भारतातील शेवटच्या मुघल बादशाहचं कुटुंब आज कुठंय? वास्तव तुम्हाला हादरवून सोडेल

Bahadur Shah Zafar: भारताच्या स्वातंत्र्य संग्रामात इतिहासाच्या पानांमध्ये हरवलेलं एक नाव म्हणजे बहादुर शाह जफर. हिंदू आणि मुस्लिमांना संघटित करत इंग्रजांविरोधात लढा देण्यासाठी भारतातील या अखेरच्या बादशहाच्या नावामुळं अनेकांच्याच मनात प्रचंड भीती पाहायला मिळत होती. एक शासक असण्यासोबतच हे बादशाह त्यांच्या उर्दू शायरी आणि हिंदुस्तानावर असणाऱ्या प्रेमासाठी ओळखले जात होते. 

1857 च्या क्रांतीमध्ये याच बादशाहांनी देशातील सर्व राजांना संघटित करत त्यांचं नेतृत्त्वं केलं. पण, यासाठी त्यांना फार मोठी किंमत फेडावी लागली. कारण, जीवनाच्या अखेरच्या काळात बादशाह जफर यांना इंग्रजांनी ताब्यात घेत त्यांना इतका दुर्दैवी मृत्यू दिला की 132 वर्षांपर्यंत त्यांना एक कबरही मिळाली नव्हती. 

24 ऑक्टोबर 1775 मध्ये बाहदुर शाह जफर यांचा जन्म झाला. तर, 1837 मध्ये त्यांचे वडील अकबर शाह द्वितीय यांचं निधन झालं. इतिहासात असणाऱ्या नोंदींप्रमाणं वडिलांनी कधीच बाहदुर शाह यांना सिंहासनावर आणण्याची इच्छा व्यक्त केली नव्हती. पण, मुघलांचं अस्तित्वं नाहीसं होत असतानाच त्यांनी नाईलाजानं सर्व हक्क आपल्या मुलाकडे सोपवले. बाहदुर शाह जफर यांनी वयाच्या 82 व्या वर्षी इंग्रजांसोबतच्या रणसंग्रामाचं नेतृत्त्वं स्वीकारलं. पण, ते इंग्रजांच्या हाती लागले आणि उर्वरित आयुष्य कैदेतच गेलं. 

हेही वाचा :  'राज्यातली कायद्याची स्थिती बिघडली असं म्हणणं..'; घोसाळकरांच्या हत्येनंतर फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया

अर्धांगवायूच्या तिसऱ्या झटक्यामुळं 7 नोव्हेंबर 1862 ला हा सम्राट जगाचा निरोप घेऊन गेला. ब्रिगेडियर जसबीर सिंग यांच्या कॉम्बॅट डायरी अॅन इलस्ट्रेटेड हिस्ट्री ऑफ़ ऑपरेशन्स कनडक्टेड बाय फोर्थ बटालियनए द कुमाऊं रेजिमेंट 1788 टू 1974 मध्ये लिहिण्यात आलेल्या संदर्भानुसार रंगूनमध्येच त्यांना जिथं कैद करण्यात आलं होतं तिथंच दफन करण्यात आलं. इंग्रज अधिकाऱ्यांनी हे ठिकाण इतकं सपाट केलं की, तिथं काही आहे याचा थांगपत्ताच पुढं वर्षानुवर्षे लागला नाही. 

1991 मध्ये एका स्मारकाच्या बांधणीदरम्यान पायाबांधणी करतेवेळी खोदकामादरम्यान त्यांच्या थडग्याची माहिती मिळाली. ज्यामध्ये बाहदुर शाह जफर यांचे अवशेष आणि त्यांची निशाणी सापडल्यामुळं ही आतापर्यंतची सर्वात मोठी आणि दडवलेली माहिती समोर आली होती. 

कुटुंबीयांची वणवण सुरुच… 

वर्षानुवर्षांसाठी भारतावर राज्य करणाऱ्या मुघल शासकांचा काळ आता मागं पडला. पण, इतिहासावर मोहोर उमटवणाऱ्या या शासकांची कुटुंब मात्र बिकट परिस्थितीमध्ये दिसत आहेत. उपलब्ध माहितीनुसार बाहदुर शाह जफर यांच्या खापर पणतूची पत्नी, सुल्ताना बेगम अतिशय हलाखीच्या परिस्थितीत राहते. हावडा येथील एका अतिशय दाटीवाटीच्या वस्तीत त्या राहतात, सार्वजनिक नळातून येणारं पाणी भरतात. सरकारकडून मिळणाऱ्या तुटपुंज्या रकमेचा त्यांना असून नसल्यासारखा आधार आहे ही वस्तुस्थिती. 

हेही वाचा :  Snake Shoes: कोब्रा शूज घालून रस्त्यावर फिरत होता; प्रसिद्ध उद्योजकाने शेअर केला Video



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

मंत्र्याकडून नियमबाह्य कामांसाठी दबाव! निलंबित अधिकाऱ्याचे CM शिंदेंना पत्र; म्हणाला, ‘मंत्री महोदयांच्या दबावामुळे..’

महिला कर्मचाऱ्याचा लैंगिक छळ प्रकरणी आणि विभागातंर्गत आर्थिक घोटाळ्याचा ठपका ठेवत पुणे जिल्हा परिषदेचे तत्कालीन …

20 हजार पगार असलेला कसा बनू शकतो करोडपती! समजून घ्या 70:15:15 चा फॉर्मुला

Crorepati Calculator: आयुष्यात करोडपती व्हावं असं अनेकांचं स्वप्न असतं. पण हे स्वप्न कधी प्रत्यक्षात उतरेल …