“शिवाजी महाराजांनी वाघनखं वापरलीच नाहीत, मग…”, जितेंद्र आव्हाडांची पोस्ट चर्चेत!

Dr.Jitendra Awhad On Waghnakh : महाराष्ट्र शासनाच्या पुढाकारानं इंग्लंडमधील व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट संग्रहालयातून छत्रपती शिवरायांचा ‘वाघ नखं’ आणण्याची तयारी सुरू आहे. वास्तविक 2024 हा शिवरायांच्या राज्याभिषेकाचा 350 वा वर्धापन दिन आहे. येत्या 16 नोव्हेंबरला शिवरायांची (Chhatrapati Shivaji maharaj Waghnakh) वाघनखं मुंबईत आणण्यात येणार आहेत. संग्रहालयासोबत 3 ऑक्टोबरला करार करण्यात येणार आहेत. 3 वर्षांसाठी वाघनखं महाराष्ट्रात आणण्याची प्रक्रिया करण्यात येईल. अशातच आता राजकीय वर्तुळात (Maharastra Politics) चर्चेला उधाण आल्याचं पहायला मिळतंय. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी ट्विट करत खळबळ उडवून दिली आहे.

काय म्हणाले आव्हाड?

गजानन मेहंदळे या थोर इतिहासकाराने आपल्या श्री राजा शिवछत्रपती या पुस्तकामध्ये पान क्र. 1238 वर स्पष्टपणाने लिहिलं आहे की, छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानला मारण्यासाठी वाघनखे वापरली हे कुठेही स्पष्ट होत नाही. म्हणजे त्याचा अर्थ असा निघतो की, अफजल खान ला मारताना छत्रपती शिवाजी महाराजांनी वाघनखे वापरलीच नाहीत.आता गजानन मेहंदळे हे सरकारचे मार्गदर्शक आहेत. सरकार यावर काही विशेष टिपण्णी करेल का? असा सवाल आव्हाड यांनी उपस्थित केलाय.

हेही वाचा :  Petrol Price Today : महाराष्ट्रासह 'या' राज्यांमध्ये बदलले पेट्रोल-डिझेलचे दर, जाणून घ्या एका क्लिकवर आजच्या किंमती...

पाहा पोस्ट

मात्र, त्याआधीच शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरेंनी सरकारला काही सवाल केलेत, त्यातून निवडणुकीच्या तोंडावर वाघनखं महाराष्ट्रात आणण्याचा घाट घातला जातोय का असा सवाल उपस्थित होतोय. तर वाघ नखं राज्य सरकारला व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट संग्रहालयाकडून केवळ तीन वर्षांसाठी दिली जाणार आहेत. सांस्कृतिक कार्य विभागानं प्रसिद्ध केलेल्या जीआरमध्ये तसं नमूद करण्यात आलंय..मुंबई, सातारा, कोल्हापूर आणि नागपूर या चार शहरातल्या वस्तूसंग्रहालयात ही वाघनखं ठेवली जाणारेत. वाघनखांच्या सुरक्षेसाठी सरकारने 11 जणांची समिती तयार केलीय. 

आणखी वाचा – आमदार अपात्रता: नार्वेकरांचा घाना दौरा रद्द होण्याचं क्रेडिट घेत आदित्य ठाकरेंची Insta स्टोरी; म्हणाले, ‘मी फक्त…’

दरम्यान, वाघनखं महाराष्ट्रात येणार ही अभिमानास्पद बाब आहेच मात्र केवळ आगामी निवडणुका डोळ्यांसमोर ठेऊन तर ती आणली जात नाहीयेत ना असा सवाल विरोधक विचारतायत. येत्या 16 नोव्हेंबर रोजी वाघनखं मुंबईत आणली जाणार आहेत,त्यासाठी इंग्लंडच्या संग्रहालयासोबत करारही करण्यात येतोय..मात्र त्याआधीच विरोधकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांमुळे महाराजांच्या वाघनखांवरुनही येत्या काही दिवसांत राजकारण रंगताना पाहायला मिळू शकतं.

हेही वाचा :  Maharastra Politics: "ज्यांना स्वत:चं भविष्य माहिती नाही, तो आपलं भविष्य ठरवणार", उद्धव ठाकरेंची खरमरीत टीका



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

चिंताजनक! मातृभाषा असलेल्या मराठीत 38000+ विद्यार्थी नापास! राज्यातील इंग्रजीचा निकाल अधिक सरस

SSC Result 2024 Maharashtra Board: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षक मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावीच्या …

धक्कादायक! सतत डोळे चोळण्याच्या सवयीमुळे 21 वर्षीय तरुणाने दृष्टी गमावली; थेट रुग्णालयात..

Continuous Eye Rubbing Lost Vision:  डोळ्यात काही गेलं तर आपल्यापैकी अनेकजण डोळे चोळतात. अगदी सहज …