गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील वाहतुकीत महत्त्वाचे बदल, आत्ताच चेक करा

Ganeshotsav Pune Traffic:  ढोल ताशांच्या गजरात आज बाप्पाचे आगमन होत आहे. बाप्पा आज घरोघरी विराजमान होणार. सर्वांनाच बाप्पाच्या भेटीची ओढ लागली आहे. मात्र, बाप्पाला घरी आणण्यासाठी वाहतुक कोंडीचा सामना करावा लागू शकतो याची काळजी घेऊनच पुण्यातील मध्यवर्ती भागातील वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. नागरिकांनी याच मार्गाचा वापर करावा, असं अवाहनही करण्यात आलं आहे. 

कशी असेल पुण्यातील वाहतूक

गाडगीळ पुतळा चौकातून डावीकडे वळून कुंभारवेस चौक, शाहीर अमर शेख चौकमार्गे इच्छितस्थळी जावे

शिवाजीनगर येथून शिवाजी रस्त्याने स्वारगेटकडे जाणाऱ्या वाहनचालकांनी स. गो. बर्वे चौकातून (मॉडर्न कॅफे चौक), जंगली महाराज रस्ता, खंडुजीबाबा चौक, टिळक रस्त्याने इच्छितस्थळी जावे.

झाशी राणी चौक ते खुडे चौक, डेंगळे पूल मार्गे कुंभारवेस जाणाऱ्या वाहन चालकांनी खुडे चौकातून मनपा पुणे समोरून मंगला चित्रपट गल्लीतून कुंभार वेस किंवा प्रिमियर गॅरेज चौक शिवाजी पुल मार्गे, गाडगीळ पुतळा चौक, डावीकडे वळून कुंभार वेस चौक

हेही वाचा :  खेड रेल्वे स्टेशनवर राडा, ट्रेनमधे चढण्यासाठी संघर्ष; कोकणातून परत येणाऱ्या प्रवाशांचे प्रचंड हाल

सावरकर पुतळा चौक ते समाधान भेळ सेंटर (सिंहगड रस्ता) परिसरात मूर्ती विक्रेत्यांनी तात्पुरती दुकाने थाटली आहेत. या भागात वाहनचालकांनी वाहने लावू नयेत

मुंढव्यातील केशवनगर भागात मूर्ती खरेदीसाठी होणारी गर्दी विचारात घेऊन या भागात वाहतूक बदल 
करण्यात आला आहे.

हे रस्ते असतील वाहतूकीस खुले

 फडके हौद चौक ते जिजामाता चौक ते फुटका बुरूज चौक
– आप्पा बळवंत चौक ते बुधवार चौक ते मोती चौक
– सोन्यामारुती चौक ते बेलबाग चौक ते सेवासदन चौक
– मंगला चित्रपटगृहसमोरील प्रिमिअर गॅरेज गल्ली ते कुंभार वेस

गणरायाच्या स्वागतासाठी पुण्यनगरी सज्ज झाली आहे. 

मानाचा पहिला कसबा गणपतीची फडके हाऊस चौकातून आगमन मिरवणूक निघणार आहे. मानाचा दुसरा तांबडी जोगेश्वरी गणपतीची नारायण पेठेतील मंदार लॉज पासून आगमन मिरवणूक निघणार आहे. मानाचा तिसरा गुरुजी तालीम गणपतीची गणपती चौकातून आगमन मिरवणूक निघणार आहे. मानाचा चौथा तुळशीबाग गणपतीची राम मंदिरापासून बाप्पाची आगमन मिरवणूक निघणार आहे. मानाचा पाचवा केसरी वाडा गणपतीची टिळक पंचांगानुसार 17 ऑगस्टला प्रतिष्ठापना झालीय. त्यामुळे गणेश चतुर्थीला आगमन मिरवणूक निघणार नाही. तर श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची आगमन मिरवणूक सकाळी साडेआठ वाजता निघणार आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांच्या हस्ते सकाळी 10 वाजून 23 मिनिटांनी श्रींच्या मूर्तीची प्रतिष्ठापना होणार आहे

हेही वाचा :  पुण्यात गणपती विसर्जनासाठी गेलेल्या नागरिकांवर मधमाशांचा हल्ला; 100 जणांना घेतला चावा

7 हजार पोलिसांचा बंदोबस्त

गणेशोत्सवाच्या काळात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पुण्यामध्ये सुमारे 7 हजार पोलिसांचा बंदोबस्त असणार आहे. तर 1 हजार 800 सीसीटीव्हींची करडी नजर राहणार आहे. देशभरात घातपाती कारवाया करण्याच्या तयारीत असलेल्या दहशतवाद्यांना काही महिन्यांपूर्वी पुण्यात अटक करण्यात आली होती. त्यातूनच इसीसच्या महाराष्ट्र मॉड्युलचा पर्दाफाश झाला. त्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सवात विशेष खबरदारी घेण्यात येणार आहे. 



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Maharastra Politics : ‘सर्वात मोठा घोटाळा, नियम ‘कात्रज’च्या धाब्यावर…’, रोहित पवारांचा मोठा गौप्यस्फोट

Rohit Pawar On Ambulance Scam : राज्याच्या आरोग्य विभागात साडेसहा हजार कोटींचा अँब्युलन्स घोटाळा झाल्याचा …

औरंगजेबाने तोडलेली मंदिर पुन्हा बांधण्यापासून महिलांची सेना बनवण्यापर्यंत..’, महाराणी अहिल्याबाईंची प्रेरणादायी कहाणी

Ahilyabai Holkar jayanti 2024: 31 मे रोजी  महाराणी अहिल्याबाई होळकर यांची जयंती साजरी केली जाते. …