‘हिंमत असेल तर मराठ्यांना…’, उद्धव ठाकरेंचं PM मोदींना जाहीर आव्हान, गणेशोत्सवात अधिवेशन बोलावल्याने संताप

केंद्र सरकारने ऐन गणेशोत्सवात अधिवेशन बोलावलं असल्याने उद्धव ठाकरे संतापले आहेत. हे हिंदुत्ववादी सरकार असून गणेशोत्सवात अधिवेशन कसं काय लावता? अशी विचारणा त्यांनी केली. तुम्हाला दुसरा मुहूर्त सापडला नाही का? मुहुर्त लावणारे ज्योतिषी कुठून आणले आहेत? अशी विचारणा त्यांनी केंद्र सरकारला केली आहे. महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात गणेशोत्वस साजरा केला जात असताना नेमकं असं तुमचं काय अडकलं आहे की खास अधिवेशन घेत होतात? असंही उद्धव ठाकरेंनी विचारलं आहे. वांद्रे येथील रंगशारदामध्ये पदाधिकारी मेळाव्यात ते बोलत होते. 

“तुम्ही मणिपूरवर बोलायचाच तयार नव्हता. अखेर अविश्वास प्रस्ताव आणण्यात आला, पण मणिपूर वगळता इतर गोष्टींवरच भरपूर बोलतात. मग त्यावेळी हे करता आलं नसतं का. पण हिंदुत्तवादी आहात ना…तुम्ही सणांच्या आडवे येणार, पण पितृपक्ष पाळणार. पितृपक्षात अधिवेशन का घेत नाही? हिंदूद्वेष्टा सरकार म्हणून आजही मी त्यांचा निषेधच करतो. पण चला आज मी स्वागत करतो. पण या अधिवेशनात सुप्रीम कोर्टाने जसा दिल्लीतील अधिकारांच्या बाबतीत निर्णय दिला, तेव्हा मनाविरोधात निर्णय दिला म्हणून लोकसभेत पाशवी मतदान करत दिल्लीचा कब्जा मिळवलात. तसंच वटहुकूम काढून मराठा, धनगर यांनी हक्क मिळवून द्या,” असं आव्हानच उद्धव ठाकरे यांनी दिलं आहे. 

हेही वाचा :  शिव संपर्क अभियानावरून नारायण राणेंनी सेनेला काढला चिमटा; म्हणाले, शिवसेना म्हणजे... | Criticism of Narayan Rane on Shiv Sena from Shiv Sampark Abhiyan abn 97

“आम्ही कोणत्याही व्यक्तीविरोधात नाही. आपली आघाडी इंडियाच्या नावाने झाली आहे. आता आपल्यावर टीका करणारे इंडियाविरोधी आहेत. त्यांच्या पोटात गोळा उठला आहे,” असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला. तसंच आज संध्याकाळी जालन्याला जाणार असल्याचं जाहीर केलं. 

“काल जो काही शासकीय अत्याचार झाला, त्याचा निषेध करुन चालणार नाही. सरकार म्हणजे नेमकं कोण? पाहिलं तर एक फूल दोन हाफ आहेत. पण राज्यात आंदोलन सुरु असताना कोणाकडेही वेळ नाही. माता भगिनी उपोषणाला बसल्या आहेत. काल, परवा जेव्हा इंडियाची बैठक सुरु होती, तेव्हा त्यांचे प्रवक्ते आमच्यावर टीका करत होते. यांच्याकडे इंडियाविरोधात बोलायला वेळ आहे. पण आंदोलनकर्त्यांकडे एकाही मंत्र्याला जावंसं वाटलं नाही. आता चौकशीचा फार्स करणार. सखोल म्हणजे किती खोल जाणार आहात. कशाला हे थोतांड सुरु आहे,” असा संताप उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला. 

“मुख्यमंत्र्यांना, गृहमंत्र्यांना राज्यात काय सुरु आहे याची रोज कल्पना दिली जाते. मग आपल्या एक फूल, दोन हाफला हे आंदोलन होत आहे याची माहिती नव्हती का? बारसूत जो काही लाठीचार्ज झाला, वारकऱ्यांना मारहाण झाली त्याची अद्याप चौकशी सुरु आहे. करोनात जीवाची बाजी लावणारे आपले पोलीस इतके राक्षस होऊ शकतात. म्हणजेच यामागे कोणीतरी आदेश देणारा आहे. पोलीस आदेशाशिवाय असं वागू शकत नाहीत,” असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. 

हेही वाचा :  पहाटेचा शपथविधी उद्धव ठाकरे यांना धडा शिकविण्यासाठीच, भाजप नेत्याचा गौप्यस्फोट

सरकार आपल्या दारी, थापा मारते लय भारी कार्यक्रम त्यांना घ्यायचा होता, म्हणून बास झालं उठा सांगत होते. पण आंदोलनकर्ते चर्चेची मागणी करत होते. पण घरात घुसून एका वृद्धेलाही मारहाण झाली. आणि  हे लोक सखोल चौकशी करणार म्हणत आहेत अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली आहे. जी हुकूमशाही आहे तिला चिरडून टाकायला इंडिया आघाडी आली आहे असंही ते म्हणाले. 



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

मंत्र्याकडून नियमबाह्य कामांसाठी दबाव! निलंबित अधिकाऱ्याचे CM शिंदेंना पत्र; म्हणाला, ‘मंत्री महोदयांच्या दबावामुळे..’

महिला कर्मचाऱ्याचा लैंगिक छळ प्रकरणी आणि विभागातंर्गत आर्थिक घोटाळ्याचा ठपका ठेवत पुणे जिल्हा परिषदेचे तत्कालीन …

20 हजार पगार असलेला कसा बनू शकतो करोडपती! समजून घ्या 70:15:15 चा फॉर्मुला

Crorepati Calculator: आयुष्यात करोडपती व्हावं असं अनेकांचं स्वप्न असतं. पण हे स्वप्न कधी प्रत्यक्षात उतरेल …