहिणीवर बलात्कार केला अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलिसांनी आरोपी भावाला बेड्या ठोकल्या आहेत. 

मागील आठवड्या शनिवारी ही घटना घडली. यावेळी दोघे बहिण-भाऊ घरात एकटे होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी भाऊ मोबाईलमध्ये पॉर्न व्हिडीओ पाहत होता. यावेळी त्याची बहीण शेजारीच झोपली होती. यानंतर त्याने तिच्यावर बलात्कार केला. पण बहीण सर्वांना याबद्दल सांगेल या भीतीने त्याने नंतर तिची गळा दाबून हत्या केली आणि घऱातून पळ काढला. 

पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करत तपास सुरु केला होता. आरोपीला अटक करण्यासाठी पोलिसांनी वेगाने शोध सुरु केला होता. अखेर पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या. चौकशीदरम्यान त्याने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी त्याच्याकडून मोबाईल फोन जप्त केला आहे. कासागंजच्या पोलिस अधीक्षक (एसपी) अर्पना रजत कौशिक यांनी सांगितल्यानुसार, तपासादरम्यान पोलिसांना फोनवर अनेक अश्लील क्लिप सापडल्या.

मित्राने केला मैत्रिणीवर बलात्कार

राजधानी दिल्लीत एका तरुणीवर तिच्या मित्राने तब्बल एक आठवडा बलात्कार केला. आरोपी मित्राने पीडितेला मारहाण करत छळही केला. क्रोर्याची परिसीमा गाठताना आरोपीने तिच्या अंगावर गरम डाळ ओतली अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. 28 वर्षीय आरोपीचं नाव पारस असून त्याच्याविरोधात वेगवेगळ्या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी 2 फेब्रुवारीला आरोपीला बेड्या ठोकल्या. 

हेही वाचा :  हुल्लडबाजांनी विद्यार्थिनीला धावत्या ट्रेनखाली फेकलं, हात आणि पाय कापले; संतापलेल्या मुख्यमंत्र्यांनी केलं असं काही

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी आरोपी पारससह गेल्या एका महिन्यापासून भाड्याच्या घरात राहत होती. दक्षिण दिल्लीतील राजू पार्क परिसरात ते वास्तव्याला होते. 30 जानेवारीला पीसीआरला एक पती पत्नीला मारहाण करत असल्याचा फोन आल्यानंतर ही घटना उघडकीस आली. यानंतर पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि तरुणीला एम्स रुग्णालयात घेऊन गेले. 

तरुणीच्या तक्रारीच्या आधारे, पोलिसांनी 30 जानेवारी रोजी भारतीय दंड संहितेच्या कलम 323 (स्वैच्छिकपणे दुखापत करणे), 376 (बलात्कार) आणि 377 अंतर्गत एफआयआर नोंदवला आणि 2 फेब्रुवारी रोजी आरोपीला अटक केली, असं पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं. आरोपी पारस हा उत्तराखंडचा असून, दिल्लीत आचारी म्हणून काम करतो असं पोलिसांनी सांगितलं आहे.

 



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Loksabha Election : काहींची नावं गायब, तर काहींचा अपंग म्हणून उल्लेख; मतदार यादीतील घोळ संपता संपेना

Loksabha Election 2024 Voting List : सध्या संपूर्ण देशभरात लोकसभा निवडणुकांची धामधुम सुरु आहे. लोकसभेच्या …

केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! 54 टक्के महागाई भत्ता, 8 वा वेतन आयोगसंदर्भात महत्वाची अपडेट

8th pay commission: केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांचा महागाई भत्त्यात …