‘…तर मी जाहीर आत्महत्या करणार’, बडगुजरांचा सरकारला इशारा

Sudhakar Badgujar: भाजप नेते नितेश राणे यांनी विधानसभेत केलेल्या आरोपांनंतर सुधाकर बडगुजर यांना तातडीने नाशिक पोलिसांनी चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स बजावलं होतं. त्यानंतर सुधाकर बडगुजर चौकशीसाठी नाशिक पोलीस ठाण्यातही दाखल झाले. दरम्यान बडगुजर यांनी यावर भाष्य करत सरकारला इशारा दिला आहे. 

माझं डीड तपासायला एसीबीला 10 वर्षे का लागले? कोणाच्या दबावाखाली पोलीस यंत्रणा काम करते? असा प्रश्न बडगुजर यांनी विचारला.  शिवसेना ठाकरे गटाचे नेते सुधाकर बडगुजर यांची सलग चौथ्या दिवशी चौकशी सुरु आहे. एसीबीच्या झाडाझडती करताना काही महत्वाची कागदपत्रे आढळून आली आहेत. एसबीनीने रात्री 7 वाजता नोटीस दिली आणि 7.30 वाजता छापा टाकल्याचे बडगुजर म्हणाले. बडगुजर यांच्या 2 भागीदारांचीदेखील एसीबीकडून चौकशी केली जाणार आहे. 

माझ्यावर 53 वर्षाच्या कारकिर्दित एनसीदेखील नाही. केवळ आंदोलनाचे गुन्हे माझ्यावर आहेत, असे ते म्हणाले. सत्ता येत असते. सत्ता जात असते. आम्हाला पण पोलिसांनी शिवसैनिकांना असा त्रास देऊ नये असे ते म्हणाले. 

कागदपत्रे खोटे बोलणार नाहीत. ही कागदपत्रे खोट असतील तर एसीबीच्या अधिकाऱ्यांसमोर मी जाहीरपणे आत्महत्या करेन. जाहीरपणे गळफास घेईन असा इशारा बडगुजर यांनी दिला. तुम्ही गुन्हे दाखल केल्यानंतर मला या प्रक्रियेतून जावे लागेलच. पण अशी चुकीची कारवाई शिवसैनिकांवर करु नका, असे ते म्हणाले. 

हेही वाचा :  Delhi Girl Accident : अंजलीच्या लैंगिक शोषणाबाबत मोठी अपडेट, पोस्टमार्टममध्ये आली 'ही' बाब समोर

सुधाकर बडगुजर आणि मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी दाऊद इब्राहिम याचा उजवा हात समजला जाणारा सलीम कुत्ता एकत्र पार्टी करत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. हिंदुत्ववादी म्हणवणाऱ्या पक्षाकडून यांना संरक्षण कसं दिलं जातं, असा सवालही नितेश राणे यांनी उपस्थित केला आहे. त्यावर स्पष्टीकरण देताना सुधाकर बडगुजर यांनी सांगितलं आहे की, “नितेश राणेंनी योग्य माहिती घेतली नसावी. 2016 मध्ये विजया रहाटकर प्रकरणी वेगळ्या विदर्भाची मागणी करण्यासाठी सभा झाली. त्या सभेच्या विरोधात आम्ही आंदोलन केलं होतं. त्यानंतर अनेकांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. 14 ते 15 दिवस मीदेखील जेलमध्ये होतो. यादरम्यान बॉम्बस्फोटाचे आरोपीही जेलमध्ये होते. आम्हाला त्याबद्दल काही कल्पना नव्हती. नाशिक सेंट्रेल जेलमध्ये आम्ही फक्त कैदी म्हणून एकत्र होतो”. 

मॉर्फिग केलेला व्हिडीओ

“माझ्यावर राजकारणात येण्याआधी एकही गुन्हा दाखल नव्हता. ज्या काही केसेस दाखल आहे त्या राजकारणात आल्यानंतर राजकीय हेतूने प्रेरित आहेत. सलीम कुत्ताला 92-93 मध्ये अटक झाली असेल. 2016 मध्ये मला अटक झाली. माझे ना कधी त्याच्याशी संबंध होते आणि यापुढेही नसतील,” असं बडगुजर म्हणाले आहेत. दरम्यान हा वेबनाव असून, मॉर्फिग केलं असल्याचा आरोपही त्यांनी केला. गुन्हेगार जेलमध्ये असेल तर तो बाहेर आला कसा? तो पेरोलवर आल्यानंतर सार्वजनिक ठिकाणी सहभागी होऊ शकतो. तिथे भेट झाली असेल तर माहिती नाही अशीही शक्यता त्यांनी बोलून दाखवली.  राजकारणात आरोप प्रत्यारोप होत असतात. बुद्धिबळाचा खेळ सुरु असतो. त्याबद्दल फार काही बोलण्यात अर्थ नाही. पोलिसांना चौकशीत माझं सहकार्य असेल असं त्यांनी स्पष्ट केलं. 
 
दाऊदच्या नातेवाईकाच्या लग्नात अनेक आमदार, मंत्री गेले होते. ती क्लिपही सोशल मीडियावर आहे. प्रफुल्ल पटेल आणि इक्बाल मिर्ची यांचा तर करार आहे. त्यांचं काय झालं? अशी विचारणा बडगुजर यांनी केली आहे. 

हेही वाचा :  IRCTC ला एका दुकानदाराने काढले मूर्खात; साइट हॅक करून विकली लाखोंची तिकिटे



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Pune Porsche Accident: ‘अजित पवारांचा फोन जप्त करा आणि..’, पुण्याच्या पालकमंत्र्यांना 5 प्रश्न विचारत आरोप

Pune Porsche Accident Allegations Against Ajit Pawar: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तसेच पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार …

Mahavitaran Job: बारावी उत्तीर्ण आहात? महावितरणच्या नोकरीसाठी ‘येथे’ पाठवा अर्ज

Mahavitaran Vidyut Sahayak Bharti 2024: बारावी उत्तीर्ण असून नोकरीच्या शोधात असलेल्यांसाठी महत्वाची अपडेट आहे. महाराष्ट्र …