Mumbai News : मुंबई मॅरेथॉनमध्ये धावऱ्या दोन स्पर्धेकांचा मृत्यू, धक्कादायक कारण आलं समोर

Mumbai Marathon 2024 : मुंबई मॅरेथॉनमध्ये सहभागी झालेल्या 75 वर्षीय व्यक्तीचा आज हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू (heart attack) झाल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे. राजेंद्र चांदमल बोरा असं मृताचं नाव आहे. या व्यक्तीने मुंबई मॅरेथॉनमध्ये सहभाग नोंदवला होता. मुंबईच्या आझाद मैदान पोलिसांनी एडीआर अंतर्गत गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे, अशी माहिती मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) दिली आहे. 

मुंबई मॅरेथॉनमध्ये सहभागी झालेल्या 46 वर्षीय व्यक्तीचा देखील मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली आहे. सुवर्णदीप बॅनर्जी असं मृत व्यक्तीचं नाव आहे. एनएससीआय, वरळीजवळ धावत असताना तो कोसळला होता. मात्र, मृत्यूचे कारण अद्याप समजलेलं नाही, अशी माहिती मुंबई पोलिसांनी दिलीये. सदर व्यक्तीला हृदयविकाराचा झटका आला असावा, असा प्राथमिक अंदाज वर्तविला जातोय.

मुंबई मॅरेथॉनमध्ये सावळा गोंधळ

दरवर्षी जानेवारीच्या तिसऱ्या रविवारी मुंबई येथे मॅरेथॉन आयोजित केली जाते. मात्र, यंदाच्या वर्षी सावळा गोंधळ पहायला मिळाला. स्पर्धा संपल्यानंतर काही धावपटूंना मेडल मिळाली नसल्याचं समोर आलंय. त्यामुळे काहीवेळ धावपटूंनी गोंधळ देखील घातला होता. त्यामुळे मेडल काऊंटरला छावणीचं स्वरुप देण्यात आलं होतं.

हेही वाचा :  Maharashtra Bhushan: ज्येष्ठ निरूपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना यंदाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार

टाटा मुंबई मॅरेथॉन स्पर्धेतही रामनामाचा गजर झाल्याचं दिसून आलं. श्रीरामाची प्रतिमा असलेले भगवे झेंडे खांद्यावर घेऊन काही धावपटू धावले. मॅरेथॉनच्या सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत ‘जय श्रीराम’चा जयघोष सुरू असल्याचं दिसून आलं होतं.

दरम्यान,  टाटा मुंबई मॅरेथॉनचे 19 वे वार्षिक आयोजन मुंबई येथे करण्यात आले होते. यात 59 हजार स्पर्धकांनी भाग घेतला होता. या मॅरेथॉनला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सीएसटी येथे हिरवा झेंडा दाखवला होता. 



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

भारतीयांची स्वप्नपूर्ती! ढगांवर तरंगणाऱ्या चिनाब पुलावर रेल्वेची यशस्वी ट्रायल; रेल्वे मंत्र्यांनी शेअर केला व्हिडिओ

Chenab Railway Bridge : कोट्यवधी देशवासीयांचं स्वप्न आता साकार होणार आहे. जगातील सर्वात उंच ब्रिज …

महाराष्ट्रात अजब शिक्षक भरती; कन्नड भाषेच्या शाळेत 274 मराठी शिक्षकांची नियुक्ती

Sangali News : कन्नड आणि उर्दु शाळांमध्ये चक्क मराठी माध्यमिक शिक्षकांचे नियुक्ती करण्याचा अजब कारभार …