Petrol Price Today : महाराष्ट्रासह ‘या’ राज्यांमध्ये बदलले पेट्रोल-डिझेलचे दर, जाणून घ्या एका क्लिकवर आजच्या किंमती…

Petrol Diesel Price on 30 May 2023 : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत (crude oil prices) तेजी पाहायला मिळत आहे. डब्ल्यूटीआय क्रूड ऑइल 0.19 टक्क्यांनी वाढून $72.82 प्रति बॅरलवर व्यवहार करत आहे. त्याच वेळी ब्रेंट क्रूड ऑइल 0.03 टक्क्यांनी घसरून प्रति बॅरल 77 डॉलरवर व्यवहार करत होते. दरम्यान, तेल कंपन्यांनीही पेट्रोल आणि डिझेलचे (Petrol Diesel Price) नवे दर जारी केले आहेत. मात्र, आज (30 मे 2023) पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. मात्र महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये पेट्रोलच्या किंमतीत किंचित वाढ झाली आहे. 

दरम्यान महाराष्ट्रात पेट्रोलची किंमत 106.99 रुपये आहे. 29 मे 2023 पासून महाराष्ट्रातील किमतीत कोणताही बदल नोंदवला गेला नाही. इंधनाच्या किमती डायनॅमिक इंधन किंमत प्रणालीवर आधारित असतात आणि त्या नियमितपणे सुधारल्या जातात. तर डिझेल 93.57 रुपये दराने खरेदी-विक्री होत आहे. यामध्ये पण कोणताही बदल झाला नाही. जून 2017 पासून दररोज सकाळी 6 वाजता इंधनाचे दर सुधारित केले जातात.

हेही वाचा :  राज ठाकरेंच्या ताफ्यामुळे दिव्यात वाहतूक कोंडी; मनसे कार्यालयाच्या उद्घाटनात रेटारेटी | Railway station MNS chief Raj Thackeray Mobile cameras traffic akp 94

तुमच्या शहरातील पेट्रोल डिझेलचे दर

शहर  पेट्रोल (रु.)  डिझेल (रु.)
अहमदनगर  107.16 93.65
अकोला  106.14 92.69
अमरावती  107.48 93.97
औरंगाबाद  106.75 93.24
भंडारा  107.11 93.62
बीड  107.59 94.08
बुलढाणा  108.02 94.47
चंद्रपूर  106.42 92.97
धुळे  106.04 92.57
गडचिरोली  107.52 94.01
गोंदिया  107.23 93.73
बृहन्मुंबई  106.31 94.27
हिंगोली  107.43 92.90
जळगाव  106.38 92.95
जालना  107.84 94.29
कोल्हापूर  106.92 93.44
लातूर  107.59 94.07
मुंबई शहर  106.31 94.27
नागपूर  106.06 92.61
नांदेड  108.03 95.08
नंदुरबार  106.84 93.99
नाशिक  106.65 93.15
उस्मानाबाद  107.08 93.58
पालघर  106.06 92.55
परभणी  109.09 95.50
पुणे  106.63 93.12
रायगड  106.14 92.63
रत्नागिरी  107.48 93.97
सांगली  106.28 92.82
सातारा  106.70 93.19
सिंधुदुर्ग  107.83 94.31
सोलापूर  106.98 93.49
ठाणे  105.82 92.32
वर्धा  106.18 92.72
वाशिम  106.91 93.43
यवतमाळ  107.30 93.80 

प्रमुख शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे दर

आज देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. देशाची राजधानी दिल्लीत सोमवारी पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे. मुंबईत पेट्रोल 106.31 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लीटर दराने उपलब्ध आहे. याशिवाय चेन्नईमध्ये पेट्रोलचा दर 102.63 रुपये प्रति लिटर आणि डिझेलचा दर 94.24 रुपये प्रति लिटर आहे. त्याच वेळी, मंगळवारी कोलकातामध्ये पेट्रोल 106.03 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे.

हेही वाचा :  'लग्नानंतर पुरुष रोज रात्री करतात, मुलगी शिकली तर नवऱ्याला सांगेल...', मुख्यमत्र्यांचं विधानसभेत आक्षेपार्ह विधान

SMS द्वारे नवीनतम दर जाणून घ्या

पेट्रोल-डिझेलचे दर रोज बदलतात आणि सकाळी 6 वाजता अपडेट होतात. तुम्ही एसएमएसद्वारे पेट्रोल आणि डिझेलचे दैनंदिन दर देखील जाणून घेऊ शकता. जर तुम्ही इंडियन ऑइलचे ग्राहक असाल तर RSP स्पेस पेट्रोल पंप कोड 9224992249 वर एसएमएस करून माहिती मिळवू शकतात आणि BPCL चे ग्राहक असाल तर RSP 9223112222 वर एसएमएस पाठवून माहिती मिळवू शकतात. तर, HPCL चे ग्राहक HPPprice 9222201122 वर पाठवून किंमत जाणून घेऊ शकतात.



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Loksabha : तिसऱ्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा थंडावल्या, देशातील ‘या’ बड्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला

Loksabha Election 2024 : तिसऱ्या टप्प्यात म्हणजे 7 मे रोजी देशात 93 जागांवर मतदान होणार …

Loksabha : बारामतीच्या सभेत बोलताना रोहित पवारांना अश्रू अनावर, अजितदादांनी केली नक्कल, म्हणाले ‘आमच्या पठ्ठ्यानं…’

Rohit Pawar burst into tears : येत्या सात मे रोजी होणाऱ्या तिसऱ्या टप्प्यातील लोकसभेच्या (Loksabha Election) …