मुंबई विद्यापीठाच्या 22 जानेवारीला होणाऱ्या 14 परीक्षा पुढे ढकलल्या

Mumbai University : मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्वाची अपडेट आहे. 22 जानेवारी रोजी अयोध्येच्या राम मंदिरात प्रभू रामाच्या मुर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाने सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. त्यामुळे मुंबई विद्यापीठाच्या दिनांक 22 जानेवारीला होणाऱ्या एकूण 14 परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. या परीक्षा दिनांक 31 जानेवारी रोजी घेण्यात येणार आहेत. मुंबई विद्यापीठ प्रशासनाकडून याची माहिती देण्यात आली आहे. 

विद्यापीठाच्या 14 परीक्षा 

दिनांक 22 जानेवारी रोजी पुढे ढकलण्यात आलेल्या सकाळच्या सत्रातील परीक्षांमध्ये बी.कॉम. सत्र 5 , एमए पब्लिक पॉलिसी सत्र 3, एमए राज्यशास्त्र सत्र 1, एमएस्सी रिसर्च सत्र 1  या चार परीक्षांचा समावेश आहे. 

तर दुपारच्या सत्रात बीएमएस – एमबीए ( 5 वर्षीय एकत्रित अभ्यासक्रम) सत्र 1, तृतीय वर्ष बीए सत्र 5, प्रथम वर्ष एलएलबी – जन. एलएलबी ( 3 वर्षीय अभ्यासक्रम ) सत्र 1, प्रथम वर्ष एलएलबी – बीएलएस ( ५ वर्षीय अभ्यासक्रम ) सत्र 1, एलएलबी ( 3 वर्षीय अभ्यासक्रम, 75:25) सत्र 1, 
बीए एलएलबी ( 5 वर्षीय एकत्रित अभ्यासक्रम, 75:25) सत्र 1, प्रथम वर्ष एलएलबी – जन. एलएलबी ( 3 वर्षीय अभ्यासक्रम, 60:40 ) सत्र 1, प्रथम वर्ष एलएलबी – बीएलएस  ( 5 वर्षीय अभ्यासक्रम, 60:40) सत्र 1, एमएसडब्ल्यू सत्र 3, एमएस्सी रिसर्च सत्र 3 या 10 परीक्षांचा समावेश आहे. 

हेही वाचा :  महाराजांचा भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याची बायकोचा खणाच्या साडीत रॉयल अंदाज,प्रिया मराठेने वेधले सर्वांचे लक्ष

या 14 परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. या सर्व परीक्षांची सुधारित तारीख दिनांक 31 जानेवारी देण्यात आली आहे.

आयडॉलच्या 3 परीक्षा पुढे ढकलल्या

मुंबई विद्यापीठाच्या दूर व मुक्त अध्ययन संस्थेच्या 3 परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. यातील प्रथम वर्ष बीए सत्र 1 व प्रथम वर्ष बीकॉम  सत्र 1 या परीक्षा 22 जानेवारी ऐवजी 6 फेब्रुवारीरोजी व एमएमएस सत्र 2 ची परीक्षा 22 जानेवारी ऐवजी 1 फेब्रुवारी रोजी घेण्यात येणार आहे.



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Loksabha Election : काहींची नावं गायब, तर काहींचा अपंग म्हणून उल्लेख; मतदार यादीतील घोळ संपता संपेना

Loksabha Election 2024 Voting List : सध्या संपूर्ण देशभरात लोकसभा निवडणुकांची धामधुम सुरु आहे. लोकसभेच्या …

केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! 54 टक्के महागाई भत्ता, 8 वा वेतन आयोगसंदर्भात महत्वाची अपडेट

8th pay commission: केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांचा महागाई भत्त्यात …