बँकेची नोकरी शोधणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी; आता थेट OFFICER पदासाठीच करा अर्ज

Jobs News : एक चांगल्या पगाराची आणि कायमस्वरुपी नोकरी असावी असं अमुक एका ट्प्प्यापर्यंतचं शिक्षण झाल्यावर आपणा सर्वांनाच वाटत राहतं. पण, हल्लीच्या स्पर्धात्मक युगात मात्र नोकरी मिळवणंही सर्वात मोठं आणि कठीण काम ठरत आहे. अनेकांसाठी तर हाच टप्पा हतलबल करणारा ठरत आहे. पण, आता मात्र चिंता करण्याची गरज नाही. कारण आता एका बँकेत तरुणांसाठी बँकेतील नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. 

बँक ऑफ महाराष्ट्र  (BOM) कडून ऑफिस स्केल II,III या पदांवरील भरतीसाठी जाहिरात गेण्यात आली आहे. बीओएमकडून क्रेडिट ऑफिसर स्केल II आणि क्रेडिट ऑफिसर स्केल III भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीनं अर्ज मागवण्यात आले आहेत.  Bankofmaharashtra.in  या संकेतस्थळावर देण्यात आलेल्या माहितीनुसार अर्ज भरण्यासाठीची शेवटची तारीख आहे 6 नोव्हेंबर 2023. 

या भरती प्रक्रियेतून 100 रिक्त जागांवर नव्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात येईल. यामध्ये दोन्ही विभागांसाठी समसमान कर्मचाऱ्यांची तरतूद करण्यात आली आहे. 

काय आहे वयोमर्यादा आणि शैक्षणिक पात्रता? 

बँकेच्या क्रेडिट ऑफिसर स्केल II साठी 25 ते 32 वर्षे आणि क्रेडिट ऑफिसर स्केल III या पदासाठी 25 ते 35 वर्षे इतकी वयोमर्यादा निर्धारित करण्यात आली आहे. दोन्ही पदांसाठी उमेदवारांकडे मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा शैक्षणिक संस्थांमधून पदवीपर्यंतचं शिक्षण घेतलेलं असणं अपेक्षित आहे. 

हेही वाचा :  पुणेकरांसाठी मोठी बातमी; आता एका क्लिकवर मिळणार बसचे लाइव्ह लोकेशन

अर्ज करण्यासाठीची प्रक्रिया 

सर्वप्रथम Bankofmaharashtra.in या संकेतस्थळाला भेट द्या. 
आता होमपेजवर ‘करिअर’ टॅबवर क्लिक करा. 
पुढं ‘रिक्रूटमेंट प्रोसेस’ वर क्लिक करून ‘करंट ओपनिंग्स’ पर्याय निवडा. 
आईबीपीएस पोर्टलवर नोंदणी करा आणि तिथं फॉर्म भरून आवेदन शुल्क द्या. 
भरलेल्या फॉर्मची प्रिंट अवश्य घ्या. 

सदरील नोकरीसाठी अर्ज करताना खुला प्रवर्ग, ईडब्ल्यूएस आणि ओबीसींनी 1180 इतकं आवेदन शुल्क भरावं. तर, एससी आणि एसटी वर्गातील उमेदवारांसाठी हेच शुल्क 118 रुपये इतकं आहे. 



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

लोकसभा निवडणुकीचा पाचवा टप्पा; महाराष्ट्रातील 13, तर देशातील एकूण 49 जागांवर मतदान

Lokshabha Elections 2024 : लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या अत्यंत महत्वाच्या टप्प्यासाठी  आज (20 मे) मतदान होत …

Ebrahim Raisi : इराणच्‍या राष्ट्राध्यक्षाच्‍या हेलिकॉप्टरचा अपघात; पीएम मोदी चिंतेत, म्हणाले…

PM Modi On Iran helicopter crash : इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रायसी (Ebrahim Raisi) आणि परराष्ट्र …