नासानं टीपले अवकाशातील ‘शोला और शबनम’; ही किमया पाहून Photo वारंवार Zoom करून पाहाल

NASA Photos : नासा या अंतराळ संशोधन संस्थेकडून अवकाळातील प्रत्येक लहानसहान हालचालींवर लक्ष ठेवलं जातं. असाच एक चमत्कार नासानं पुन्हा एकदा संपूर्ण जगासमोर आणला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून नासानं एक असं दृश्य सर्वांपुढे आणलं ज्याचा फोटो नेटकरी वारंवार आणि तेही Zoom करून पाहत आहेत. या फोटोमध्ये नेमकं काय आहे? हाच प्रश्न तुम्हालाही पडला ना? 

नासाच्या हलब (Hubble telescope) दुर्बिणीनं अवताशातील दोन ढग टीपले. अवकाशातील धुळ आणि वायूपासून या ढगांची निर्मिती झाल्याचं सांगण्यात आलं. यामधील मोठ्या लालसर रंगाच्या नेब्युलाला  NGC 2014 आणि त्याच्यापाशी असणाऱ्या निळसर नेब्युलाला NGC 2020 अशी नावं देण्यात आली. 

तारे तयार होणाऱ्या एका क्षेत्रामध्ये हे नेब्युला आढळून आले असून, त्या भागात असंख्य तारे असल्याची बाब संपूर्ण जगानं पाहिली. 

सूर्यापेक्षा वीसपट मोठे तारे… 

सर्वसामान्य नजरेतून दिसणाऱ्या या ताऱ्यांचा आकार माहितीये? NASA नं शेअर केलेल्या फोटोच्या मध्यभागी दिसणारे तारे सूर्याहून दहा ते वीसपट मोठे आहेत. या ताऱ्यांमधून बाहेर पडणाऱ्या उष्णतेमुळं तिथं असणाऱ्या इतर वायुंचं तापमान वाढतं, जसं फोटोमध्ये निळं रिंगण दिसत आहे. डाव्या बाजूला तयार झालेलं हे रिंगण अर्थात हा नेब्युला सूर्याहून 200,000 प्रकाशमान असणाऱ्या ताऱ्यापासून तयार झाल्याचं नासानं सांगितलं. 

फोटोविषयी सविस्तर माहिती देत नासानं म्हटलं, ‘हा फोटो दोन भागांमध्ये विभाजला आहे. डावीकडे खालच्या बाजूला त्याचा पहिला भाग आहे, तर लालसर रंगाचं रिंगण दुसरा भाग.’ Space.com च्या माहितीनुसार हबल दुर्बिणीच्या वाईड फिल्ड कॅमेरातून ही दृश्य टीपण्यात आली आहेत. सर्वसामान्य नजरेतून पाहिल्यास प्रथमदर्शनी हे एखाद्या चित्रकारानं रेखाटलेलं चित्र असल्याचं लक्षात येतं. तर, अवकाशातील ‘शोला और शबनम’ एकाच ठिकाणी आल्याची प्रतिक्रियाही द्यावीशी वाटते. तुम्हाला नासानं शेअर केलेला हा फोटो पाहून काय वाटतं? 

हेही वाचा :  सहकाऱ्यांनी नाश्ता करण्यासाठी उठवलं पण...; दर्शन घेऊन घरी निघालेल्या वारकऱ्याचा वाटेतच मृत्यू

सहसा अवकाश, तिथं घडणाऱ्या घडामोडी आणि तेथील एकंदर चित्र तांत्रिक भाषेत समजून घ्यायचं झाल्यास अनेकदा ते क्लिष्ट वाटतं. पण, नासाकडून देण्यात येणारी माहिती पाहता अवकाशही सोप्या भाशेय सर्वांपुढे येतंय असं म्हणणं गैर ठरणार नाही. 



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

हंडाभर पाण्यासाठी दाहीदिशा वणवण; जनतेला वाऱ्यावर सोडून मंत्री परदेशात

Maharashtra Drought :  हंडाभर पाण्यासाठी दाहीदिशा फिरण्याची वेळ राज्यातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये नागरिकांवर आली आहे. मराठवाड्यात …

राजेश खन्नांची ‘ती’ हिरोईन जिची सावत्र वडिलांनीच केली हत्या; आत्ता 13 वर्षांनी…

Laila Khan Murder Case: अभिनेत्री लैला खान प्रकरणा तब्बल 13 वर्षानंतर न्यायालयाने निर्णय दिला आहे. …