पॉर्न स्टार मिया खलिफाचं वादग्रस्त वक्तव्य! म्हणाली, ‘तुम्ही पॅलेस्टाइनच्या बाजूने नसाल तर…’

Mia Khalifa On Hamas Attack Israel: इस्रायल आणि पॅलेस्टाइनमधील संघर्षाने पुन्हा तोंड वर काढलं असून दहशतवादी संघटना हमासने मागील 2 दिवसांपासून इस्रायलवर हल्ले करण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान काही वर्षांपूर्वीपर्यंत पॉर्न स्टार म्हणून काम करणाऱ्या मिया खलिफाने हा संघर्ष सुरु झाल्यानंतर केलेल्या एका विधानामुळे तिच्यावर टिका होत आहे. मिया खलिफाने तिच्या अधिकृत एक्स अकाऊंटवरुन म्हणजेच ट्वीटर अकाऊंवरुन एक पोस्ट केली असून यावरुनच तिला आता लक्ष्य केलं जात आहे.

पॅलेस्टाइनमधील 198 जणांचा मृत्यू

जगभरामध्ये सध्या इस्रायल आणि पॅलेस्टाइनमधील संघर्षाची चर्चा आहे. मागील 2 दिवसांपासून हमास या दहशतवादी संघटनेकडून इस्रायलवर हल्ले केले जात आहेत. इस्रायलही याचा जशास तसं उत्तर देत असून 2 दिवसांमध्ये 1 हजार जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये इस्रायलच्या 600 नागरिकांचा आणि 400 हमास दहशतवाद्यांचा समावेश आहे. गाझामधील आरोग्याविषय यंत्रणांनी दिलेल्या माहितीनुसार, पॅलेस्टाइनमधील किमान 198 जणांचा सध्याच्या संघर्षामध्ये मृत्यू झाला आहे. हमासने इस्रायलवर हल्ला केल्यानंतर पॅलेस्टाइन हमासला समर्थन करत असल्याचं सांगत इस्रायलने पॅलेस्टाइनवर हवाई हल्ले करण्यास सुरुवात केली आहे. 

हेही वाचा :  Optical Illusion: 'या' फोटोत लपलेले 3 इंग्रजी शब्द शोधून दाखवा, तुमच्याकडे 30 सेकंदाची वेळ

मिया खलिफा काय म्हणाली?

याच संघर्षाच्या पार्श्वभूमीवर मिया खलिफाने इस्रायलविरोधात भूमिका घेत पॅलेस्टाइनसाठी एक पोस्ट केली आहे. “तुम्ही पॅलेस्टाइनमधील परिस्थितीकडे पाहत असाल आणि पॅलेस्टाइनच्या बाजूने नसाल तर तुम्ही चुकीच्या बाजूने आहात. सरणारा काळ काही वर्षांमध्ये इतिहासाच्या स्वरुपात याचा प्रत्यय करुन देईल,” असं मिया खलिफाने म्हटलं आहे.

देहविक्रीय करणाऱ्या महिलेचं ऐकू नका

मिया खलिफा ही यापूर्वीही अनेकदा इस्रायल आणि पॅलेस्टाइन संघर्षाबद्दल उघडपणे बोलली आहे. मात्र यंदा तिने केलेल्या पॅलेस्टाइनच्या समर्थनार्थ केलेल्या पोस्टवरुन अनेकांनी तिच्यावर टीका केली आहे. मिया खलिफा ही मूळची लेबनानमधील असून ती सध्या अमेरिकेत स्थायिक आहे. मात्र तिने तिथून केलेल्या या राजकीय पोस्टनंतर, देहविक्रीय करणाऱ्या महिलेचा राजकीय सल्ला ऐकू नये जिच्यावर स्वत:च्या देशाने बंदी घातली आहे, असं एका टीकाकार महिनेनं म्हटलं आहे.

प्रकरण चिघळणार

नव्याने सुरु झालेला इस्रायल आणि पॅलेस्टाइन संघर्ष लवकर शांत होण्याची चिन्हं दिसत नाहीत. या संघर्षामध्ये इतर देशांनीही आपली भूमिका स्पष्ट केल्याने हे प्रकरण अधिक चघळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा :  राजेश खन्नांची 'ती' हिरोईन जिची सावत्र वडिलांनीच केली हत्या; आत्ता 13 वर्षांनी...



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

‘6500 कोटींची दलाली करणाऱ्याने आता..’, रोहित पवारांचा CM शिंदेंना सवाल; म्हणाले, ‘आपण अजून..’

Rohit Pawar On Pune Medical Officer Letter: पुणे जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान …

निवडणुकीच्या प्रचारसभेत जोरदार वाऱ्याने स्टेज कोसळला! 9 जणांचा मृत्यू; दुर्घटना कॅमेरात कैद

Election Campaign Rally Accident Video: मॅक्सिकोमध्ये एका दुर्देवी दुर्घटनेमध्ये 9 जणांचा मृत्यू झाला आहे. राष्ट्राध्यक्षांच्या निवडणुकीच्या …