मुंबईत एसी लोकलवर दगडफेक, काचा फोडल्या; डोंबिवली ते ठाकुर्लीदरम्यानची घटना

Mumbai AC Local:  लोकल ही मुंबईची लाइफलाइन समजली जाते. सकाळी चाकरमान्यांची ऑफिसला जाण्याची गडबड असते. सकाळच्या गर्दीच्या वेळात एसी लोकलवर दगडफेक करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मध्य रेल्वेच्या ठाकुर्ली ते डोंबिवलीदरम्यानची घटना असल्याचे समोर आले आहे. गुरुवारी सकाळच्या सुमारास ही घटना घटना घडली आहे. 

मध्य रेल्वेच्या टिटवाळा ते सीएसएमटी एसी लोकलवर ही दगडफेक करण्यात आली आहे. सकाळी 8.33 च्या सुमारास ठाकुर्ली ते टिटवाळादरम्यान एका अज्ञात व्यक्तीने एसी लोकलवर मोठा दगड फिरकावल्याचे समोर आले आहे. यात एसी लोकलच्या काचा फुटल्या असून मोठे नुकसान झाले आहे. 

एका प्रवाशाने एसी लोकलवर झालेल्या दगडफेकीचे काही फोटो आणि व्हिडिओ ट्विट केले आहेत. त्याचबरोबर आरोपीवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी मध्य रेल्वेकडे केली आहे. दरम्यान, या व्यक्तीच्या ट्विटवर मध्य रेल्वेने रिप्लाय करत या प्रकरणी अधिक चौकशी करत आहोत, असं म्हटलं आहे. 

दगडफेकीच्या घटनेनंतर काही वेळ ट्रेन थांबवण्यात आली होती. एका माथेफिरुने लोकलवर दगडफेक केल्याचे समोर आले असून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आहे. आरोपीची अधिक चौकशी सुरू आहे. या घटनेमुळं काही वेळ लोकल विस्कळीत झाली होती. मात्र, नंतर वाहतूक सुरू करण्यात आली आहे. 

हेही वाचा :  पोटात गॅस-छातीत जळजळ, मोकळेपणाने ढेकर देणंही झालंय कठीण? या ५ सवयींमुळे आतडे जाळून तयार होते भयंकर ऍसिडिटी

व्हिडिओत दिसत आहे की, लोकलच्या काचा फुटल्या असून बाजूला काही महिला उभ्या आहेत. तर, लोकलच्या आत बसलेल्या प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. सुदैवाने या घटनेत कोणालाही गंभीर इजा झाली नाहीये. मात्र अचानक झालेल्या या दगडफेकीमुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. पुन्हा एकदा लोकलमधील प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. 

दरम्यान, मागील महिन्यातही अशीच एक घटना समोर आली होती पश्चिम रेल्वेवरील कांदिवली स्थानकात एसी लोकलवर दगडफेक झाल्याची घटना घडली होती. घरात बायकोशी झालेल्या भांडणातून एका व्यक्तीने एसी लोकलवर दगडफेक केली होती. या घटनेनंतर आरपीएफ प्रवाशांनी त्याला ताब्यात घेतले होते. मात्र, आता पुन्हा महिन्याभरानंतर मध्य रेल्वेवर ही घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. 



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

‘उद्धव ठाकरेंच्या ‘त्या’ निर्णयाने माविआचा प्रयोग फसला’, शरद पवारांचा गौप्यस्फोट

Sharad Pawar Statement : 2004 मध्ये राष्ट्रवादीनं मुख्यमंत्रीपद का नाकारलं? याबाबत शरद पवारांनी एका मुलाखतीत …

Maharastra Politics : शरद पवारांच्या भावनिक वक्तव्यानंतर प्रफुल्ल पटेलांचा खुलासा, म्हणाले ‘होय, मी 2004 पासून मी भाजपशी…’

Praful Patel Statement On Sharad Pawar Interview : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल …