किंमत 700,000,000,000,000,000,000… NASA चे यान सोन्यानं बनलेल्या ग्रहाकडे झेपावले; आता थेट 2029 मध्ये…

NASA Psyche Mission, 16Psyche Gold Planet : सोन्यानं बनलेल्या ग्रहावर पोहचण्यासाठी नासाने एक मिशन हाती घेतले आहे. Psyche Mission असे नासाच्या या मोहिमेचे नाव आहे. NASA चे यान सोन्यानं बनलेल्या ग्रहाकडे झेपावले आहे. या ग्रहावर 700,000,000,000,000,000,000 म्हणजेच 700 क्विंटिलियन डॉलर्स ऐवढ्या किंमतीचे सोनं असल्याचा दावा केला जात आहे. 

या ग्रहावरचं सोनं पृथ्वीवर आल्यास सगळेच अब्जाधीश बनतील

‘स्पेसएक्स’ने नासाच्या केनेडी स्पेस सेंटरमधून NASA Psyche यान अवकाशात झेपावले आहे.   NASA Psyche  हे यान वर्षभरापूर्वी प्रक्षेपित केले जाणार केले. माओत्र, काही व्यवस्थापकीय आणि तांत्रिक कारणांमुळे या विलंब झाला.  2026 पर्यंत हे यान लघुग्रहावर पोहोचणार होते. ऑगस्ट 2029 मध्ये Psyche spacecraft  या सोन्याच्या लघुग्रहावर पोहचणार आहे.  नासाच्या जेट प्रोपल्शन लॅबोरेटरी (जेपीएल) मधून या अवकाशयानाच्या हालचालींवर लक्ष ठेवले जाणार आहे.16 सायकी’ नावाच्या लघुग्रहावर तब्बल 700 क्विंटिलियन डॉलर्स एवढ्या किंमतींचं सोनं असल्याचा अंदाज आहे.  सोन्याच्या लघुग्रहावरचं हे सगळं सोनं पृथ्वीवर आल्यास सगळेच अब्जाधीश बनतील.

हेही वाचा :  ‘ही गुलाबी हवा' प्राजक्ताकडे पाहून कलेजा खलास झाला, सौंदर्यवतीच्या अदांनी चाहते घायाळ

बटाटाच्या आकाराचा लघुग्रह

 16Psyche Gold Planet हा बटाटाच्या आकाराचा लघुग्रह आहे.  16Psyche Gold Planet आपल्या सूर्याभोवती  एक परिक्रमा पूर्ण करण्यासाठी पाच वर्षांचा कालावधी लागतो. या लघुग्रहावर एक दिवस 4.196 तासांचा असतो. या ग्रहाचे वजन पृथ्वीच्या चंद्राच्या वजनाच्या फक्त 1 टक्के आहे. नासाचे  Psyche spacecraft मॅग्नेटोमीटर वापरून या ग्रहाच्या चुंबकीय शक्तीचे मोजमाप करणार आहे.

1852 मध्ये लागला होता या  16Psyche Gold Planet चा शोध

सर्व प्रथम 17 मार्च 1852 रोजी इटालियन खगोलशास्त्रज्ञ एनिबेल डी गॅस्पॅरिस यांनी या ग्रहाचा शोध लावला होता. जवळपास सर्वच लघुग्रह खडक, बर्फ किंवा या दोघांच्या मिश्रणाने बनलेले असतात. मात्र,या लघुग्रहावर मोठ्या प्रमाणात धातूचा साठा आढळला आहे. या ग्रहावर प्लॅटिनम, सोने आणि इतर धातू मोठ्या प्रमाणात असल्याचा दावा केला जात आहे. हे सर्व सोने पृथ्वीवर आले तर प्रत्येक व्यक्ती अब्जाधीश होऊ शकते असा दावा केला जात आहे. निरीक्षणादरम्यान या ग्रहावर मोठ्या प्रमाणात सोनं आढळून आले आहे. यामुळेच याला  Gold Planet असेही म्हंटले जात आहे.  या ग्रहाचा अभ्यास करण्यासाठी नासाने Psyche Mission हाती घेतले आहे.

हेही वाचा :  स्मार्टफोनला तासाऐवजी मिनिटात करा चार्ज, या टिप्सचा करा वापर

 



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Maharastra Politics : ‘सर्वात मोठा घोटाळा, नियम ‘कात्रज’च्या धाब्यावर…’, रोहित पवारांचा मोठा गौप्यस्फोट

Rohit Pawar On Ambulance Scam : राज्याच्या आरोग्य विभागात साडेसहा हजार कोटींचा अँब्युलन्स घोटाळा झाल्याचा …

औरंगजेबाने तोडलेली मंदिर पुन्हा बांधण्यापासून महिलांची सेना बनवण्यापर्यंत..’, महाराणी अहिल्याबाईंची प्रेरणादायी कहाणी

Ahilyabai Holkar jayanti 2024: 31 मे रोजी  महाराणी अहिल्याबाई होळकर यांची जयंती साजरी केली जाते. …