AC ची गॅस गळती का होते? ‘ही’ आहेत ५ महत्वाची कारणं, कशी घ्याल काळजी?

उन्हाळ्यापूर्वीच करुन घ्या AC ची सर्व्हिसिंग

-ac-

उन्हाळ्यात एसी सर्वाधिक वापरला जातो. दरम्यान त्यामुळे उन्हाळ्याच्या किंवा एसी वापरण्यास सुरुवात करणार असलेल्या सीझनच्या सुरुवातीला एसी चालू करताना जर तुम्ही एसीची नीट सर्व्हिस केली तर तुम्हाला फायदा होईल. तसंच गॅस गळतीसारख्या समस्यांना सामोरे जावे लागणार नाही. एसीची सर्व्हिसिंग वेळेवर पूर्ण करावी. असं न केल्यास एसीमध्ये बिघाड होऊन गॅस गळतीची समस्याही उद्भवू शकते.

वाचा : Aadhar Card संबधित फ्रॉडपासून वाचण्यासाठी घरबसल्या करा ‘हे’ काम, सोप्या आहेत स्टेप्स

कार्बन जमा झाल्यामुळे एसीत होते गॅस गळती

कार्बन जमा झाल्यामुळे एसीत होते गॅस गळती

कधी कधी AC वर कार्बन जमा झाल्यामुळे गॅस गळतीची समस्या उद्भवत असते. कधीकधी एसीच्या कंडेन्सर पाईपला गंज देखील लागल्याचं दिसून येतं. या कारणांमुळे देखील एसीतील गॅस लीक होऊ शकते.त्यामुळे एसीची गॅस कूलिंग कमी होते.
वाचा : Amazon सेलमधील भन्नाट डिल, ५५ हजारांचा टीव्ही २५ हजारांना, नेमकी ऑफर काय?​

हेही वाचा :  Petrol Rate Today : पेट्रोल-डिझेलच्या दराबाबत मोठी अपडेट, गाडीची टाकी फुल्ल करण्यापूर्वी जाणून घ्या आजचे दर

एसीवर जास्त जड सामान ठेवणंही चूकीचं

एसीवर जास्त जड सामान ठेवणंही चूकीचं

अनेक वेळा लोक सामान एसीच्या वर ठेवतात. एसी समोरच्या बाजूने थंड हवा आणि मागे गरम हवा वाहते. अशा परिस्थितीत सामान एसी वर ठेवल्यास गरम हवा बाहेर पडू शकत नाही. यामुळे एसी खराब होऊ शकतो. गॅस लिकेजचा प्रॉब्लेमही यामुळे येतो.

वाचा : Google ने उडवली iPhone 14 Pro ची खिल्ली, ‘या’ भन्नाट जाहिराती एकदा पाहाच!

​AC एअर फिल्टर योग्यवेळी बदलावा

ac-

AC एअर फिल्टर वेळोवेळी बदलणे देखील खूप महत्वाचे आहे. तो बदलला नाही तर एसीवरील दाब वाढतो. त्यामुळे गॅस गळतीची समस्या निर्माण होते. त्यामुळे पाईपला छिद्र पडतात आणि या सर्वाचा थेट परिणाम एसीवर होतो.

वाचा : Jio आणत आहे सर्वात स्वस्त 5G फोन, कधी होणार लाँच? काय असेल किंमत?

​एसीची ड्रेनेज व्यवस्था तपासणंही गरजेचं

​एसीची ड्रेनेज व्यवस्था तपासणंही गरजेचं

जर तुम्ही एसीची ड्रेनेज व्यवस्था तपासली नसेल तर तुम्हाला हे काम लगेचच करावे लागेल. कारण ड्रेनेज व्यवस्था योग्य नसेल तर गॅस लीक होण्याची खूप शक्यता असते. एसीची ड्रेनेज सिस्टीम पाणी बाहेर जाऊ देते. ते नीट नसेल तर पाणी पाईपमध्ये राहते. त्यामुळे गळतीची समस्या निर्माण होते.

हेही वाचा :  भाच्याने कट रचला पण मामीचा जीव गेला... पोलिसांनी फेसबुकवरुन लावला आरोपींचा शोध

वाचा : Jio चे ‘हे’ आहेत तीन भन्नाट प्लान, एका रिचार्जमध्ये फायदे अनेक​

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

महाराष्ट्रातले उद्योगधंदे गुजरातला कसे गेले? राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंना सवाल

Raj Thackeray Kankavli Slams Uddhav Over His Comment On Gujrat: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी …

Raj Thackeray : ‘नारायण राणे मुख्यमंत्री झाले अन्…’, राज ठाकरेंनी भरसभेत घेतली फिरकी; सांगितला ‘तो’ किस्सा!

Raj Thackeray Kankavli Sabha : एकेकाळचे दोन शिवसैनिक आज तब्बल 20 वर्षांनी एकाच मंचावर दिसले. …