प्रचंड वेगाने सूर्याच्या अगदी जवळ पोहचले; NASA च्या सूर्ययानानं रचले दोन मोठे विक्रम

NASA Parker Solar Probe : पृथ्वीवरील जीवसृष्टी ही सूर्याच्या उर्जेमुळेच अस्तित्वात आहे. सुर्याचा प्रथमच जवळून अभ्यास करणाऱ्यासाठी अमेरिकेची अंतराळ संस्‍था अर्थात  NASA ने हाती घेतलेल्या  सूर्ययान मोहिमेत मोठे यश मिळाले आहे.  सूर्याचा अभ्यास करण्यासाठी नासाने पार्कर सोलर प्रोब नावाचे यान लाँच केले आहे.  NASA च्या सूर्ययानानं रचले दोन मोठे विक्रम रचले आहेत. प्रचंड वेगाने हे सूर्ययान सूर्याच्या अगदी जवळ पोहचले आहे. 

एकाचवेळी दोन विक्रम रचले

पार्कर सोलर प्रोबने हे दोन्ही रेकॉर्ड दोन दिवसांपूर्वी म्हणजेच 27 सप्टेंबर 2023 रोजी रचले आहेत. यानंतर आता ही 17 वी वेळ जेव्हा यान सूर्याच्या जवळ गेले आहे. हे यान सूर्याच्या पृष्ठभागापासून आतापर्यंतचे सर्वात कमी अंतरावर होते. या प्रवासात यानाला शुक्र ग्रहाच्या गुरुत्वाकर्षणाची मदत झाली. पार्कर सोलर प्रोब सूर्याच्या पृष्ठभागापासून केवळ  72. 60 लाख किलोमीटर अंतरावर आले. या यान सूर्याच्या दिशेने प्रचंड वेगाने प्रावस करत आहे. सूर्याच्या जवळ पोहचताना या यानाचा वेग ताशी  6.35 लाख किलोमीटर इतका होता. 

हेही वाचा :  एका दिवसात 24 नव्हे 25 तास? कसा आणि कधीपासून दिसेल बदल? जाणून घ्या

पार्कर सोलर प्रोब ठरले सर्वात वेगवान आंतराळ यान

पार्कर सोलर प्रोब हे सर्वात वेगवान आंतराळ यान ठरले आहे. अनेक सौर वादळांचा सामना करत हे यान पुढे गेले. काही दिवसांपूर्वी नासाने एक व्हिडिओ शेअर केला होता. यामध्ये हे यान सौर वादळाचा सामना करत पुढे गेल्याचे दिसले. पार्कर सोलर प्रोबने सूर्यापासून निघणाऱ्या सौर लहरीही पार केल्याचं ही व्हिडिओत दिसत आहे. सौर लहरी किंवा सीएमई कधीकधी इतके शक्तिशाली चुंबकीय क्षेत्र तयार करतात की ते अब्जावधी टन प्लाझ्मा सोडतात. यातील अनेक 96.56 ते 3057.75 किलोमीटर प्रति सेकंद या वेगाने धावतात. या वादळांच्या गतीला मागे टाकत हे यान सूर्याच्या पृष्ठभागापासून केवळ  72. 60 लाख किलोमीटर अंतरावर पोहचले. 

आपल्यापासून 15 कोटी किलोमीटर अंतरावर असलेल्या सूर्याच्या अगदी जवळ पोहणारे पहिले यान

आपल्यापासून 15 कोटी किलोमीटर अंतरावर असलेल्या सूर्याच्या अगदी जवळ पोहचणारे हे पहिले यान ठरले आहे. हे यान साडेचार इंच जाडीच्या उष्णतारोधक कार्बनच्या चकतीवर बसवण्यात आल आहे. ही चकती कायम सूर्याच्या दिशेला राहील, अशी यानाची रचना करण्यात आलीये. त्यामुळे सू्र्याची प्रखर उष्णता आणि त्यातून निघणाऱ्या धोकादायक प्रारणांपासून यानाचं आणि त्यावर असलेल्या उपकरणांचं संरक्षण होत आहे. 

हेही वाचा :  'टायटॅनिक 2.0' होता होता वाचलं... खवळलेला समुद्र, मोठ्या लाटा आणि...; Video पाहून अंगावर येईल काटा

पार्कर सोलार प्रोब ही  7 वर्षांची मोहीम 

सुर्याच्या दिशेनं जात असताना ‘पार्कर सोलर प्रोब’ शुक्र ग्रहाच्याही जवळून गेले आहे. शुक्राभोवती परिक्रमा करताना त्याच्या गुरूत्वाकर्षणाचा वापर करून हे सौरयाने आपला वेग वाढवला आणि ते सूर्याच्या जितक्या जवळ जाता येईल तितक्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत आहे. या काळात हे यान सुर्याभोवती असलेल्या चुंबकीय क्षेत्राचा अभ्यास करत आहे. चुंबकीय प्रारणांमधील चढ – ऊतार, सुर्यापासून निघणारे सौर वारे, सुर्यापासून निघणारी प्रारणे यांचा अभ्यास करत सुर्याबद्दल अधिक माहिती हे यान गोळा करत आहे.  4 ते 19 ऑक्टोबर दरम्यान हे यान आपल्या नवीन रेकॉर्डचा डेटा पृथ्वीवर पाठवणार आहे.  



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Maharastra Politics : ‘शरद पवारांचं वक्तव्य धादांत खोटं, मला मुख्यमंत्री व्हायचं नव्हतं पण…’, अजितदादांचा गौप्यस्फोट

Ajit Pawar On Sharad Pawar : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार (Ajit Pawar) आणि शरद …

‘शरद पवारांचं वक्तव्य धादांत खोटं, मला मुख्यमंत्री व्हायचं नव्हतं पण…’, अजितदादांचा गौप्यस्फोट

Ajit Pawar On Sharad Pawar : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार (Ajit Pawar) आणि शरद …