500 CCTV, दर 1.2 सेकंदांला अपडेट अन्…; कशी असते Parliament Security System

Security Breach Parliament: संसदेच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान सुरक्षेत मोठी चूक झाल्याचं समोर आलं आहे. लोकसभाचं  (Loksabha Session) कामकाज सुरु असताना दोन अज्ञातांनी संसदेत उडी मारली. त्यांच्या हातात काहीतरी सामान होतं. अज्ञात व्यक्तीने खासदार बसत असलेल्या बेंचवरुन उड्या मारत पुढे जाण्याचा प्रयत्न केला. यामुळे लोकसभेत एकच खळबळ उडाली. मात्र यानंतर संसदेच्या सुरक्षेचं काम नेमकं कसं चालतं याबद्दलची चर्चा दिसून येत आहे. याचबद्दल जाणून घेऊयात..

3 लेअर सुरक्षा

सामान्यपणे भारतीय संसदेची सुरक्षा पार्लामेंट सिक्युरिटी सर्व्हिसकडून पाहिली जाते. ही सुरक्षा 3 स्तरांमध्ये असते. सुरक्षेचं काम सीआरपीएफ, दिल्ली पोलीस आणि संसदेचे स्वत:ची वेगळी सुरक्षा यंत्रणा पाहतात. संसदेच्या सुरक्षेची जबाबदारी सह-सचिव (सुरक्षा) यांच्या हाती असते. संसदेच्या संपूर्ण परिरसराला सुरक्षा पुरवण्याचं काम सह-सचिव (सुरक्षा) पाहतात. यानंतर लोकसभा आणि राज्यसभेमध्ये डायरेक्ट सुरक्षेचाही स्तर असतो. ही यंत्रणा आपआपल्या सदनाच्या सुरक्षेवर लक्ष ठेऊन असते. लोकसभा सचिवालय आणि राज्यसभा सचिवालय याचा कारभार पाहते.

12 गेट 

संसदेला एकूण 12 गेट आहेत. यामधील काही मोजक्या गेट्समधूनच लोकांना ये-जा करण्याची परवागनी असते. काही गेट्स बंदच असतात. मात्र सुरक्षा ही सर्वच गेट्सवर असते. सामान्यपणे ज्या गेटमधून लोकांची ये-जा होते तिथे सीआरपीएफ आणि दिल्ली पोलिसांच्या टीम तैनात असतात. प्रत्येक व्यक्तीची तपासणी हे लोक करतात. खासदार, मंत्री आणि अधिकाऱ्यांच्या गाड्यांवर स्ट्रीकर्स अशतात. कॅमेराच्या माध्यमातून हे स्ट्रीकर डिटेक्ट करुन थेट प्रवेश दिला जातो.

हेही वाचा :  viral dance : नया आया है ! काकांनी तर कमालच केली राव

500 सीसीटीव्ही

संसदेमध्ये इंटीग्रेटेड सिक्युरिटी सिस्टीमही आहे. या सुरक्षा यंत्रणेचं आपलं कंट्रोल रुम असतं. यासाठी संसदेच्या आवारामध्ये 500 सीसीटीव्ही कॅमेरांची नजर असते. तसेच सॉफ्टवेअरवर आधारित सुरक्षा यंत्रणा कंट्रोल रुममधून परिसरावर लक्ष ठेऊन असते. इंटीग्रेटेड सिक्युरिटी सिस्टीम संसदेच्या सुरक्षेमधील डोळे, नाक, कानाचं काम करतात. कोणतेही वाहन संसदेच्या आवारामध्ये आल्यास स्वयंचलित आयडेंटीटी व्यवस्था सक्रीय होते आणि त्याची सूचना करते.

स्कॅनर्सची नजर

संसदेच्या गेटजवळ असलेल्या कक्षांमध्ये स्कॅनर मशीन असतात. प्रत्येक सामानावर या स्कॅनरचं लक्ष असतं. आत-बाहेर घेऊन जाणाऱ्या गोष्टींची तपासणी करुनच त्या पुढे पाठवल्या जातात. सुरक्षेची तिसरी फळी ही संसदेच्या आतमध्ये अशते. यामध्ये मुख्य सभागृहावर विशेष लक्ष असतं. संसदेमध्ये कायम 1500 ते 2000 सुरक्षारक्षक तैनात असतात. आतील बाजूला काही ठराविक ठिकाणी कायम सुरक्षारक्षक तैनात असतात. तसेच सतत गस्त घालणारे अधिकारीही संसदभवनामध्ये फिरत असतात. संसदेमध्ये अधिवेशन असतं तेव्हा सुरक्षा मोठ्या प्रमाणात वाढवली जाते. या कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणात खासदार, मंत्री आणि अधिकाऱ्यांची ये-जा असते. 

1.2 सेकंदांनंतर अपडेट

संसदभवनामध्ये पॅरामीटर सिक्योरिटी सिस्टीमही आहे. यामध्ये 1.2 सेकंदांनंतर अपडेट पाठवणं आवश्यक असतं. कुठे काहीही घडलं तर अलार्म वाजतो आणि काही सेकंदांमध्ये सुरक्षारक्षक तिथे पोहचतात. तसेच कोणी भिंत ओलांडून आलं. तर काटेदार कंपणाचा सामना त्या व्यक्तीला करावा लागतो. अचानक अलार्म वाजतात. 30 वेगवगेळ्या जागी हे काटेरी कुंपण असतं.

हेही वाचा :  संसदेतील घुसखोरीचा मास्टरमाईंड 'ललित झा' आहे तरी कोण? एका Video ने केली पोलखोल!



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

लोकसभा निवडणुकीचा पाचवा टप्पा; महाराष्ट्रातील 13, तर देशातील एकूण 49 जागांवर मतदान

Lokshabha Elections 2024 : लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या अत्यंत महत्वाच्या टप्प्यासाठी  आज (20 मे) मतदान होत …

Ebrahim Raisi : इराणच्‍या राष्ट्राध्यक्षाच्‍या हेलिकॉप्टरचा अपघात; पीएम मोदी चिंतेत, म्हणाले…

PM Modi On Iran helicopter crash : इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रायसी (Ebrahim Raisi) आणि परराष्ट्र …