मोदी सरकारच्या 10 वर्षांच्या कामकाजाचा लेखा-जोखा…; राष्ट्रपतींच्या अभिभाषणातील ठळक मुद्दे

Parliament Budget Session Live: संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरू होत आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाआधी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यानी संसंदेच्या दोन्ही सभागृहांना संबोधित केले. यावेळी त्यांनी मोदी सरकारच्या 10 वर्षांच्या कामकाजाचा लेखो-जोखा मांडला. या वेळी त्यांनी गेल्या वर्षभरात भारताच्या ऐतिहासिक घटनांचाही उल्लेख केला. आपले सरकार रिफॉर्म, परफॉर्म आणि ट्रान्सफॉर्म यानुसारच काम करत आहेत. 

राष्ट्रपती यांच्या अभिभाषणातील ठळक मुद्दे 

– या नवीन संसद भवनातील हे माझे पहिलेच अभिभाषण आहे. स्वातंत्र्याचा अमतमहोत्सवकाळात सुरुवातीला हे भव्य भवन निर्माण झाले आहे. भारताची परंपरा व संस्कृती यातून दिसतेय.

– आपल्या देशात संविधान लागू होऊन आता 75 वर्षांचा काळ लोटला आहे.  या कालखंडातच स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवदेखील संपन्न झाला. देशाने क्रांतीवीरांना मानवंदना वाहिली. 

– मेरी माटी, मेरा देश अभियानाअंतर्गंत देशभरातील गावाच्या मातीबरोबर अमृतकलश दिल्लीत आणण्यात आले. तीन कोटींहून अधिक लोकांनी पंचप्राणची शपथ घेतली. 70 हजाराहून अधिक अमृत सरोवर बनवण्यात आले. 

– जगातील गंभीर संकटावर मात करत भारतात सर्वात वेगाने विकसीत होणारी अर्थव्यवस्था बनली. सलग दोन तिमाहीत विकास दर 7.5 टक्क्यांहून अधिक आहे. भारताने चंद्राच्या दक्षिण पृष्ठभागावर तिरंगा फडकावला आहे. असं करणारा भारत हा पहिला देश ठरला आहे. 

हेही वाचा :  Budget 2024: सध्याचे Income Tax Slab कसे? Old आणि New Tax Regime मध्ये फरक काय?

– राम मंदिर उभारण्याची इच्छा कित्येत दशकांपासून होती. आज ती पूर्ण झाली आहे. जम्मू-काश्मीर ते आर्टिकल 370 हटवण्यासंदर्भात काही शंका होत्या. आज मात्र ते ऐतिहासिक निर्णय बनले आहेत. याच संसदेत तीन तलाकविरोधात कायदा करण्यात आला. 

– गेल्या चार दशकापासून ज्याची प्रतीशा होती ती वन रँक वन पेंन्शनदेखील माझ्या सरकारने लागू केली आहे. ओरओपी लागू केल्यानंतर आत्तापर्यंत माजी सैनिकांना जवळपास एक कोटींपर्यंत रक्कम मिळाली आहे. भारतीय लष्करात पहिल्यांदा चीफ ऑफ डिफेन्स स्टाफची नियुक्ती करण्यात आली आहे. 

– आम्ही भारताला टॉप 5 अर्थव्यवस्थेत सहभागी होताना पाहिले आहे. भारताचे निर्यात क्षेत्र जवळपास 450 बिलियन डॉलरने वाढून 775 बिलियन डॉलरपर्यंत पोहोचले आहे. आधीपेक्षा एफडीमध्ये दुप्पट वाढ झाली आहे. खादी आणि ग्रामोद्योगच्या उत्पादनाची विक्री चार टक्क्यांनी वाढली आहे. 

– गेल्या दशकभरात, देशाला जीएसटीच्या रुपाने एक देश एक टॅक्स कायदा मिळाला. 

– उत्तर प्रदेश आणि तामिळनाडूमध्ये डिफेन्स कॉरिडोरचा विकास होतोय. सरकार संरक्षण क्षेत्रात खासगी भागीदारी सुनिश्चित करण्यावर भर देत आहोत. अंतराळ क्षेत्रात सरकारने युवकांसाठी स्टार्टअपची संधी दिली आहे. 

हेही वाचा :  Budget 2024: ओल्ड की न्यू टॅक्स रिजीम? तुमच्या फायद्याचं काय?

– ईज ऑफ डुइंग बिझनेसमध्ये सातत्याने सुधारणा होत आहेत. गेल्या काही वर्षात 40 हजाराहून अधिक कॉम्पीकेस हटवण्यात आले आहेत. कंपनी एक्ट आणि लिमिटेड लाइबिलिटी पार्टनरशिप अॅक्टमध्ये 63 तरतुदी करण्यात आल्या आहेत. 

– सरकार डिजीटल इंडियासाठी झटत आहे. आज जगातील एकूण रियल टाइम डिजीटल देवाण-घेवाणीत 46 टक्क्यांनी वाढ झाली आहे. गेल्या महिन्यात युपीआयने 1200 कोटींचे ट्रान्सेक्शन झाले.

– डिजीटल इंडियासोबतच फिजिकल इन्फ्रास्ट्रक्चरमध्येही गुंतवणुक मोठ्या प्रमाणात झाली. गेल्या दहा वर्षात गावाता चार लाख किलोमीटर नवे रस्ते बांधण्यात आले आहेत. राष्ट्रीय महामार्गाची लांबी 90 हजार किलोमीटने वाढून आता 46 लाख किलोमीटर झाली आहे. 



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

लोकसभा निवडणुकीचा पाचवा टप्पा; महाराष्ट्रातील 13, तर देशातील एकूण 49 जागांवर मतदान

Lokshabha Elections 2024 : लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या अत्यंत महत्वाच्या टप्प्यासाठी  आज (20 मे) मतदान होत …

Ebrahim Raisi : इराणच्‍या राष्ट्राध्यक्षाच्‍या हेलिकॉप्टरचा अपघात; पीएम मोदी चिंतेत, म्हणाले…

PM Modi On Iran helicopter crash : इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रायसी (Ebrahim Raisi) आणि परराष्ट्र …