Women’s Day 2022 : 15,000 महिला का उतरल्या होत्या एकसाथ रस्त्यावर आणि सरकारला त्यांच्यासमोर का लागलं झुकावं? कहाणी ऐकून व्हाल थक्क!

8 मार्च म्हणजे वर्षभरातील एक महत्त्वाचा दिवस अर्थात महिला दिवस होय. असा एक दिवस जो प्रत्येक मानवरुपी लक्ष्मीसाठी आहे. या जगात आलेल्या प्रत्येक स्त्रीचे आभार मानण्याचा हा दिवस! आताची पिढी पुरोगामी आहे. स्त्री पुरुष समानता मानते. त्यामुळे हा दिवस आपल्याकडे मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो. आई, बहीण, बायको, मैत्रीण जी कोणी स्त्री आयुष्यात महत्त्वाची असेल तिला सरप्राईज गिफ्ट्स दिले जातात. तुम्ही सुद्धा हा दिवस अत्यंत अभिमानाने साजरा करत असाल. पण तुमच्या मनात सुद्धा हा प्रश्न आलाय का हा महिला दिन नेमका साजरा का केला जातो? हा म्हणजे स्त्री शक्तीचा जागर हे त्याचे मुख्य कारण आहेच, पण अशी काहितरी घटना असेलच ना की ज्यामुळे हा दिवस साजरा करण्याची गरज भासली. तुम्हाला नाही माहीत? चला मग आज जाणून घ्या. ( सर्व फाइल फोटोज- Istock)

काय घडलं होतं?

गोष्ट आहे 1908 सालची, जेव्हा अमेरिकेच्या न्यूयॉर्क शहरात तब्बल 15,000 स्त्रिया जमा झाल्या आणि त्यांनी मागणी केली की आम्हाला कामाचे कमी तास, चांगले वेतन मिळावे. शिवाय पुरुषांप्रमाणे मतदानाचा अधिकार देखील मिळावा. खास करून कामाला जाणाऱ्या स्त्रियांची चुकीच्या कार्यप्रणाली बाबत तक्रार होती. आता महिला 8 तास काम करतात, पण पूर्वी महिलांना 12 ते 18 तास काम करावे लागायचे. हा बदल सुद्धा याच आंदोलनामुळे घडला होता. हे आंदोलन खूप दिवस चालले आणि मग सोशलिस्ट पार्टी ऑ अमेरिकाने महिला दिन साजरा करण्याची घोषणा केली.

हेही वाचा :  पाकिस्तानी मुलीने पीएम मोदींचे का मानले 'आभार'... पाहा काय आहे कारण?

(वाचा :- माझी कहाणी :- मी माझ्या बॉसच्या बायकोसोबत अनेकदा शारीरिक संबंध ठेवले आणि मग पुढे…!)

या देशांमध्ये असते सुट्टी

1910 साली कोपेनहेगन मध्ये एक संमेलन आयोजित करण्यात आले आणि त्यामध्ये आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा केलं जावा असा ठराव मांडला गेला. यासाठी तारीख म्हणून 8 मार्च निवडण्यात आली. हेच ते वर्ष जेव्हापासून आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करायला सुरुवात झाली. पण या दिनाला जगभर मान्यता मिळवण्यासाठी मात्र 1975 साल उजडावे लागले. या दिवशी अफगाणिस्तान, क्युबा, व्हिएतनाम, कंबोडिया, रशिया, बेलारूस, युगांडा, युक्रेन या देशांत सुट्टी असते.

(वाचा :- पैशांसाठी आलिया भट्ट आपले वडिल महेश भट्टसोबत करायची ‘हे’ काम, बाप-लेकीचं असं नातं जे विचार करायला पाडतंय भाग..!)

2022 ची थीम

2022-

दरवर्षी महिला दिन एक खास थीम असते हे तुम्हाला सुध्दा माहीत असेलच, तर यंदाची थीम ‘जेंडर इक्वालिटी टुडे फॉर सस्टेनेबल टूमारो’ अशी आहे. गेल्यावर्षीची थीम होती महिला नेतृत्वाला कोविड 19 च्या प्रकोपात सुद्धा पुरुषांप्रमाणे समान संधी उपलब्ध करून देणे. यंदाच्या थीम नुसार विशेष कलर सुद्धा ठरवण्यात आले आहेत. 2022 साठी पर्पल, ग्रीन आणि सफेद रंग ठरवण्यात आला आहे.

हेही वाचा :  वेटलॉस या एक शब्दामुळे आमचं नातं आहे कोर्टाच्या पायरीवर उभं, नव-याने बाबांदेखत काढलं बेडरूममधून बाहेर, मग नंतर

(वाचा :- लग्नानंतर तब्बल 23 वर्षांनी अजय देवगणने पत्नी काजोलबद्दल काढले ‘हे’ उच्चार, जे सिंगल लोकांनी न वाचणंच ठरेल उत्तम!)

काय आहे रंगाचे महत्त्व

प्रत्येक वर्षीच्या थीमनुसार विशेष रंग ठरवले जातात आणि त्या रंगांचे सुद्धा विशेष महत्त्व असते. यंदाच्या थीमनुसार ठरवण्यात आलेल्या पर्पल, ग्रीन आणि सफेद रंगांचे सुद्धा एक विशेष महत्त्व आहे. यापैकी पर्पल रंग हा न्यायाचे प्रतीक आहे. हिरवा रंग आशेचे प्रतीक आहे. तर सफेद रंग हा शुद्धतेचे प्रतीक आहे. तर यंदा महिला दिन हे सर्व रंग त्या त्या उद्देशाला प्रतीत करतील.

(वाचा :- माझी कहाणी : हनीमूनच्या रात्री ईमेलमध्ये लपवून ठेवलेली एक चिठ्ठी सापडल्याने माझ्या नव-याचं एक खोल रहस्य उघड झालं आणि मग..!)

महिला दिनाचे महत्त्व

आपल्या प्रत्येकासाठीच महिला दिनाचे विशेष महत्त्व आहे. महिला दिन सुरू करण्याचा इतिहास हा वेगळा असला तरी सामान्य माणसासाठी आपल्या आयुष्यातील महत्त्वाच्या स्त्रीचे आभार मानणे इथवरच तो सीमित असतो. पण आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आपल्या रोजच्या आयुष्यात स्त्रियांचा आदर करणे, प्रत्येक स्त्रीकडे योग्य नजरेने पाहणे, तिच्या सुरक्षेसाठी सदैव पुढाकार घेणे यांसारख्या गोष्टी आपण चोख पाळल्या तर तो खरा महिला दिन असेल.

हेही वाचा :  रक्तातील विषारी पदार्थ व घाण एका झटक्यात फेकतील शरीराबाहेर, फक्त करा हे 6 उपाय

(वाचा :- ‘या’ एका भीतीमुळे सलमान खानने आजपर्यंत केलं नाही लग्न, इतक्या मोठ्या अभिनेत्याला नेमकी अशी काय असावी अडचण?)

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

‘मुंबईत गिरगावमध्ये नोकरीची संधी पण मराठी उमेदवार नको’; महिला HR ची संतापजनक पोस्ट

HR LinkedIn Post Related to Marathi People : सध्या सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होत …

राणेंनी मंत्रीमंडळात काय दिवे लावले? राऊतांचा सवाल; राज ठाकरेंना म्हणाले, ‘वकिली करणाऱ्यांनी..’

Sanjay Raut Slams Narayan Rane Raj Thackeray: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी नारायण राणेंसाठी …