Gulabrao Patil : लग्नात गेलो तर हसतो, मयतीत गेलो तर रडतो; गुलाबराव पाटील म्हणतात आमच्यासारखी अक्टिंग करून दाखवा

तुषार तपासे, झी मीडिया, सातारा : शिंटे गटाचे नेते तथा राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराब पाटील(Minister Gulabrao Patil) हे त्यांच्या वक्तव्यांमुळे नेमहीच चर्चेत असतात. गुलाबराव पाटील पुन्हा एकदा अशाच प्रकारचे वादग्रस्त वक्तव्य केले आहे.  पुढारी म्हणजे बदनाम जात…चांगल्या चांगल्या ॲक्टरनी आमच्या सारखी अक्टिंग करून दाखवावी असं गुलाबराव पाटील म्हणाले आहेत. 

सातारा जिल्हापरिषदेच्या माध्यमातून जिल्हा स्तरीय कार्यशाळा आणि जिल्ह्यातील विविध पाणीपुरवठा योजनांचा ई भूमिपूजन सोहळा पाणी पुरवठा आणि स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते पार पडला. या कार्यक्रमामध्ये बोलत असताना गुलाब राव पाटील यांनी तुफान फटकेबाजी केली.

माझ्याकडे पाणी पुरवठा खाते असल्याने आज कोणताही आमदार मला भेटल्या शिवाय जाऊ शकत नाही. आम्ही माणसात राहून मानसाळलेली माणसे आहोत त्यामुळे सकाळी 5/25 माणसे कमी आली की असं वाटत हवा कमी झाली का काय? अस वक्तव्य गुलाबराव पाटील यांनी केले.  

आमची ओपिडी चालली पाहिजे. आम्ही तर बदनाम जात आहे. पुढारी म्हणजे बदनाम जात.  मी तर सांगतो चांगल्या चांगल्या ॲक्टरनी आमच्या सारखी अक्टिंग करून दाखवावी. आम्ही लग्नात गेलो तर हसतो, मयतीत गेलो तर रडल्या सारखं करतो, वाढदिवसाला गेलो तर हॅपी बर्थ डे म्हणतो… हा रोल काही साधा नाहीये, हजार लोक भेटतात वेग वेगळे विषय घेऊन पण सगळ्यांना भेटून आम्ही बोलतो असं गुलाबराव पाटील म्हणाले.

हेही वाचा :  Cancer Survivor Story: वयाच्या 17व्या वर्षी झाला कॅन्सर, डॉक्टरांनीही मानली हार, पण या 6 पद्धतींनी जिंकली लढाई

1982 साली पान टपरी चालवत होतो तेव्हा हे पोलिस लोक मला पकडायला मागे पुढे असायचे. गणपती,दसरा काही असल की पोलिस आलेच पण आता बर वाटत आगे गाडी पीछे गाडी बीच मे बैठा गुलाबराव असे म्हणताच सभागृहात एकच हशा पिकला.

….मग पाणी काय आकाशातून टाकू का? मंत्री गुलाबराव पाटील यांचे वादग्रस्त वक्तव्य

यापूर्वी देखील गुलाबराव पाटील यांनी अशाच प्रकारचे वक्तव्य केले होते. पाणी टंचाईच्या समस्येवर उत्तर देताना गुलाबराव पाटील भलतचं काही तरी बोलून बसले होते. धरणगाव एरंडोल तालुक्यांमध्ये पाणीपुरवठा होत नसल्यानं  पाणीटंचाईला सामोरं जावं लागत असल्याची समस्या नागिकांनी मांडली होती. नदीला आलेल्या पुरामुळे पंपामध्ये गाळ जमा झाल्याने पंप बंद बडले होते. पुरामुळे ही तांत्रिक पाणी टंचाई निर्माण झाली होती. त्यावर पंपच बंद आहेत मग पाणी काय आकाशातून टाकू का? असं वादग्रस्त वक्तव्य पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटलांनी केले होते. मला गुलाब भाऊ नाही तर पाणीवाला बाबा व्हायचं आहे असं वक्तव्य देखील गुलाबराब पाटील यांनी काही दिवसांपूर्वी केले होते.



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Loksabha Election : काहींची नावं गायब, तर काहींचा अपंग म्हणून उल्लेख; मतदार यादीतील घोळ संपता संपेना

Loksabha Election 2024 Voting List : सध्या संपूर्ण देशभरात लोकसभा निवडणुकांची धामधुम सुरु आहे. लोकसभेच्या …

केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! 54 टक्के महागाई भत्ता, 8 वा वेतन आयोगसंदर्भात महत्वाची अपडेट

8th pay commission: केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांचा महागाई भत्त्यात …